Tanaji Sawant धाराशिव : खरीप पीक विमा 2025च्या भरपाईतील तफावतीवरून आमदार तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी थेट वाशीच्या तहसीलदारांना फोन करून शेतकऱ्यांवर होणारा अन्याय खपवून घेतला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा दिला आहे. तहसीलदारांनी विमा प्रश्नात लक्ष न घातल्याने तानाजी सावंत आक्रमक झाल्याचे पाहायला मिळालेय. 'लोकांचे संसार जळायला लागलेत आणि तुम्ही बघून घेता, म्हणजे का तुम्ही संवेदनशील नाहीत का?' असा सवाल त्यांनी तहसीलदारांना केला. तानाजी सावंत आणि तहसीलदार यांच्या संवादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींशी तातडीने चर्चा करून भरपाईतील तफावतीचा जाब विचारावा तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची जास्तीत जास्त भरपाई मिळण्यासाठी त्वरित कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी दिले. (Tanaji Sawant on Crop Insurance Scheme)
दरम्यान, शेजारच्या तालुक्यांमध्ये प्रति हेक्टर सुमारे 20 हजार रुपयांपर्यंत विमा मंजूर झाला असताना, भूम-परांडा-वाशी मतदारसंघातील अनेक महसुली मंडळांमध्ये केवळ 900 ते 3,500 रुपयांपर्यंतच भरपाई जाहीर झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
