Diveagar Gram Panchayat News:रायगडमध्ये 18 ग्राम पंचायतींच्या निवडणुका पार पडल्या असून यामध्ये श्रीवर्धनमधील दिवेआगार ग्रामपंचायत सर्वांचे लक्ष वेधुन घेणारी ठरली आहे. दिवेआगरमध्ये (Diveagar Gram Panchayat)  राष्ट्रवादीला (NCP) मोठा धक्का बसला असून दिवेआगर विकास आघाडीचे विजय तोडणकर सरपंच पदी जिंकून आले आहेत. श्रीवर्धन हा मंत्री आदिती तटकरे, (Aditi Tatkare) आणि खासदार सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांचा बालेकिल्ला समजला जातो. दोन दिवसापूर्वी म्हसळा नगर पंचायतीमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला होता आणि आता दिवेआगर हि महत्वाची ग्राम पंचायत राष्ट्रवादीच्या हातुन गेल्याने राष्ट्रवादीला येथील जनतेने नाकारलं आहे.

मनमानी, हुकूमशाही आणि लोकांना गृहीत धरण्याचे राजकारण दिवेआगारमध्ये चालणार नाही, अस वक्तव्य आणि इशारा निवडून आलेले नवनिर्वाचित सरपंच विजय तोडणकर यांनी खासदार सुनिल तटकरे यांना दिला आहे.

Sunil Tatkare On Vidhan Parishad : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कोअर कमिटीची बैठक संपन्न 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कोअर कमिटीची बैठक संपन्न  झाली आहे. तर बैठकीमध्ये कोणत्याही नावावर एकमत झालेलं नाही अशी सुत्रांची माहिती आहे. विविध नावांवर चर्चा झाल्यानंतर अंतिम निर्णय सुनेत्रा पवार यांनीच घ्यावा असे पक्षातील नेत्यांकडून सुनेत्रा पवारांना विनंती आहे. राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानपरिषद उमेदवाराचे नाव जाहीर करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

NCP : राष्ट्रवादीकडे विधानपरिषदेची फक्त एक जागा, बड्या नेत्यांची जोरदार लॉबिंग, रात्री उशिरा बैठक

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात विधान परिषद निवडणुकीच्या (Vidhan Parishad Election 2026) अनुषंगाने रात्री उशिरा बैठक पार पडली असल्याची माहिती समोर आली आहे. काल (मंगळवारी, ता २८) रात्री ११ ते २ पर्यंत देवगिरी निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीत विविध नावांवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडल्याची माहिती आहे.(Vidhan Parishad Election 2026)

Maharashtra Vidhan Parishad Election 2026: विधान परिषदेच्या निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम

निवडणुकीची अधिसूचना जारी करणे : 23 एप्रिल, 2026 उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस: 30 एप्रिल 2026उमेदवारी अर्जांची छाननी: 2 मे 2026 उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख: 4 मे 2026मतदानाची तारीख: 12 मे 2026मतदानाची वेळ: सकाळी 9 वाजेपासून ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आहे.मतमोजणी: 12 मे 2026 संध्याकाळी 5 वाजतानिवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख: 13 मे 2026