Devendra Fadnavis and Narayan Rane: भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांचा 74 वा वाढदिवस सिंधुदुर्गात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्यासह भाजपचे अनेक नेते उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) आणि आमदार निलेश राणे (Nilesh Rane) यांचे भाषणात कौतुक केले. 

Continues below advertisement

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नारायण राणे समोर गेले. पण मंत्री म्हणून गेले. भुजबल साहेब समोर गेले. 1999 ते 2004 साली आमच्या बाकावरचे लोक इतका त्रास द्यायचे. भुजबळ पुरून उरायचे. पण राणे साहेब गेल्यावर कधीही कोणी त्रास दिला नाही. राणे साहेब मनाने गेले नव्हते हे आम्हाला माहिती होते. वाभाडे काढणे काय असते? हे म्हणजे राणे साहेबांचं भाषण असायचं. राणे साहेबांचा प्रचंड दरारा विधानसभेत आम्ही बघितला आहे, असे त्यांनी म्हटले. 

Devendra Fadnavis on Narayan Rane: त्या यशाचं श्रेय राणेंसारख्या माझ्या नेत्यांना द्यावं लागेल

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, विरोधी पक्षनेता म्हणून नारायण राणे यांची कारकीर्द बघितली. मुख्यमंत्री म्हणून त्यांना बाहेरुन पाहायला मिळालं. मी महापौर होतो तेव्हा मी सभागृहात नव्हतो. 1999 साली सभागृहात आलो. नारायण राणे यांच्यासोबत सभागृहात काम करायला मिळणं यासारखी दुसरी पर्वणी नव्हती. मला संसदीय यश मिळालं. त्या यशाचं श्रेय राणेंसारख्या माझ्या नेत्यांना द्यावं लागेल. त्यांनी मार्गदर्शन आणि प्रोत्साहन दिलं. त्यांची आणि माझी आवड अर्थसंकल्प आहे. राणे साहेब अर्थसंकल्पावर भाषण करायचे तेव्हा अर्थतज्ज्ञ बोलतोय असे वाटायचे. आकड्यांची चिरफाड करायचे, अर्थमंत्री चिंतेत होते. 

Continues below advertisement

Devendra Fadnavis on Nitesh Rane Nilesh Rane: देवेंद्र फडणवीसांकडून नितेश-निलेशचं कौतूक 

मला आठवतं की, सभागृहात मी पहिलं भाषण केलं. सात मिनिटांची संधी मिळाली. नीट तयारी केली होती आणि विषय मांडला. पहिल्या भाषणानंतर मला एक चिठ्ठी आली होती. छान बोललास, खाली सही होती राणे साहेबांची. तेव्हापासून आमचा ऋणानुबंध असल्याचे देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले.  देवेंद्र फडणवीस म्हणाले की, तुमची दोन्ही मुलं तुमचा वारसा समर्थपणे चालवत आहेत. त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं आहे.  त्यांचं भविष्य उज्ज्वल आहे, असे म्हणत त्यांनी नितेश राणे आणि निलेश राणे यांचे कौतुक केले.

आणखी वाचा 

आयुष्यात बाळासाहेब ठाकरेंचं फार मोठं स्थान, घरी बोलावून त्यांनी मला पदं दिली : नारायण राणे