Dhairyasheel Mohite Patil : सध्या राज्यात पाऊस नसल्यामुळं दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांची पिकं करपू लागली आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारनं राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. दरम्यान, विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीनं पंढरपूरमध्ये मोर्चा काढण्यात आला. यावेळी माढा लोकासभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी 1972 च्या दुष्काळाची आठवण सांगितली. या काळात शरद पवार सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री होते आणि विजयसिंह मोहित पाटील सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. या दोघांनी केलेल्या कामाची माहिती धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगितली आहे. 

Continues below advertisement

नेमकं काय म्हणाले धैर्यशील मोहित पाटील?

1972 साली पडलेल्या दुष्काळावेळी शरद पवारसाहेब सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री होते. आणि विजयसिंह मोहिते पाटील सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते असी माहिती खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिली. सोलापूर जिल्ह्यात आज कुठल्याही गावात जावा जिथे जिथे पाझर तलाव झालेत, साठवण तलाव झालेत तिथे तिथे पवारसाहेब आणि विजयदादा बांधावर गेले होते असे धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले, या प्रकारचे काम या दोन्ही नेतेमंडळींनी केलं आहे. आज अनेक गावं त्याच पाझर तलावांच्या माध्यमातून जगण्याचं काम करतात. जेवढा काही पाऊस पडलाय तेढं पाणी पिण्यासाठी उपयोगी पडत असल्याचे धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले. त्यावेळी फक्त पाझर तलाव बांधण्याचे काम केले नव्हते तर रोजगार देण्याचं काम देखील केल्याचे धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगितले. 

एक रुपयाही न घेता संपूर्ण जिल्ह्याला पाणी पाडले होते

आज सरकार पाणी पिण्यासाठी टँकर देत आहे. तेव्हा शासनाची योजनाच नव्हती कीटँकर देण्याची, कारण पहिलाच दुष्काळ इंग्रजानंतर आपण पाहत होते असे धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगितले. यावेळी सहकारमहर्षी शंकराव मोहित पाटील आणि विदयसिंह मोहिते पाटील यांनी सहकारमहर्षी आणि शंकर साखर कारखान्यांच्या आणि शिवामृत दूध संघाच्या टँकरच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्याला पाणी पाजले होते. एक रुपयाही घेतला नव्हता असे धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगितले. 

Continues below advertisement

सरकारने दुष्काळ जाहीर केला पण....

सुदैवाने सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे. परंतू जीआर वाचल्यानंतर असे कळते की सर्वे करायला सांगितला आहे. जीओ टँगींग करायला सांगितले आहे. कोणतेही ठोस आश्वासन दिलेलं नाही. ना कर्जमाफीचे दिलेलं नाही. शेतकऱ्यांना काय उपलब्ध करुन देणार हे दिलं नाही. रोजगार हमीमध्ये किती कामे देणार याबाबतची माहिती दिली नसल्याचे धैर्यशील मोहिते पाटील यावेळी म्हणाे.