Dharashiv News : धाराशिवची शिवसेना (Shivsena) भाजप आमदारांनी हायजॅक केल्याचा आरोप केल्या प्रकरणी अविनाश खापे यांच्यावर पक्षातून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. शिवसेनेचे संपर्कप्रमुख राजन साळवी (Rajan Salvi) आणि युवा सेनेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अविनाश खापे यांच्यातील संवादाची क्लिप व्हायरल झाली होती. शिवसेनेची जिल्हा परिषदेची तिकिटे भाजप (BJP) आमदार आणि त्यांचे पुत्रांनी वाटल्याचं या ऑडिओ क्लिपमध्ये नमूद करण्यात आलं होतं. दरम्यान, हि ऑडिओ क्लिप वायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती.

Continues below advertisement

दरम्यान, या विषयी पालकमंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी खापेंवर कारवाईचे संकेत देखील दिले होते. शिवाय, पक्षविरोधी काम करत पक्षाची प्रतिमा मलिन केल्याचा ठपका ठेवत आता अविनाश खापे यांचं निलंबन करण्यात आलं आहे. युवा सेना सचिव राहुल लोंढे यांनी पत्र काढत खापेंना निलंबित करण्यात आलं.

Rajan Salvi Audio Clip : राजन साळवी यांच्यातील ऑडिओ क्लिप समाज माध्यमावर व्हायरल

Continues below advertisement

धाराशिवमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जिल्हा परिषद तिकीट वाटपावरून मोठा गोंधळ सुरू असतानाच समाज माध्यमावर युवा सेनेचे राष्ट्रीय सदस्य अविनाश खापे व शिवसेनेचे संपर्कप्रमुख राजन साळवी यांच्यातील ऑडिओ क्लिप समाज माध्यमावर व्हायरल झाली होती. या ऑडिओ क्लिपमध्ये शिवसेना कार्यकर्त्यांनी जिल्हा संपर्कप्रमुख राजन साळवी यांच्यावर गंभीर आरोप केले असून राजन साळवी यांनी शिवसेनेची तिकीट भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील व त्यांचे पुत्र मल्हार पाटील यांच्याकडे नेऊन दिली आहेत व तेच त्यांच्या कार्यकर्त्यांना शिवसेनेत उभा करत असल्याचा आरोप राजन साळवी यांच्यावर केला. दरम्यान, राजन साळवी यांनीही मी तिकीट त्यांच्याकडे दिली असल्याची कबुली या कार्यकर्त्यांना बोलताना दिली आहे. या अगोदर राजन साळवी यांनी तिकीट वाटपात गोंधळ घालत भारतीय जनता पार्टीच्या नेत्याच्या मनावरच धाराशिव जिल्ह्यातील तिकीट विकल्याचा आरोप शिवसेनिकांनी केला होता. त्यात तिकीट वाटपावरून धाराशिव कळंब तुळजापूर या तीन तालुक्यात मोठा शिवसेनेत गोंधळ पाहायला मिळाला. त्यातच ही ऑडिओ क्लिप वायरल झाले असून यात अनेक गंभीर आरोप राजन साळवी यांच्यावर करण्यात आले होते.

दरम्यान याच विषयावर ज्यांची ही ऑडिओ क्लिप वायरल झाली आहे ते शिवसेनेचे युवा सेनेचे राष्ट्रीय सदस्य अविनाश खापे यांचीही बाजू आम्ही जाणून घेतली आहे त्यावर त्यांनी ही क्लिप आमची च आहे असे सांगत साळवी यांच्यावर गंभीर आरोप केले होते.