Rohit Pawar on Devendra Fadnavis : राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि भाजपचे नेते जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्यावर साताऱ्यातील एका महिलेने छळ केल्याचा गंभीर आरोप केला होता. याच मुद्द्यावरून विधानसभेच्या अधिवेशनाच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देत मोठा गौप्यस्फोट केला. जयकुमार गोरे यांना अडकण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांचा हात असल्याचे मोठे विधान करत मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत गंभीर आरोप केलेत. यात खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि आमदार रोहित पवारांचे (Rohit Pawar) नाव घेत त्यांचे कॉल रेकॉर्ड्स सापडल्याचा दावा देखील मुख्यमंत्र्यांनी केला.

दरम्यान, आता याच मुद्यावर उत्तर देत खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि आमदार रोहित पवारांनी (Rohit Pawar) पलटवार करत हे सर्व आरोप फेटाळून लावले आहे. मी उत्तर मागत होतो, माझ्या प्रश्नाचं उत्तर मागण्याचा प्रयत्न केला तेव्हा मुख्यमंत्र्‍यांनी उत्तर दिलं नाही. शिवाय सुप्रिया सुळे आणि माझं नाव घ्यायचा काही विषय नव्हता. मात्र भाषणातून फक्त ती गोष्ट रेकाॅर्डवर त्यांना आणायची होती. आम्ही जे बोलतो ते ऐकायची हिंमत त्यांच्यात नाही. कदाचित मुख्यमंत्र्यांना आमच्या मुद्द्यावर उत्तर देता आलं नसावं. आमच्यावर यशवंतराव चव्हाण यांचे संस्कार आहे, शिव-शाहू फुले- आंबेडकरांचा विचार आहे. त्यामुळे आम्ही खोटं बोलत नाही. आम्ही कुठेही चुकलेलो नाही. आम्ही हव्या त्या चौकशीला समोर जायला तयार असल्याचे सांगत आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्र्‍यांच्या आरोपावर उत्तर दिलं आहे.

नेमकं काय म्हणाले रोहित पवार?

उत्तर देत असताना ते कशावर सुरू होतं? तर अंतिम आठवड्यावर. मी तर काही बोललोच नाही, त्यांनी तो गोरेंचा मुद्दा आणला. सोबत त्यांनी आरोप केलेत ते आरोपी अजून सिद्ध झालेले नाही. मी उत्तर मागत होतो ते उत्तर मागण्याचा प्रयत्न केला तेव्हा उत्तर दिलं नाही. शिवाय सुप्रिया सुळे आणि माझं नाव घ्यायचा काही विषय नव्हता. मात्र भाषणातून फक्त ती गोष्ट रेकाॅर्डवर त्यांना आणायची होती. आम्ही जे बोलतो ते ऐकायची हिंमत त्यांच्यात नाही. कदाचित मुख्यमंत्र्यांना आमच्या मुद्द्यावर उत्तर देता आलं नसावं. आमच्यावर यशवंतराव चव्हाण यांचे संस्कार आहे, शिव-शाहू फुले- आंबेडकरांचा विचार आहे. त्यामुळे आम्ही खोटं बोलत नाही. हा विषय सुरू कधी झाला? तर एका पत्रकार महिलेन आम्हाला सांगितले की एका आमदाराने महिलेला अश्लील फोटो पाठवले. त्याच प्रकरणी बेलसाठी गोरे हायकोर्टात गेले आहेत. हे प्रकरण आणि त्यातले फोटो पाहून चुकीचं इटेशन असल्याचं कारण देत न्यायमूर्ती यांनी जामीन नाकारला.

यात देवकर नावाचा पीआय आहे, त्याने पैसे ट्रान्सफर केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. सोबतच अरुण देवकरवर देहव्यापाराच्या नावाखाली  त्याच्यावर आरोप आहे. दुर्दैवाने त्या महिलेचा वकिल मॅनेज झाला अशी चर्चा आहे. त्या वकिलाने फीचे पैसे घेऊन बोलावून तिथे देवकरने लावलेल्या ट्रॅपमध्ये पीडित महिलेला अडकवले. असं सांगण्यात येतंय की त्या महिलेले आम्ही 50-60 फोन कॉल गेलेत, तर अजिबात तसं झालं नाही. मी किंवा सुप्रिया सुळे त्या महिलेला ओळखत नाही. तसेच मी किंवा सुप्रीया सुळे यांनीही त्यांना फोन केलेला नाही. असेही आमदार रोहित पवार म्हणाले.  

त्या महिलेला 1 कोटी कॅश कोणी दिले, त्याचीही चौकशी करा

दरम्यान, खरात नावाच्या त्या पत्रकारावर आरोप झालेत. का तर त्याने भाजपचे नेते जयकुमार गोरे यांच्या विरोधात बातम्या केल्यात. यांनी जमीन लाटल्या, पैसे खाल्ले याच्या बातम्या त्याने केल्यात, अनेक प्रकरण उजेडात आणले. आमच्याकडे हा विषय आला असता आम्ही त्यावर लक्ष घातलं, सत्य जाणून घेतलं. मात्र ते मंत्री असल्याने त्यांचा हक्कभंग स्वीकारला जातो, मात्र आमचा स्वीकारला जात नाही. आम्हाला हक्कभग आणू दया, आम्ही पुरावयांचा संच आणून देऊ. भिसे, देषमुख यांच्यावर तिथे अन्याय झाला आहे, त्यावर चौकशी बसवणार का?

आम्ही चौकशीला जायला तयार आहोत. सुप्रिया ताई देखील यावर बोलतील. आम्ही कुठेही चुकलेलो नाही. मंत्र्यांना बळ मिळावं अधिकार्‍यांनी त्यांच्या भागात एकावं यासाठी मुख्यमंत्र्यांनी त्याची नावं घेतली. त्या महिलेला 1 कोटी कॅश कोणी दिले, कसे जमवले त्याचीही चौकशी करा, अशी मागणी ही आमदार रोहित पवार यांनी केली.

हे ही वाचा