एक्स्प्लोर

Dharashiv News: शिवसेनेच्या एका गटाला सोबत घेत भाजपकडून धाराशिवमध्ये सत्ता स्थापनेची रणनीती; तानाजी सावंतांचा सावध पवित्र, मुंबईत एकनाथ शिंदेंच्या भेटीला

Dharashiv News Shiv Sena Tanaji Sawant meeting with Eknath Shinde in Mumbai OVER cautious BJP strategy to form government (Tanaji Sawant)

Dharashiv News : धाराशिवमध्ये आमदार तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांना डावलून जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेचा भाजपच्या (BJP) हालचाली दिसताच आमदार तानाजी सावंत यांनी सावध पवित्रा घेतल्याचे दिसून आलंय. अशातच आमदार तानाजी सावंत यांनी तातडीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतली आहे. जिल्हा परिषद निकालानंतर पहिल्यांदाच तानाजी सावंत मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला दाखल झालेत. एकीकडे भाजपकडून शिवसेनेच्या (Shiv Sena) एका गटाला सोबत घेत तानाजी सावंतांना वगळून जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेची रणनीती सुरू होती. त्यामुळे भाजपसोबत शिवसेनेतूनही तानाजी सावंत यांनी निवडणुकीत फिक्सिंग केल्याचा आरोप केला होता. तर ठाकरे गटाशी तानाजी सावंत यांनी हात मिळवणी केल्याचा शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्यांनी ही आरोप केला होता. (Dharashiv News) 

Dharashiv BJP vs Shivsena : तानाजी सावंत यांची तक्रार, एकनाथ शिंदे जिल्हा भाजपवर नाराज

अशातच, या सर्व पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांची भेट घेत भाजप विरोधात तानाजी सावंतांनी तक्रार केली आहे. भाजपने शिवसेनेचे दोन सदस्य पळवल्याची तक्रार यावेळी केल्याची माहिती आहे. आ. तानाजी सावंत यांच्या तक्रारीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जिल्हा भाजपवर नाराज असून सत्ता स्थापनेबद्दल कोणतीही चर्चा करू नका, अशा सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून देण्यात आल्या आहेत.

Dharashiv News: बहुमतासाठी आकडेमोड

सध्याच्या राजकीय गणितानुसार दोन प्रमुख समीकरणे चर्चेत आहेत.

समीकरण 1 (भाजपच्या बाजूने):

भाजप – 19

शिवसेना (शिंदे गटातील सावंत समर्थक वगळून) – 7

राष्ट्रवादी (अजित पवार गट) – 6

अपक्ष – 3

एकूण: 35

समीकरण 2 (भाजपविरोधी आघाडी):

शिवसेना (शिंदे गट) – 15

ठाकरे गटाची शिवसेना + काँग्रेस – 10

अपक्ष – 3

एकूण: 28 (मॅजिक फिगर)

यामुळे भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी दोन्ही शिवसेना एकत्र येणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Dharashiv News: निकालाचा आढावा

धाराशिव जिल्हा परिषदेत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. भाजप 19 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. शिंदे गटाच्या शिवसेनेला 15 जागा, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 6 जागांवर यश मिळाले आहे. ठाकरे गटाच्या शिवसेनेला केवळ 7 जागांवर समाधान मानावे लागले असून काँग्रेसला 3 जागा मिळाल्या आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मात्र एकही जागा जिंकता आलेली नाही.

आणखी वाचा 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दादाविना अर्थ नसलेला अर्थसंकल्प, संपूर्ण राज्याला त्यांची उणीव जाणवेल, अर्थसंकल्पापूर्वी मिटकरींची भावूक प्रतिक्रिया 
दादाविना अर्थ नसलेला अर्थसंकल्प, संपूर्ण राज्याला त्यांची उणीव जाणवेल, अर्थसंकल्पापूर्वी मिटकरींची भावूक प्रतिक्रिया 
Rajya Sabha Election : राज्यसभेत आजोबांसह नातवाचीही एन्ट्री, एकाच कुटुंबातील तीन खासदार, राजकारणात नवे समीकरण
राज्यसभेत आजोबांसह नातवाचीही एन्ट्री, एकाच कुटुंबातील तीन खासदार, राजकारणात नवे समीकरण
महाराष्ट्रानं दिलेलं प्रेम, विश्वास आणि पाठबळ हेच आयुष्याच्या ऊर्जेचे खरे स्रोत, शरद पवारांनी मित्रपक्षांचे मानले आभार 
महाराष्ट्रानं दिलेलं प्रेम, विश्वास आणि पाठबळ हेच आयुष्याच्या ऊर्जेचे खरे स्रोत, शरद पवारांनी मित्रपक्षांचे मानले आभार 
अपणा अजेंडा क्लियर है, भाजप को दबाना है! शिंदेसेनेत प्रवेश करण्याआधीच उन्मेष पाटलांची क्लीप व्हायरल, भाजप आमदाराच आक्षेप
अपणा अजेंडा क्लियर है, भाजप को दबाना है! शिंदेसेनेत प्रवेश करण्याआधीच उन्मेष पाटलांची क्लीप व्हायरल, भाजप आमदाराच आक्षेप
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Arjun Tendulkar Marriage : अर्जुनची नवी इनिंग, सेलिब्रिटी वऱ्हाडी Special Report
Nitish Kumar Rajyasabha Bihar : राज्यसभेत नितीशकुमार, भाजपसाठी मोकळं बिहार Special Report
Jyoti Waghmare Rajysabha : राज्यसभेत वाघमारे आणि नाराजीचे नगारे Special Report
Maharashtra Rajyasabha Election : सर्वांचा विजय पक्का 'बिनविरोध'वर शिक्का Special Report
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jishnu Dev Varma : महाराष्ट्राचे नवे राज्यपाल, कोण आहेत जिष्णू देव वर्मा? त्रिपुरा ते मुंबई, राजकीय प्रवासाची कहाणी!
महाराष्ट्राच्या राज्यपालपदी जिष्णू देव वर्मांची नियुक्ती; त्रिपुराच्या राजघराण्याशी संबंधित, कशी आहे राजकीय कारकीर्द
Sanju Samson : संजू सॅमसनचा सलग दुसऱ्या मॅचमध्ये धडाका, रोहित शर्माला मागं टाकलं, भारताकडून टी 20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार संजूच्या नाववार 
संजू सॅमसननं रोहित शर्माचा विक्रम मोडला, भारताकडून टी 20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम नावावर नोंदवला
भारताचा 7 धावांनी विजय, शोएब अख्तरनं विजयाचं श्रेय कोणाला दिलं? टीम इंडियाच्या दोन खेळाडूंचं नाव घेत म्हणाला...
भारताचा इंग्लंडवर 7 धावांनी विजय,मोहम्मद कैफ आणि शोएब अख्तरकडून भारताच्या दोन खेळाडूंचं कौतुक, टीम इंडियाचं अभिनंदन करत म्हणाला...
Rajya Sabha Election : राज्यसभेत आजोबांसह नातवाचीही एन्ट्री, एकाच कुटुंबातील तीन खासदार, राजकारणात नवे समीकरण
राज्यसभेत आजोबांसह नातवाचीही एन्ट्री, एकाच कुटुंबातील तीन खासदार, राजकारणात नवे समीकरण
Iran : इराणची होर्मुझच्या सामुद्रधुनीसंदर्भात मोठी खेळी, भारताला फायदा होणार, अमेरिका- इस्त्रायलची कोंडी करण्याचा प्लॅन
इराणची होर्मुझच्या सामुद्रधुनीसंदर्भात मोठी खेळी, भारताला फायदा होणार, अमेरिका- इस्त्रायलची कोंडी करण्याचा प्लॅन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 मार्च 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 मार्च 2026 | गुरुवार
BMC Election : गिरणगावातील प्रभाग समितीच्या निवडणुकीत ठाकरेंना धक्का, समाजवादी पक्षाच्या मदतीने महायुतीची बाजी
गिरणगावातील प्रभाग समितीच्या निवडणुकीत ठाकरेंना धक्का, समाजवादी पक्षाच्या मदतीने महायुतीची बाजी
Share Market: सेन्सेक्समध्ये 900 अंकांची उसळी, गुंतवणूकदारांनी 6 लाख कोटी कमावले,शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक 
सेन्सेक्समध्ये 900 अंकांची उसळी, गुंतवणूकदारांनी 6 लाख कोटी कमावले,शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक
Embed widget