Dharashiv News : धाराशिवमध्ये आमदार तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांना डावलून जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेचा भाजपच्या (BJP) हालचाली दिसताच आमदार तानाजी सावंत यांनी सावध पवित्राघेतल्याचेदिसूनआलंय. अशातच आमदार तानाजी सावंत यांनी तातडीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतलीआहे. जिल्हा परिषद निकालानंतर पहिल्यांदाच तानाजी सावंत मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला दाखलझालेत. एकीकडे भाजपकडून शिवसेनेच्या (Shiv Sena) एका गटाला सोबत घेत तानाजी सावंतांना वगळून जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेची रणनीती सुरू होती. त्यामुळे भाजपसोबत शिवसेनेतूनही तानाजी सावंत यांनी निवडणुकीत फिक्सिंग केल्याचा आरोप केलाहोता. तर ठाकरे गटाशी तानाजी सावंत यांनी हात मिळवणी केल्याचा शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्यांनी ही आरोप केलाहोता. (Dharashiv News)
Dharashiv BJP vs Shivsena : तानाजी सावंत यांची तक्रार, एकनाथ शिंदे जिल्हा भाजपवर नाराज
अशातच, यासर्वपार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांची भेट घेत भाजप विरोधात तानाजी सावंतांनी तक्रार केलीआहे. भाजपने शिवसेनेचे दोन सदस्य पळवल्याची तक्रार यावेळीकेल्याचीमाहितीआहे. आ. तानाजी सावंत यांच्या तक्रारीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जिल्हा भाजपवर नाराज असून सत्ता स्थापनेबद्दल कोणतीही चर्चा करू नका, अशासूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडूनदेण्यातआल्याआहेत.
Dharashiv News: बहुमतासाठी आकडेमोड
सध्याच्या राजकीय गणितानुसार दोन प्रमुख समीकरणे चर्चेत आहेत.
समीकरण 1 (भाजपच्या बाजूने):
भाजप – 19
शिवसेना (शिंदे गटातील सावंत समर्थक वगळून) – 7
राष्ट्रवादी (अजित पवार गट) – 6
अपक्ष – 3
एकूण: 35
समीकरण 2 (भाजपविरोधी आघाडी):
शिवसेना (शिंदे गट) – 15
ठाकरे गटाची शिवसेना + काँग्रेस – 10
अपक्ष – 3
एकूण: 28 (मॅजिक फिगर)
यामुळे भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी दोन्ही शिवसेना एकत्र येणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Dharashiv News: निकालाचा आढावा
धाराशिव जिल्हा परिषदेत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. भाजप 19 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. शिंदे गटाच्या शिवसेनेला 15 जागा, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 6 जागांवर यश मिळाले आहे. ठाकरे गटाच्या शिवसेनेला केवळ 7 जागांवर समाधान मानावे लागले असून काँग्रेसला 3 जागा मिळाल्या आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मात्र एकही जागा जिंकता आलेली नाही.
आणखी वाचा
