Dharmendra Pradhan on Congress नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi), राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खरगे यांच्यासह प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) आणि काँग्रेसच्या (Congress) इतर खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन केलं. यावेळी काँग्रेसकडून शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांच्यासहपंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि अमित शाह यांच्यादेखील राजीनाम्याची मागणी करण्यात आली. यावरआता शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काँग्रेसआणि राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली आहे.

Continues below advertisement

यावेळीबोलतानातेम्हणाले की, काँग्रेस नेते विद्यार्थ्यांना राजकीय साधन म्हणून वापरत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. ते असेही म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या समस्यांवर तोडगा काढणे हे काँग्रेसचे ध्येय नसून, राजकीय लक्ष वेधण्यासाठी अशांतता निर्माण करणे हे आहे. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या 'एक्स' (X) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील एका पोस्टमध्ये म्हटलंआहे की, "विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान अशांतता निर्माण करण्यासाठी विद्यार्थ्यांना निर्लज्जपणे राजकीय साधन म्हणून वापरत आहेत. राहुल गांधी आणि काँग्रेसने सुरक्षा नियमांचे उल्लंघन करून पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केले, ज्यामुळे जनतेला गैरसोय झाली."

Dharmendra Pradhan on Congress : अशांतता निर्माण करणे हेच काँग्रेसचे ध्येय - धर्मेंद्र प्रधान

Continues below advertisement

ते पुढे म्हणाले, "सरकारची सर्वसमावेशक चर्चा करण्याची इच्छा असूनही, काँग्रेसने लोकशाही चर्चेऐवजी राजकीय तमाशा निवडला. विद्यार्थ्यांच्या समस्यांवर तोडगा काढणे हे त्यांचे ध्येय नसून, राजकीय लक्ष वेधण्यासाठी अशांतता निर्माण करणे हे मुख्यध्येय आहे." राहुल गांधींसाठी हा विद्यार्थ्यांचा प्रश्न नाही, तर चर्चेचे सर्व संभाव्य मार्ग खुले झाल्यानंतर संघर्ष निर्माण करण्याचा हा मुद्दा आहे.

Dharmendra Pradhan on NEET Exams : 'नीटवर चर्चा करण्यास कटिबद्ध'

शिक्षणमंत्री म्हणाले, "आमचे सरकार नीटवर चर्चा करण्यास आणि सभागृहातील तरुणांच्या प्रत्येक खऱ्या चिंतेचे निराकरण करण्यास पूर्णपणे कटिबद्ध आहे. भारतातील विद्यार्थ्यांना राजकीय प्रचारात प्याद्यांसारखे वापरण्यापेक्षा अधिक चांगली वागणूक मिळायला हवी. त्यांना गोंधळाऐवजी निश्चितता, घोषणांऐवजी उपाय आणि अशांततेऐवजी जबाबदारी मिळायला हवी. आपण आपल्या विद्यार्थ्यांना केवळ रागापेक्षा अधिक काही देणे लागतो. आपण त्यांना उत्तरे, सुधारणा आणि उत्तरदायित्व देणे लागतो. आमचे सरकार नेमके हेच करण्यास कटिबद्ध आहे."

Congress : राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांचे पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन

राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या अनेक खासदारांनी मंगळवारी (21 जुलै) पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, प्रियांका गांधी आणि इतर खासदार उपस्थित होते. सपा प्रमुख अखिलेश यादव यांनीही आंदोलनात सहभाग घेतला. आंदोलनादरम्यान राहुल गांधी यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह आंदोलनादरम्यान त्यांच्याशी बोलण्यासाठी आले, परंतु चर्चा निष्फळ ठरली. त्यानंतर आंदोलकांना पंतप्रधानांच्या निवासस्थानाजवळून दूर जाण्यास सांगण्यात आले, परंतु त्यांनी नकार दिला. यानंतर दिल्ली पोलिसांनी त्या सर्वांना ताब्यात घेतले, परंतु नंतर त्यांची सुटका करण्यात आली.

इतरमहत्वाच्याबातम्या