एक्स्प्लोर

Dhananjay Munde Speech : वैर माझ्याशी होतं, माझ्या मातीची बदनामी का? धनंजय मुंडेंचं 200 दिवसांनी विरोधकांना शेरोशायरीतून उत्तर; म्हणाले, जुबान काट लो लहजा...

Dhananjay Munde Speech : मी बऱ्याच दिवसांनी बोलतोय. न बोलण्याची डबल सेंच्युरी माझी झाली आहे. 200 दिवस न बोलता काढले आहेत, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

Dhananjay Munde Speech : "तुम्हारी सोच के सांचे में ढल नहीं सकता, जुबान काट लो लहजा बदल नहीं सकता, अरे मुझे भी मोम का पुतला समझ रहे हो क्या? तुम्हारे लोह से ये लोहा पिघल नहीं सकता," अशी शेरोशायरी करत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्या उपस्थितीत बीडमध्ये निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यातून धनंजय मुंडे यांनी विरोधकांवर निशाणा साधला.  

धनंजय मुंडे म्हणाले की, मी तटकरे साहेबांना विनंती केली होती की, मला आज भाषण करायचे नाही. कारण सांगितले नाही पण तुमच्यासमोर कारण सांगावे लागेल. इथं बोलावं की मैदानात बोलावं हा प्रश्न माझ्या मनात होता. म्हणून आज आपल्या सर्वांचे क्षमा मागून इथे आपण ज्या कामासाठी आलेलो आहोत ते आपल्याला माहित आहे. आजपर्यंत ते करत आलोय हे देखील आपल्याला माहित आहे. बीडचा आगळावेगळा इतिहास आपल्या संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्राला दाखवावा याच अपेक्षेने ते आज आले आहेत.आपण सर्वजण मिळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बीड जिल्ह्याच्या प्रति असणारी अपेक्षा नक्कीच पूर्ण करू, असे वचन आपण तटकरे साहेबांना देऊ, असे त्यांनी म्हटले.  

वैर माझ्याशी होतं, माझ्या मातीची बदनामी का?

धनंजय मुंडे पुढे म्हणाले की, बऱ्याच दिवसांनी मी बोलतोय. न बोलण्याची डबल सेंच्युरी माझी झाली आहे. 200 दिवस न बोलता काढले आहेत. या दोनशे दिवसांमध्ये ज्या ज्या गोष्टी झाल्या, त्यापैकी एक गोष्ट मला नक्कीच जिव्हारी लागली. ती म्हणजे आपल्या बीड जिल्ह्याची बदनामी. ज्यांनी कोणी केली, भलेही तो बीडच्या मातीतला असेल, बीडच्या मातीच्या बाहेरचा असेल, त्यांना एवढंच सांगायचं वैर जर माझ्याशी होतं तर माझ्या या मातीची बदनामी का? त्यांना एवढं सांगणं आहे. 

जुबान काट लो लहजा...

ज्यांनी ज्यांनी बाहेरून येऊन या जिल्ह्यात मधल्या काळात एक घटना, एक व्यक्ती, एक जिल्हा, एक माती, एक मतदारसंघ अशा पद्धतीने बदनामी केली. त्यांच्या प्रति चार ओळी म्हणणार आहे. तुम्हारी सोच के सांचे में ढल नहीं सकता, जुबान काट लो लहजा बदल नही सकता, अरे मुझे भी मोम का पुतला समझ रहे हो क्या? तुम्हारे लोह से ये लोहा पिघल नहीं सकता, अशी शेरोशायरी करत धनंजय मुंडेंनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे. 

आणखी वाचा

परळीच्या बंगल्यावरून फोन येताच तपास थांबवला; विष प्राशन केलेल्या ज्ञानेश्वरी मुंडेंचा सनसनाटी आरोप, वाल्मिक कराडच्या चौकशीची मागणी

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ratnagiri Bauxite Mining Project: बागायतींपासून पाण्यापर्यंत सर्वकाही धोक्यात, गंभीर आजारांचंही सावट, रत्नागिरीतील बॉक्साईट प्रकल्पाला ठाकरे गटाचा तीव्र विरोध, कोकणात पुन्हा 'रिफायनरी'सारखा लढा?
बागायतींपासून पाण्यापर्यंत सर्वकाही धोक्यात, गंभीर आजारांचंही सावट, रत्नागिरीतील बॉक्साईट प्रकल्पाला ठाकरे गटाचा तीव्र विरोध, कोकणात पुन्हा 'रिफायनरी'सारखा लढा?
Vijay Wadettiwar on Navneet Rana: 'नवनीत राणा जातीय विष पसरवणारी विषवल्ली', विजय वडेट्टीवारांची बोचरी टीका, 'हिरवे साप' म्हणत राणांचा पलटवार
'नवनीत राणा जातीय विष पसरवणारी विषवल्ली', विजय वडेट्टीवारांची बोचरी टीका, 'हिरवे साप' म्हणत राणांचा पलटवार
Anil Parab : मुंबईत MMRDA च्या टेंडर प्रक्रियेत फिक्सिंगचा आरोप, आठपैकी सहा कंपन्यांना माघार घ्यायला लावली, अनिल परबांचा गंभीर आरोप
मुंबईत MMRDA च्या टेंडर प्रक्रियेत फिक्सिंगचा आरोप, आठपैकी सहा कंपन्यांना माघार घ्यायला लावली, अनिल परबांचा गंभीर आरोप
Eknath Shinde Shivena: एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत नाराजीचा व्हायरस पसरला, युवासेनेच्या कार्यक्रमात शिंदेंच्या खास माणसालाच डावललं, स्टेजवर बोलावलंच नाही
शिंदेंच्या शिवसेनेत नाराजीचा व्हायरस, युवासेनेच्या कार्यक्रमात शिंदेंच्या खास माणसालाच डावललं, स्टेजवर बोलावलंच नाही

व्हिडीओ

Shyam Manav Akola : अशोक खरात प्रकरण सरकारचंच पाप, श्याम मानव यांची प्रतिक्रिया
Vijay Wadettiwar PC : नवनीत राणा जातीय विष पेरण्यासाठी पोसलेली आणि पाणी घालून जिवंत ठेवणारी विषवल्ली
Vishwas Nangare Patil : 5 मिनिटात प्रेरणादायी विचार नांगरे पाटलांचे कोकरूडमधील भाषण
Rohit Pawar Latur : VSR कंपनीच्या मालकांना सरकार एवढे का घाबरत आहे? रोहित पवार यांचा सवाल
PM Modi UNCUT : काँग्रेसने महिलांच्या अधिकारांची भ्रूणहत्या केली, स्वप्नांचा चक्काचूर केला- मोदी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: मृतदेहासोबत चक्क '8888' नंबरची आलिशान कार सुद्धा दफन! भलत्याच अखेरच्या निरोपाने एकच खळबळ; वाद वाढल्यानंतर प्रशासनाने गंभीर दखल घेताच आता भेदरलेल्या कुटुंबीयांनी..
Video: मृतदेहासोबत चक्क '8888' नंबरची आलिशान कार सुद्धा दफन! भलत्याच अखेरच्या निरोपाने एकच खळबळ; वाद वाढल्यानंतर प्रशासनाने गंभीर दखल घेताच आता भेदरलेल्या कुटुंबीयांनी..
Sharad Ponkshe : मराठा साम्राज्य अटकेपार नेणाऱ्या बाजीराव पेशव्यांवर साधी एक सिरीयल येत नाही, फक्त मस्तानी... शरद पोंक्षेंच्या मनातली खंत
मराठा साम्राज्य अटकेपार नेणाऱ्या बाजीराव पेशव्यांवर साधी एक सिरीयल येत नाही, फक्त मस्तानी... शरद पोंक्षेंच्या मनातली खंत
Ajit Agarkar: अनेक धाडसी निर्णयांनी चकित केलेल्या अजित आगरकरांना बीसीसीआयकडून मोठं गिफ्ट, पण रोहित, विराट अन् शमीसह अनेकांना बॅड न्यूज!
अनेक धाडसी निर्णयांनी चकित केलेल्या अजित आगरकरांना बीसीसीआयकडून मोठं गिफ्ट, पण रोहित, विराट अन् शमीसह अनेकांना बॅड न्यूज!
दोरीने हात बांधलेल्या अवस्थेत विहिरीतून सख्ख्या बहिणींचे मृतदेह बाहेर काढले; गावात सन्नाटा, पोलीसही चक्रावले
दोरीने हात बांधलेल्या अवस्थेत विहिरीतून सख्ख्या बहिणींचे मृतदेह बाहेर काढले; गावात सन्नाटा, पोलीसही चक्रावले
Ravichandran Ashwin: चेन्नईचा सरसेनापती बदलणार? आयपीएलच्या मध्यावरच आर. आश्विनच्या भविष्यवाणीने खळबळ
चेन्नईचा सरसेनापती बदलणार? आयपीएलच्या मध्यावरच आर. आश्विनच्या भविष्यवाणीने खळबळ
घरच्या मैदानात आरसीबी हरताच कॅप्टन रजत पाटीदारचा संताप अनावर; नेमकं काय म्हणाला?
घरच्या मैदानात आरसीबी हरताच कॅप्टन रजत पाटीदारचा संताप अनावर; नेमकं काय म्हणाला?
Video: बाॅम्बवर्षावातही माऊलीची नवजात बालकांना वाचवण्याची धडपड, जीवाच्या आकांताने पळापळ, आयसीयूतील रुग्ण रस्त्यावर; इराणी हॉस्पिटलवर अमेरिका-इस्त्रायलच्या नरसंहार हल्ल्याचा सव्वा दोन मिनिटांचा भयावह व्हिडिओ
Video: बाॅम्बवर्षावातही माऊलीची नवजात बालकांना वाचवण्याची धडपड, जीवाच्या आकांताने पळापळ, आयसीयूतील रुग्ण रस्त्यावर; इराणी हॉस्पिटलवर अमेरिका-इस्त्रायलच्या नरसंहार हल्ल्याचा सव्वा दोन मिनिटांचा भयावह व्हिडिओ
IPL 2026 Points Table: चेन्नईविरुद्धच्या विजयानंतर गुणतालिकेत हैदराबादची मोठी झेप; ‘हा’ संघ बाहेर पडणार? पाहा कोणता संघ कोणत्या स्थानावर?
चेन्नईविरुद्धच्या विजयानंतर गुणतालिकेत हैदराबादची मोठी झेप; ‘हा’ संघ बाहेर पडणार? पाहा कोणता संघ कोणत्या स्थानावर?
Embed widget