Supriya Sule on Ashok Kharat Case: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकारण बाजूला ठेवून घेतलेल्या भूमिकेचे मी स्वागत करते. अशोक खरात (Ashok Kharat) याच्यासारख्या विकृत माणसाला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) पाठीशी घालणार नाहीत. नरेंद्र दाभोलकर यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांची हत्या झाली. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दाभोलकरांचा (Narendra Dabholkar) वारसा पुढे नेत आहेत. त्यासाठी मी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे जाहीर आभार मानते, असे वक्तव्य शरद पवार गटाच्या खासदार सु्प्रिया सुळे यांनी केले. त्या मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. (Maharashtra Politics news)
अशोक खरात प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या पुरोगामी प्रतिमेला काळिमा फासला गेला आहे. संसदेतील खासदार मला एकच प्रश्न विचारत आहेत की, महाराष्ट्रात काय घडते आहे? आम्ही कमी पडलो, त्यामुळे महिलांना अशा ठिकाणी जाण्याची वेळ येते. समाज म्हणून आमची काहीतरी जबाबदारी आहे. अनेक वेळा लोक आम्हाला भेटतात , ते आमच्यासोबत फोटो काढतात. मला अशोक खरात प्रकरणात कोणाला वाचवायचे नाही. मात्र, त्याच्यासोबत फोटो काढणाऱ्या नेत्यांनाही याबद्दल माहिती नसेल. पण इथून पुढे कोणासोबतही फोटो काढताना आम्हाला विचार करावा लागेल. अशोक खरात याच्याबाबत अगोदरपासून माहिती असती तर असे गलिच्छ काम करणाऱ्याला पाठिशी घातले गेले नसते, असा माझा विश्वास असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले. यावेळी सुप्रिया सुळे यांनी सध्या अशोक खरात प्रकरणामुळे संकटात सापडलेल्या रुपाली चाकणकर यांच्याबाबतही भाष्य केले. याबाबत त्यांच्या पक्षाला प्रश्न विचारला पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेसचे रोपटे शरद पवार यांच्याकडून हिसकावून घेण्यात आले. पवार आणि ठाकरे यांचे पक्ष फोडण्यात आले. त्यांनी शून्यातून पक्ष निर्माण केला ही त्यांची चूक होती का?, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.
Satara ZP Election 2026: साताऱ्यात घटनेचा मी निषेध करते: सुप्रिया सुळे
यावेळी सुप्रिया सुळे यांनी सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी झालेल्या राड्याबाबत भाष्य केले. त्यांनी म्हटले की, साताऱ्यातील घटनेचा मी जाहीर निषेध करते. शंभूराज देसाई यांनी जे विधान केलं त्याचा धक्का बसला. मकरंद पाटील तिथे उभे होते. मी माननीय मुख्यमंत्र्यांना या विषयाचं पत्र लिहिणार आहे. साताऱ्यात लोकशाहीची हत्या झाली आहे. पोलिसांच्या पाठीमागे अदृश्य शक्ती आहे. साताऱ्याचा विषय 10 ठिकाणी होईल. ही निवडणूक रद्द करावी, ही आमची मागणी आहे. दोन कॅबिनेट मंत्री जे फडणवीसांच्या सरकारचा भाग आहेत, त्यांनाच पोलिसांकडून धक्काबुक्की केली जाते. हे सुसंस्कृत महाराष्ट्राचे राजकारण नाही, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले.
आणखी वाचा
