Dhananjay Munde बीड : 'आम्ही दोघं मंत्री झालो तर जमलं नाही, असे बोलत माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी मनातील खंत व्यक्त केल्याचं पाहायला मिळाले. बीडच्या (Beed) सिरसाळा येथील एका कार्यक्रमात तेबोलतहोते. नाईक कुटुंबावर जगदंबा मातेची कृपा आहे. घरातले वसंतराव नाईक (Vasantrao Naik) साहेबांनंतर स्वर्गीय सुधाकरराव नाईक साहेबांना सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होता आलं. या कुटुंबावर जगदंबेचे आशीर्वाद आहेत हे आता तुम्हाला पटलं का नाही? त्याच्यानंतर आदरणीय मनोहर नाईक साहेब आणि आता स्वर्गीय अजित दादांनी माझे जिवलग मित्र इंद्रनील नाईक (Indranil Naik) यांना मंत्री केलं, म्हणजे किती नशीबवान घराणं आहे. असेही माजी मंत्री आणिराष्ट्रवादीचेनेते धनंजय मुंडे म्हणाले.
Dhananjay Munde : या निष्ठेची तुलनाच होऊ शकत नाही
बाबू सिंग महाराज आम्ही किती नशीबवान आहोत, हे आम्हा दोघांनाच माहितीये. हा जगदंबेचा आशीर्वाद आहे आज तुम्ही पूजक आहात. आम्हा दोघांना तसा आशीर्वाद द्या. दोघं मंत्री झालो तर जमलं नाही. एकाला घरी बसावं लागलं. पण एक नक्की आहे पंकजाताई असो मी असो, पद प्रतिष्ठेपेक्षा तुमच आणि माझं नातं हे आगळं वेगळं आहे. जे कधीच तुटू शकत नाही. पद येतील जातील. पण या बंजारा समाज आणि माझ्या समाजाने एवढ्या निष्ठेने सोबत राहिले. या निष्ठेची तुलनाच होऊ शकत नाही, असे देखील धनंजय मुंडे म्हणाले. दोन वाक्यात जर सांगायचं झालं तर "मैदान मे हरा हुआ बाद में कभी भी जीत सकता है, लेकिन जो अपनों का साथ निभाता है वो कभी भी हार नही सकता" वो ये समाज है. म्हणून तुमचं माझं नातं हे सांगायची गरज नाही असेही धनंजय मुंडें यावेळी म्हणाले.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त बीडच्या सिरसाळा येथेया कार्यक्रमाचेआयोजनकरण्यातआलेहोते. राज्याचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेल्या स्व. वसंतराव नाईक साहेबांनी सबंध महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना एकही माणूस उपाशी राहू देणार नाही, अशी ठाम भूमिका घेत अन्न - धान्य संपन्नता आणली. रोजगार हमी योजना राबवून लाखो हातांना रोजगार दिला. प्रशासनावर मजबूत पकड असलेल्या नाईक साहेबांनी शेतकऱ्यांच्या कामांच्या बाबतीत कागद नाही तर शेतकऱ्यांचे पिक महत्वाचे, अशी भूमिका घेऊन सतत शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम केले. आज स्व. नाईक साहेबांची आठवण काढताना श्री क्षेत्र पोहरादेवी गडाचा नाईक कुटुंबाला असलेला आशीर्वाद विसरून चालणार नाही! आजही स्व. अजितदादांच्या संकल्पनेतून नाईक परिवारातील आमचे स्नेही इंद्रनील नाईक हे राज्यमंत्री आहेत. स्व. वसंतराव नाईक साहेबांच्या दूरदृष्टीला स्मरून समाजातील एकही मूल शिक्षणापासून वंचित राहणार नाही, महिलांचे शिक्षण, बंजारा संस्कृतीचे जतन आणि अभिमान बाळगण्याचा संकल्प करण्याचे आवाहन यावेळीधनंजय मुंडे यांनीउपस्थित बांधवांना केले.
इतर महत्वाच्या बातम्या
