Dharashiv Zilla Parishad 2026 : धाराशिव जिल्हा परिषद पंचायत समितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena UBT) पक्षालापराभवालासमोरजावं लागल. दरम्यानया पराभवानंतर पक्षातीलकार्यकर्तेआणि पदाधिकाऱ्यांमध्येअसल्याचीमाहितीसमोरआलीआहे. पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने दुर्लक्ष केल्यानंपक्षात गटबाजी झालीआणित्यामुळे आपला पराभझाला, अशी भावना कार्यकर्तेआणि पदाधिकाऱ्यांमध्येआहे. दरम्यान पदाधिकारी पक्षांतराच्या तयारीत असल्याचीहीमाहितीसमोरआलीआहे.

Continues below advertisement

Dharashiv Shivsena UBT : पराभूत उमेदवारांची पक्षांतराची तयारी, धाराशिव जिल्ह्यात ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार पडणार?

दरम्यान, धाराशिव जिल्ह्यात भूम, परांडा आणि वाशी तालुक्यात ठाकरे शिवसेनेला खिंडार पडणार का? असासवालराजकीयवर्तुळातरंगूलागलीआहे. निवडणूक लढलेले पदाधिकारी खासदार ओमराजे निंबाळकर यांची साथ सोडण्याच्या तयारीत असल्याचेहीबोललंजातआहे. सध्याचीराजकीयघडामोडबघता भूम, परंडा आणि वाशी तालुक्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची चिन्हे दिसत आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांनी आता पक्षांतराची तयारी सुरू केल्याची माहिती समोर आलीआहे.

Continues below advertisement

Dharashiv Zilla Parishad 2026 : वरिष्ठ नेतृत्वाने जाणूनबुजून दुर्लक्ष , पक्षांतर्गत गटबाजीमुळेच आमचा पराभव झाला

दुसरीकडे, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला पराभूत झालेल्या उमेदवारांनी घेतलेल्या मंथन बैठकीत पक्षांतराचा सूर उमटल्याचेमाहितीआहे. तर पक्षांतर्गत गटबाजीमुळेच आमचा पराभव झाला. तसेच जिल्ह्यातील पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने जाणूनबुजून दुर्लक्ष केल्याचा शिवसैनिकांचा आरोप आहे. पक्षातीलच काही महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी गद्दारी करत अधिकृत उमेदवारांना पराभूत करण्यासाठी काम केल्यामूळे ठाकरेंच्याशिवसेनेत नाराजी वाढली आहे. तर तिन्ही तालुक्यांतील जवळपास शंभरच्या आसपास पराभूत उमेदवार पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचीमाहितीराजकीयवर्तुळातरंगूलागलीआहे.

Shivsena UBT : खासदार ओमराजे निंबाळकर यांना मोठा राजकीय धक्का बसण्याची शक्यता

दरम्यान, या संभाव्य पक्षांतरामुळे धाराशिव जिल्ह्यात खासदार ओमराजे निंबाळकर यांना मोठा राजकीय धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता या नाराज गटाची पुढील भूमिका काय असेल? ते कोणत्या पक्षात प्रवेश करणार? आणि जिल्ह्यातील राजकीय समीकरणे कशी बदलणार? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

धाराशिव जिल्हा परिषद पक्षनिहाय आघाडी(Dharashiv Zilla Parishad 2026)

एकूण जागा - 55

भाजपा  -18शिवसेना शिंदे गट - 15शिवसेना ठाकरे गट - 8राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट - 6अपक्ष - 4काँग्रेस - 3समाजवादी पक्ष - 1

 इतर महत्वाच्या बातम्या