Dharashiv BJP: धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यात भारतीय जनता पक्षात (Bharatiya Janata Party) अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा उघडपणे समोर आली आहे. धाराशिव-लातूर-बीड (Dharashiv-Latur-Beed) स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर (Legislative Council) नुकतेच निवडून आलेले आमदार बसवराज पाटील (Basavaraj Patil) यांच्या सत्कार सोहळ्यावरून पक्षातील मतभेद उघड झाले आहेत. या कार्यक्रमाच्या स्वागत पत्रिका आणि अधिकृत बॅनरवरून भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील (Rana Jagjitsinh Patil) यांचे नाव वगळण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, नुकतेच महायुतीत (Mahayuti) सहभागी झालेले खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांची कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती ठेवण्यात आली होती. त्यामुळे भाजपमधील अंतर्गत राजकारणाची चर्चा अधिक रंगली आहे.

Continues below advertisement

Dharashiv BJP: 'जुन्या भाजप कार्यकर्त्यांना राणा पाटील टाळतात'

भाजपचे ज्येष्ठ नेते व्यंकटराव गुंड यांनी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी म्हटले की, राणा पाटील यांना जनसंघ काळापासून पक्षाशी निष्ठा ठेवणाऱ्या जुन्या भाजप कार्यकर्त्यांची ऍलर्जी आहे. राणा पाटील जुन्या आणि निष्ठावंत भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना टाळतात. त्यामुळे आम्हीही त्यांना टाळत आहोत. तसेच, जिल्हा परिषद निवडणुकीत हेतुपुरस्सर उमेदवारी नाकारल्याचाही आरोप त्यांनी केला. 

Dharashiv BJP: 'पक्षाध्यक्षांनाही नाराजी कळवली'

पक्षातील घडामोडींविषयीची नाराजी त्यांनी पक्षाध्यक्षांच्या कानावरही घातली आहे, अशी माहिती देखील व्यंकटराव गुंड यांनी दिली आहे. आम्ही भारतीय जनता पक्षाचे आहोत आणि भारतीय जनता पक्षातच राहणार आहोत. मात्र आमच्या मनातील नाराजी पक्षाध्यक्षांनाही सांगितली आहे, असे त्यांनी म्हटले. 

Continues below advertisement

Dharashiv BJP: 'पक्षाध्यक्षांना डावलून पत्नीला जिल्हा परिषद अध्यक्ष केले'

राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर आणखी एक गंभीर आरोप करत व्यंकटराव गुंड म्हणाले की, "पक्षाध्यक्षांना डावलून राणा पाटील यांनी आपल्या पत्नीला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष केले." तर, व्यंकटराव गुंड यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, "राणा पाटील यांच्या विरोधातील खदखद पुढेही सुरू राहणार आहे. आम्ही चुकीचे असू तर पक्ष आमच्यावर कारवाई करेल." दरम्यान, या वक्तव्यानंतर धाराशिव भाजपमधील अंतर्गत संघर्ष आता उघडपणे समोर आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Chhagan Bhujbal and Girish Mahajan: नाशिकच्या खड्ड्यांवरून महायुतीतील दोन मंत्र्यांमध्ये जुंपली; गिरीश महाजनांशी अबोला? छगन भुजबळांनी सगळंच सांगितलं, म्हणाले...

Ambernath Shiv Sena News: 'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली, शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका