एक्स्प्लोर

Dhananjay Munde: मनभेद विसरून सुनेत्रा वहिनींच्या पाठीशी उभे राहूया; बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत धनंजय मुंडेंची भावनिक साद, नेमकं काय म्हणाले?

Dhananjay Munde: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज बीड जिल्हा नियोजन समितीची पहिली बैठक पार पडली. यावेळी धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांच्या निधनाबद्दल शोक प्रस्ताव मांडला.

Dhananjay Munde: बीड जिल्ह्याच्या विकासाचे वर्षानुवर्षे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता सर्वांनी आपापसातील मतभेद बाजूला ठेवून एकत्र येणे गरजेचे आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली वहिनींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी योगदान देऊ, अशी भावनिक साद माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घातली.

उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा नियोजन समितीची पहिली बैठक पार पडली. स्वर्गीय अजित पवार यांच्या निधनानंतर जिल्हा नियोजन समितीची ही पहिलीच बैठक असल्याने वातावरण भावनिक होते. यावेळी धनंजय मुंडे यांनी स्व. अजित पवार यांच्या निधनाबद्दल शोक प्रस्ताव मांडल्यानंतर उपस्थितांना उद्देशून ही भावनिक साद दिली.

Dhananjay Munde: अजितदादांचा मला कायम वडीलकीचा आधार

मुंडे पुढे म्हणाले, “स्व. अजितदादा हे मला कायम वडिलकीचा आधार देणारे होते. माझे आणि त्यांचे नाते अतिशय वेगळे होते. त्यांच्या अकाली जाण्याने केवळ वैयक्तिक नाही तर जिल्ह्याचेही मोठे नुकसान झाले आहे.” दादांनी अल्प काळात बीड जिल्ह्याच्या विकासासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले होते, असे सांगत मुंडे यांनी काही योजनांचा विशेष उल्लेख केला.

Dhananjay Munde: दादांनी मला शब्द दिला होता

ते म्हणाले की, संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजनेअंतर्गत बीड जिल्ह्यात 11 वसतिगृहांच्या उभारणीसाठी 159 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. या संदर्भात अजित पवार यांनी स्वतः मला शब्द दिला होता, अशी आठवणही धनंजय मुंडे यांनी उपस्थितांसमोर सांगितली.

Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची पहिलीच बैठक

दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर त्यांच्या जागी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, तसेच अजित पवार पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यांचे पालकमंत्रीपदही त्यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची ही पहिलीच बैठक असल्याने या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मुंबईहून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीत सहभागी झाल्या. सुनेत्रा पवार यांनी बीड आणि पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठका घेतल्या. 

आणखी वाचा 

Supriya Sule On Rohit Pawar: अजितदादांच्या अपघातावर रोहित पवारांना संशय; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, देवेंद्र फडणवीस...

Sanjay Raut on Bhagat Singh Koshyari : भगतसिंह कोश्यारी एक नंबरचा लफंगा माणूस, नीट धोतर नेसता येत नाही अन् आम्हाला अक्कल शिकवतोय; संजय राऊतांनी धू-धू धुतलं

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Baramati : बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता धूसर? निवडणूक जाहीर होताच नवी अपडेट, नेमकं काय घडलं?
बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता धूसर? निवडणूक जाहीर होताच नवी अपडेट
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
मोठी बातमी! प.बंगालसह 5 राज्यातील विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर; दोन टप्प्यात मतदान, 4 मे रोजी निकाल
मोठी बातमी! प.बंगालसह 5 राज्यातील विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर; दोन टप्प्यात मतदान, 4 मे रोजी निकाल
Baramati and Rahuri By Election : बारामती आणि राहुरीची पोटनिवडणूक जाहीर, 23 एप्रिलला मतदान, मतमोजणी 'या' दिवशी, निवडणुकीचं संपूर्ण वेळापत्रक, जाणून घ्या
बारामती आणि राहुरीची पोटनिवडणूक जाहीर, 23 एप्रिलला मतदान, मतमोजणी 'या' दिवशी, निवडणुकीचं संपूर्ण वेळापत्रक
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Baramati Rahuri Election : बारामती, राहुरीची पोटनिवडणूक 23 एप्रिलला, निवडणूक आयोगाची माहिती
North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
Kishori Pednekar on Ritu Tawde : मुंबईच्या महापौर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का? पेडणेकर आक्रमक
kharg Island Special Report : इराणच्या मुकूटमणीवर अमेरिकेचा शक्तिशाली बॉम्बहल्ला
Election Comission PC : 5 राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार? निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
West Bengal: निवडणूक जाहीर होताच पहिला ओपिनियन पोल आला; पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता? भाजप-तृणमूलमध्येच जोरदार टक्कर
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता? तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार लढत, पहिला ओपिनियन पोल समोर
Adinath Maharaj : तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री गंभीर जखमी, स्वत:वर वार केल्याची माहिती, घटनेमुळं खळबळ
तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री गंभीर जखमी, स्वत:वर वार केल्याची माहिती, घटनेमुळं खळबळ
अधिकाऱ्यांनी जप्त केलेले गॅस सिलेंडर लोकांनी पळवले; गॅस टंचाईने वाद, घटनास्थळी पोलिसांना बोलावलं
अधिकाऱ्यांनी जप्त केलेले गॅस सिलेंडर लोकांनी पळवले; गॅस टंचाईने वाद, घटनास्थळी पोलिसांना बोलावलं
महापौर रितू तावडेंच्या कारवरील लाल-निळे दिवे हटले; विरोधकांच्या टीकेनंतर अधिकाऱ्यांना जाग
महापौर रितू तावडेंच्या कारवरील लाल-निळे दिवे हटले; विरोधकांच्या टीकेनंतर अधिकाऱ्यांना जाग
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
SA vs NZ :  दक्षिण आफ्रिकेनं टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीतील पराभवाचा वचपा काढला, न्यूझीलंडवर 7 विकेटनं दणदणीत विजय
दक्षिण आफ्रिकेनं टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीतील पराभवाचा वचपा काढला, न्यूझीलंडवर 7 विकेटनं दणदणीत विजय
बीड महिला अत्याचारप्रकरणाची मुंबईतून दखल; पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावरही गुन्हा दाखल करण्याचे निर्देश
बीड महिला अत्याचारप्रकरणाची मुंबईतून दखल; पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावरही गुन्हा दाखल करण्याचे निर्देश
West Bengal Election in 2 phases: केरळ, तमिळनाडू एकाच टप्प्यात अन् पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यात मतदान; सीएम ममता अन् केरळात डाव्यांसमोर गड राखण्याचे आव्हान
केरळ, तमिळनाडू एकाच टप्प्यात अन् पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यात मतदान; सीएम ममता अन् केरळात डाव्यांसमोर गड राखण्याचे आव्हान
Embed widget