Devendra Fadnavis warns Mahayuti Leaders: महायुतीतील अंतर्गत वाद आणि मतभेद मिटवण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या समन्वय समितीच्या बैठकीत विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली. राज्यातील रखडलेली महामंडळे आणि जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपाचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. वारंवार सूचना देऊनही महायुतीमधील (Mahayuti) पक्षांमध्ये स्थानिक स्तरावर सातत्याने धुसफूस सुरु असल्याने स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सर्व प्रमुख नेत्यांना सक्त ताकीद दिली आहे. (Maharashtra Politics news)

Continues below advertisement

पहिल्यांदाच मुख्यमंत्री फडणवीसांनी महायुतीच्या समन्वय समितीची बैठक घेतली. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत महायुती समन्वय समितीची बैठक पार पडली. गेल्या काही दिवसांत अशा काही घडामोडी घडल्या. ज्यावरून महायुतीत समन्वय आहे का, असा सवाल उपस्थित झाला होता. त्यामुळे समन्वय समितीच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मार्गदर्शन केलं. या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, हसन मुश्रीफ,  गिरीश महाजन, संजय खोडके, चंद्रशेखर बावनकुळे शंभुराज देसाई, छगन भुजबळ बैठकीला उपस्थित होते.

महायुतीत समन्वय राखण्याबाबत बैठकीत चर्चा झाल्याची माहिती मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. तसेच स्थानिक स्तरावर महायुतीमध्ये पूर्ण समन्वय राखण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. महायुतीतील कोणत्याही आमदार किंवा खासदाराने एकमेकांच्या नेत्यांवर अथवा पक्षांवर सार्वजनिक टीका करू नये, अशा कडक सूचना सर्वांना देण्यात आल्या आहेत  अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी बैठकीनंतर दिली.

Continues below advertisement

Mahayuti Mahamadal Vatap: महायुतीचे महामंडळ वाटप अंतिम टप्प्यात

ज्या जिल्ह्यांमध्ये निधी वाटपावरून महायुतीतील घटक पक्षांमध्ये मतभेद उद्भवतील, तिथे सर्वप्रथम विभागीय आयुक्तांमार्फत तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल. तिथेही तोडगा न निघाल्यास समन्वय समितीच्या पातळीवर निर्णय घेतला जाईल. तरीही वाद न मिटल्यास अंतिम निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत घेतला जाईल. महामंडळांच्या अंतिम फेरबदलासाठी आणि वाटपासाठी अजून 1 ते 2 बैठका होण्याची शक्यता आहे. पुढील 15 दिवसांत महामंडळ वाटपावर अंतिम शिक्कामोर्तब केले जाईल अशी माहिती मिळत आहे. महामंडळ वाटपाच्या संभाव्य फॉर्म्युलावर भाजपा 48 टक्के, शिवसेना 29 टक्के आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 23 टक्के अशाप्रकारे महामंडळांचे वाटप होण्याची शक्यता आहे. कोणते महामंडळ कुठल्या पक्षाला? यावर आणखी दोन बैठका होऊन तिढा सोडविला जाणार आहे. 

आणखी वाचा

Rahul Gandhi : निशा साबळेनं राहुल गांधींसमोर आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडले, राहुल गांधींचं देवेंद्र फडणवीस यांना पत्र, म्हणाले...