एक्स्प्लोर

Dhananjay Munde on Ajit Pawar: आज इथे अजितदादा असते तर...; फडणवीसांसमोर धनंजय मुंडेंना भर भाषणात अजित पवारांची आठवण; नेमकं काय म्हणाले?

Dhananjay Munde on Ajit Pawar: परळी वैजनाथ येथे आयोजित महापशुधन एक्स्पोच्या कार्यक्रमात बोलताना धनंजय मुंडे यांनी दिवंगत अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला.

Dhananjay Munde on Ajit Pawar: आज इथे अजितदादा असते तर त्यांना देखील या कार्यक्रमाचा आनंद झाला असता. शेतकरी पशुधनवर अजित दादांचे प्रेम होते, असे वक्तव्य करत माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासमोर अजित पवारांच्या आठवणींना उजाळा दिलाय. परळी वैजनाथ येथे आयोजित महापशुधन एक्स्पोत ते बोलत होते.  

धनंजय मुंडे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नातून हा महापशुधन एक्स्पो होत आहे.देवेंद्र भाऊ महाशिवरात्रीऐवजी व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी या कार्यक्रमाला आले. प्रभू वैद्यनाथ देवाभाऊंना आपल्या सगळ्यांपेक्षा चांगलं आरोग्य देवो, अशी प्रार्थना करतो. आज इथे अजितदादा असते तर त्यांना देखील या कार्यक्रमाचा आनंद झाला असता. शेतकरी, पशुधनावर अजितदादांचे प्रेम होते. अजितदादा सकाळी लवकर उठून कामाला लागत होते. कारण ते जनावरांचे दूध काढून विकत होते, ही आठवण मी या ठिकाणी विसरणार नाही, असे त्यांनी म्हटले.

Dhananjay Munde: परळी नगर परिषदेत आम्ही महायुतीतच निवडणूक लढवली

धनंजय मुंडे म्हणाले की पुढे म्हणाले की, 1997 ला गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री असताना माझे वडील अण्णा या ठिकाणी दर महाशिवरात्रीला पशुप्रदर्शन भरवत होते. तुम्ही मुख्यमंत्री होऊन परळीत आलात, याचा आगळा वेगळा आनंद आहे. महापशुधन एक्सपोच्या कार्यक्रमासाठी वडीलधारी नात्यानं मी पंकजाताईंचे कौतुक करतो. हे देवाभाऊ, महायुतीचे सरकार आहे. ज्याप्रमाणे वर महायुतीचे सरकार आहे, त्याचप्रमाणे परळी नगर परिषदेत आम्ही महायुतीतच निवडणूक लढवली आणि जिंकली. इतर ठिकाणी कशी निवडणूक झाली हे मला माहित नाही. आमच्या दृष्टीने तुम्हीच आमचे कामधेनू आहात. कामधेनु गाईसमोर कुठलीही इच्छा मागितली की ती पूर्ण होते. तीर्थक्षेत्र विकास आराखडा योजनेसाठी आपण 100 कोटींची तरतूद या अर्थसंकल्पात ठेवावी, अशी मागणी त्यांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. थर्मलच्या जुन्या जागेवर साडेतीनशे सोलार मेगा वॅट सोलर प्रकल्प उभा करण्याची मागणी केली होती, त्यापैकी 50 मेगा वॅटची मागणी तुम्ही पूर्ण केली. केंद्राच्या प्रसाद योजनेत वैजनाथ ज्योतिर्लिंगाचा समावेश करावा, अशी देखील मागणी त्यांनी केली.

Pankaja Munde: 24 लक्ष तरुणांना उद्योजक बनवण्यासाठी आमच्याकडे योजना : पंकजा मुंडे

या कार्यक्रमात पंकजा मुंडे म्हणाल्या की, सदैव घड्याळाच्या काट्याप्रमाणे काम करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. मुख्यमंत्री साहेब मी तुमच्या आदेश पाळते. पण, युतीमध्ये असल्याने आज सगळ्यांचे नाव घेऊन भाषणाला सुरुवात केली आहे. मला ग्रामविकास आणि जलसंधारण खाते मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यांच्यामुळे जलयुक्त शिवार योजना राबवू शकले. आता मुख्यमंत्र्यांनी मला पशूसंवर्धन विभागाची जबाबदारी दिली आहे. त्यानंतर आम्ही पशुसंवर्धनाला कृषीचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न केले. याला मुख्यमंत्र्यांनी मंजूरी दिली. 24 लक्ष तरुणांना उद्योजक बनवण्यासाठी आमच्याकडे योजना आहे. या माध्यमातून मोठे काम होऊ शकणार आहे. पशुसंवर्धन खाते मला मनापासून आवडले आहे, असे त्यांनी यावेळी म्हटले. 

आणखी वाचा 

Dhananjay Munde: मनभेद विसरून सुनेत्रा वहिनींच्या पाठीशी उभे राहूया; बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत धनंजय मुंडेंची भावनिक साद, नेमकं काय म्हणाले?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Live Blog Updates: माहिमचे सेंट झेवियर्स काॅलेज बाॅम्बने उडवून देण्याची धमकी, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
Live Blog Updates: माहिमचे सेंट झेवियर्स काॅलेज बाॅम्बने उडवून देण्याची धमकी, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
Rohit Pawar: 'लग्नात पाहुणचार करून आलेल्या आणि मिठाला जागणाऱ्या....', नागरी उड्डाण मंत्र्यांवर रोहित पवारांची आगपाखड, आर्थिक संबंधासंह सगळंच काढलं
'लग्नात पाहुणचार करून आलेल्या आणि मिठाला जागणाऱ्या....', नागरी उड्डाण मंत्र्यांवर रोहित पवारांची आगपाखड, आर्थिक संबंधासंह सगळंच काढलं
Eknath Shinde : मुंबईतील अधिवेशन सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला रवाना; भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी खलबतं, 'त्या' अहवालाकडे लक्ष
मुंबईतील अधिवेशन सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला रवाना; भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी खलबतं, 'त्या' अहवालाकडे लक्ष
Satara Election : साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता? भाजपकडे 5, राष्ट्रवादी काँग्रेस 5 आणि शिवसेनेची एका पंचायत समितीत सत्ता
साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता? भाजपकडे 5, राष्ट्रवादी काँग्रेस 5 तर सेनेची एका ठिकाणी सत्ता
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sunetra Pawar Baramati : बारामतीत सुनेत्रा पवारांची निवड बिनविरोध होणार? Special Report
Dubai Airport Attack : दुबईत आगडोंब, आखातात बोंबाबोंब, हवाई वाहतूक विस्कळीत Special Report
Iran Israel Conflict Effect On Maharashtra : युद्धाचे दिवस सतरा, वडा पावलाही खतरा Special Report
Laxman Hake on Baramati : निधनाच्या तिसऱ्या दिवशी शपथ, दु:ख आम्हीच करु का? बारामती निवडणूक लढणार?
Yugendra Pawar Baramati : बारामतीची निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे, सुनेत्रा काकींना साथ देऊ

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime News: शरीरावर वर्मी घाव घातल्याने रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला; सिंहगड रस्ता परिसरात वादातून तरुणाला संपवलं, भरवस्तीत घडली घटना
शरीरावर वर्मी घाव घातल्याने रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला; सिंहगड रस्ता परिसरात वादातून तरुणाला संपवलं, भरवस्तीत घडली घटना
Mira Bhayander Hospital News: आयसीयूमध्ये उपचार घेणाऱ्या महिलेच्या हाताला उंदराने कुरतडले; आता महिलेचा मृत्यू, मीरा-भाईंदरमधील पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
आयसीयूमध्ये उपचार घेणाऱ्या महिलेच्या हाताला उंदराने कुरतडले; आता महिलेचा मृत्यू, मीरा-भाईंदरमधील हादरवणारी घटना
West Bengal : भाजपची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात उमेदवार ठरला 
भाजपची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात उमेदवार ठरला 
Donald Trump : होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं नियंत्रण, इराणची 100 जहाजं बुडवली, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं नियंत्रण, इराणची 100 जहाजं बुडवली, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
Sahitya Akademi Award 2025 : राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही
उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही
Satara Election : साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता? भाजपकडे 5, राष्ट्रवादी काँग्रेस 5 आणि शिवसेनेची एका पंचायत समितीत सत्ता
साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता? भाजपकडे 5, राष्ट्रवादी काँग्रेस 5 तर सेनेची एका ठिकाणी सत्ता
Abhishek Sharma : सनरायजर्स हैदराबादला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता, अभिषेक शर्माकडे संघाचं नेतृत्त्व जाणार, मोठं कारण समोर
सनरायजर्स हैदराबादला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता, अभिषेक शर्माकडे संघाचं नेतृत्त्व जाणार, मोठं कारण समोर
Embed widget