Devendra Fadnavis Sunetra Pawar Meet: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी काल राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेतली. राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी मुंबईतील लोकभवनात सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते.
कालच्या शपथविधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देवगिरी जाऊन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट घेतली. सुनेत्रा पवारांच्या शपथविधीनंतर देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्यासोबत चर्चा केली. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुनेत्रा पवारांना सांत्वनपर पत्र दिलं आहे. ते पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्तीशः जात सुनेत्रा पवारांना दिलं. (Devendra Fadnavis Sunetra Pawar Meet)
नरेंद्र मोदींनी सुनेत्रा पवारांना दिल्या शुभेच्छा- (Narendra Modi On Sunetra Pawar)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सुनेत्रा पवारांना शुभेच्छा दिल्या आहेत. सुनेत्रा पवारांनी महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्या राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी अथक परिश्रम करतील आणि दिवंगत अजितदादा पवार यांचे स्वप्न पुढे नेतील, असा विश्वास नरेंद्र मोदींनी यावेळी व्यक्त केला.
अजित पवारांचा विमान अपघातामध्ये मृत्यू- (Ajit Pawar Plane Crash)
अजित पवार (Ajit Pawar Plane Crash) यांचं विमान अपघातामध्ये निधन झालं. 28 जानेवारीला अजित पवार खाजगी विमानानेसकाळी मुंबईहून बारामतीकडे रवाना झाले होते. यावेळी बारामती विमानतळावर लँडिंगदरम्यान विमानाचा अपघात झाला होता. यामध्ये अजित पवारांसह 5 जणांचा मृत्यू झाला. अजित पवारांच्या अकाली मृत्यूमुळे राज्याच्या सर्वच स्तरात दुःखाची लाट उसळली. (Ajit Pawar Death) लाखो चाहते, समर्थक, सर्वपक्षीय नेते यांच्या उपस्थितीत 29 जानेवारीला अजित पवारांवर बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात अंत्यसंस्कार करण्यात आले.
