Dharashiv Shivsena UBT : पक्षांतर्गत गटबाजी, वरिष्ठ नेतृत्वाकडून जाणूनबुजून दुर्लक्ष, शिवसैनिकांचा गंभीर आरोप; धाराशिवमध्ये पराभवानंतर ठाकरेंच्या सेनेला खिंडार पडणार?
Dharashiv Zilla Parishad 2026 : धाराशिव जिल्ह्यात भूम, परांडा आणि वाशी तालुक्यात ठाकरे शिवसेनेला खिंडार पडणार का? असा सवाल राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

Dharashiv Zilla Parishad 2026 : धाराशिव जिल्हा परिषद पंचायत समितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena UBT) पक्षाला पराभवाला समोर जावं लागलय. दरम्यान या पराभवानंतर पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये खदखद असल्याची माहिती समोर आली आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने दुर्लक्ष केल्यानं पक्षात गटबाजी झाली आणि त्यामुळे आपला पराभव झाला, अशी भावना कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये आहे. दरम्यान पदाधिकारी पक्षांतराच्या तयारीत असल्याचीही माहिती समोर आली आहे.
Dharashiv Shivsena UBT : पराभूत उमेदवारांची पक्षांतराची तयारी, धाराशिव जिल्ह्यात ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार पडणार?
दरम्यान, धाराशिव जिल्ह्यात भूम, परांडा आणि वाशी तालुक्यात ठाकरे शिवसेनेला खिंडार पडणार का? असा सवाल राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. निवडणूक लढलेले पदाधिकारी खासदार ओमराजे निंबाळकर यांची साथ सोडण्याच्या तयारीत असल्याचेही बोललं जात आहे. सध्याची राजकीय घडामोड बघता भूम, परंडा आणि वाशी तालुक्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची चिन्हे दिसत आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांनी आता पक्षांतराची तयारी सुरू केल्याची माहिती समोर आली आहे.
Dharashiv Zilla Parishad 2026 : वरिष्ठ नेतृत्वाने जाणूनबुजून दुर्लक्ष , पक्षांतर्गत गटबाजीमुळेच आमचा पराभव झाला
दुसरीकडे, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला पराभूत झालेल्या उमेदवारांनी घेतलेल्या मंथन बैठकीत पक्षांतराचा सूर उमटल्याचे माहिती आहे. तर पक्षांतर्गत गटबाजीमुळेच आमचा पराभव झाला. तसेच जिल्ह्यातील पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने जाणूनबुजून दुर्लक्ष केल्याचा शिवसैनिकांचा आरोप आहे. पक्षातीलच काही महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी गद्दारी करत अधिकृत उमेदवारांना पराभूत करण्यासाठी काम केल्यामूळे ठाकरेंच्या शिवसेनेत नाराजी वाढली आहे. तर तिन्ही तालुक्यांतील जवळपास शंभरच्या आसपास पराभूत उमेदवार पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
Shivsena UBT : खासदार ओमराजे निंबाळकर यांना मोठा राजकीय धक्का बसण्याची शक्यता
दरम्यान, या संभाव्य पक्षांतरामुळे धाराशिव जिल्ह्यात खासदार ओमराजे निंबाळकर यांना मोठा राजकीय धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता या नाराज गटाची पुढील भूमिका काय असेल? ते कोणत्या पक्षात प्रवेश करणार? आणि जिल्ह्यातील राजकीय समीकरणे कशी बदलणार? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
धाराशिव जिल्हा परिषद पक्षनिहाय आघाडी (Dharashiv Zilla Parishad 2026)
एकूण जागा - 55
भाजपा -18
शिवसेना शिंदे गट - 15
शिवसेना ठाकरे गट - 8
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट - 6
अपक्ष - 4
काँग्रेस - 3
समाजवादी पक्ष - 1
इतर महत्वाच्या बातम्या
























