एक्स्प्लोर

Devendra Fadnavis on Ajit Pawar Shok Prastav: अजित पवारांच्या जाण्याने पोकळी निर्माण होणं म्हणजे काय असतं, हे मला आज कळतंय; देवेंद्र फडणवीसांचं सभागृहात भावूक भाषण

Devendra Fadnavis on Ajit Pawar: कोणत्याही मुख्यमंत्र्याला अर्थमंत्री कसा पाहिजे तर अजितदादांसारखा हवा, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. शोक प्रस्ताव विधानसभेत मांडण्यात आला.

Devendra Fadnavis on Ajit Pawar: महाकवी भास यांच्या 'स्वप्नवासवदत्तम्' या नाटकात एक सुभाषित आहे. लाकूड जळते तेव्हा अग्नी फक्त शरीर जाळतो. पण मित्रशोक हा हृदय आणि अंतस्थ आत्म्यालाही जाळतो, असे त्यामध्ये म्हटले आहे. अजित पवार यांच्या निधनाने हीच वेळ आज माझ्यावर आली आहे. अजितदादांसारखा (Ajit Pawar) सच्चा मित्र आणि सहप्रवाशाचा मृत्यू होणे, ही केवळ राजकीय हानी नाही. ही आपल्या सर्वांच्या अंत:करणाला वेदना देणारी गोष्ट आहे. काही गोष्टींवर काळ औषध असतो, असे म्हणतात. पण अजितदादांच्या निधनामुळे झालेल्या वेदना कधीही कमी होणाऱ्या नाहीत, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारी सुरुवात झाली. अधिवेशनाच्या प्रथेप्रमाणे पहिल्या दिवशी विधिमंडळाच्या सदस्य असलेल्या दिवंगत नेत्यांना आदरांजली वाहण्यासाठी शोक प्रस्ताव मांडण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादांविषयी आपल्या भावना मांडल्या. (Maharashtra Vidhansabha Adhiveshan 2026)

आज बोलणं कुठून सुरु करावं असा प्रश्न मला पडला आहे. एक प्रचंड वादळ मनात आहे. कारण आज सभागृहात शोक प्रस्तावासाठी आपण एकत्र आहोत. कधीच कल्पना केली नव्हती अशाप्रकारच्या शोकप्रस्तावावर व्यक्त व्हावं लागेल. अधिवेशनात कधीही सहज बाजूला नजर गेली की, बाजूला खुर्चीत दादा असायचे. सकाळपासून रात्री कितीही उशीरापर्यंत सभागृह चाललं तरी अजितदादा आपल्या जागेवर बसलेले दिसायचे. 
आज दुर्दैवाने ते आपल्यात नाहीत ही खंत आहे. खरंतर यावर्षी दादांनी बारावा अर्थसंकल्प मांडला असता. पुढच्या वर्षी 13 वा अर्थसंकल्प मांडून बॅरिस्टर शेषराव वानखेड़े विक्रमाची बरोबरी केली असती. कदाचित पुढच्या काळात सर्वाधिक अर्थसंकल्प मांडणारे अर्थमंत्री म्हणून त्यांचं कार्य राहिलं असतं. पण अचानकपणे दादा आपल्यातून निघून गेले. त्यामुळे अर्थसंकल्प मांडण्याच जबाबदारी माझ्यावर आली, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

कठोर निर्णय घ्यायचे असतील तर ते घ्यायला कधीही मागेपुढे न पाहणारे अजितदादा होते. पण त्याचवेळी वित्त विभागाने लाडकी बहीण योजनेचा भार अर्थसंकल्पावर फार मोठ्याप्रमाणात पडेल याचा पुनर्विचार करा, असं सुचवल्यावर ठामपणे निर्णय घेऊन तो विषय मंत्रिमंडळापुढे आणण्याचा काम करणारे अजितदादा होते. लाडकी बहीण योजना सुरु झाल्यावर अजितदादांनी गुलाबी जॅकेट घालणं सुरु केलं, आम्हालाही घालायला लावलं होतं. या सगळ्या गोष्टी आता आठवणींमध्ये आहेत. अजितदादांच्या निधनामुळे संपूर्ण सभागृह दु:खी आहे. खरंतर अशाप्रकारचा शोकप्रस्ताव मांडणं घटनात्मक जबाबादारी आहे. माझ्यासाठी हा भावनिक प्रसंग आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

आपण अनेकदा राजकीय नेत्यांच्या निधनानंतर पोकळी निर्माण झाली असे म्हणतो. पण प्रत्यक्षात ज्येष्ठ नेते जातात तेव्हा कमतरता जाणवते. पण अजितदादांसारखा माणूस जो राजकारणात स्थिरावलाय, ज्याने अनेक क्षेत्र पादाक्रांत केली आहेत, आपलं स्वत:चं अस्तित्व, नेतृत्व निर्माण केले आहे. अशी व्यक्ती आपल्यातून निघून जाते, तेव्हा पोकळी निर्माण होण्याची नेमकी व्याख्या लक्षात येते, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...
Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...
Raj Thackeray MNS Vardhapan Din: जात, धर्म यापेक्षा महाराष्ट्र वेडाने झपाटले असाल तर... मनसेच्या वर्धापनदिनी राज ठाकरेंचं काळजाला साद घालणारं आवाहन
जात, धर्म यापेक्षा महाराष्ट्र वेडाने झपाटले असाल तर... मनसेच्या वर्धापनदिनी राज ठाकरेंचं काळजाला साद घालणारं आवाहन
Ladki Bahin Yojana: ‘लाडक्या बहिणीं’ना व्यवसायासाठी मिळणार बिनव्याजी कर्ज, देवेंद्र फडणवीसांनी मास्टरप्लॅन सांगितला; नेमकं काय म्हणाले?
‘लाडक्या बहिणीं’ना व्यवसायासाठी मिळणार बिनव्याजी कर्ज, देवेंद्र फडणवीसांनी मास्टरप्लॅन सांगितला; नेमकं काय म्हणाले?
Avinash Jadhav: संजय शिरसाटांच्या सामाजिक न्याय विभागात घोटाळ्याचा आरोप; अविनाश जाधवांचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र, नेमकं प्रकरण काय?
संजय शिरसाटांच्या सामाजिक न्याय विभागात घोटाळ्याचा आरोप; अविनाश जाधवांचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र, नेमकं प्रकरण काय?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Share Market Update : आशियातील सर्व बाजारांत मोठी घसरण, सेन्सेक्स 1800 अंक तर निफ्टी 525 अंक घसरणीवर
Modi vs Mamta : राष्ट्रपतींचा बंगाल दौरा, वादाचा भोवरा Special Report
Satara Bavdhan Bagad Yatra : साताऱ्यातील बावधनमधील बगाड यात्रा सातासुमद्रापार  Special Report
Mumbai Metro Womens Day : महिला दिनानिमित्त, CSMT मेट्रो स्थानकाची जबाबदारी महिलांकडे
Womens Day Special Talk With Mayor : महिला दिन विशेष 'माझा'च्या मंचावर महिला महापौरांची 'महा'पॉवर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आम्हाला वाटतं उद्धव ठाकरेंनी सभागृहात असावं, त्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलंय, संजय राऊतांची 'मनसे' इच्छा; आता सतेज पाटील सावध पवित्रा घेत काय म्हणाले?
आम्हाला वाटतं उद्धव ठाकरेंनी सभागृहात असावं, त्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलंय, संजय राऊतांची 'मनसे' इच्छा; आता सतेज पाटील सावध पवित्रा घेत काय म्हणाले?
Raj Thackeray MNS Vardhapan Din: जात, धर्म यापेक्षा महाराष्ट्र वेडाने झपाटले असाल तर... मनसेच्या वर्धापनदिनी राज ठाकरेंचं काळजाला साद घालणारं आवाहन
जात, धर्म यापेक्षा महाराष्ट्र वेडाने झपाटले असाल तर... मनसेच्या वर्धापनदिनी राज ठाकरेंचं काळजाला साद घालणारं आवाहन
Stock Market Crash Today: युद्धखोरांच्या युद्धाच्या खाईत भारतीय शेअर मार्केटची होरपळ सुरुच; सेन्सेक्स 2400हून अधिक अंकांनी कोसळला; निफ्टीही 750 अंकानी खाली
युद्धखोरांच्या युद्धाच्या खाईत भारतीय शेअर मार्केटची होरपळ सुरुच; सेन्सेक्स 2400हून अधिक अंकांनी कोसळला; निफ्टीही 750 अंकानी खाली
Ind vs NZ Final T20 World Cup 2026: फायनलच्या एकदिवसाआधी टीम इंडियाच्या खेळाडूच्या बहिणीचा मृत्यू; कार अपघातामध्ये गमावला जीव, अर्धशतक ठोकताच...
फायनलच्या एकदिवसाआधी टीम इंडियाच्या खेळाडूच्या बहिणीचा मृत्यू; कार अपघातामध्ये गमावला जीव, अर्धशतक ठोकताच...
Ankita Walawalkar Reacted On Anurag Dobhal Video: 'इतरांचं आयुष्य पाहण्यात वेळ घालवण्यापेक्षा...', अंकिता वालावलकरचं फॉलोअर्सना आवाहन, अनुराग डोभालचा VIDEO शेअर करुन म्हणाली...
'इतरांचं आयुष्य पाहण्यात वेळ घालवण्यापेक्षा...', अंकिता वालावलकरचं फॉलोअर्सना आवाहन, अनुराग डोभालचा VIDEO शेअर करुन म्हणाली...
Ind vs NZ Final T20 World Cup 2026 : फायनलच्या एकदिवसाआधी सचिनचा फोन, विश्वचषक जिंकल्यानंतर संजू सॅमसनने सांगितलं गुपित, सगळं बोलताना भावूकही झाला, काय म्हणाला?
फायनलच्या एकदिवसाआधी सचिनचा फोन, विश्वचषक जिंकल्यानंतर संजू सॅमसनने सांगितलं गुपित, सगळं बोलताना भावूकही झाला, काय म्हणाला?
Ladki Bahin Yojana: ‘लाडक्या बहिणीं’ना व्यवसायासाठी मिळणार बिनव्याजी कर्ज, देवेंद्र फडणवीसांनी मास्टरप्लॅन सांगितला; नेमकं काय म्हणाले?
‘लाडक्या बहिणीं’ना व्यवसायासाठी मिळणार बिनव्याजी कर्ज, देवेंद्र फडणवीसांनी मास्टरप्लॅन सांगितला; नेमकं काय म्हणाले?
Wardha Crime: वर्ध्यात राजकीय नेत्याकडून अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण, अजितदादा गटाच्या नेत्याशी कनेक्शनमुळे राजकीय वर्तुळात खळबळ
वर्ध्यात राजकीय नेत्याकडून अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण, अजितदादा गटाशी कनेक्शनमुळे राजकीय वर्तुळात खळबळ
Embed widget