एक्स्प्लोर

Devendra Fadnavis: अजितदादांचं शिवनेरीवर प्रचंड प्रेम होतं, त्यांच्या इच्छेनुसार पुण्यातील सर्व गड, किल्ले अतिक्रमणमुक्त झालेत: देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis: छत्रपती शिवाजी महाराज नसते तर भारताचा आजचा भुगोल आणि इतिहास आजच्या सारखा दिसला नसता, असे देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Devendra Fadnavis: अजितदादांचं (Ajit Pawar) शिवनेरीवर प्रचंड प्रेम होतं, मागच्या काळात आम्ही घोषणा केली होती की, महाराष्ट्रातील शिवरायांचे सर्व किल्ले आम्ही अतिक्रमणमुक्त करू. मला सांगताना आनंद वाटतोय की, पुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले आता अतिक्रमणमुक्त झाले आहेत, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा 396 वा  जन्मोत्सव सोहळा शिवनेरी येथे पार पडला. या कार्यक्रमातून ते बोलत होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज नसते तर भारताचा इतिहास, भारताचा भूगोल यापैकी काही राहिले नसते. खऱ्या अर्थाने ज्या काळात हिंदुस्थानात अनेक राजे आणि राजवाडे मोघलांचं मंडलिकत्व स्वीकारून काम करत होते, अशा परिस्थितीत आई जिजाऊंनी छत्रपती शिवरायांना घडवलं. हे घडवताना त्यांना सांगितले की, तुम्हाला हिंदुस्थानाला मोघलांच्या जोखडातून मुक्त करायचे आहे आणि रयतेचे राज्य स्थापित करायचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींच्या मावळ्यांना एकत्र करून एक फौज तयार केली. त्या फौजेने खऱ्या स्वराज्याची स्थापना केली आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितले की, हे माझे राज्य नाही तर रयतेचे राज्य आहे. तुम्ही जे लढत आहात, ते मला राजा बनवण्यासाठी लढत नाही. तुम्ही जे लढत आहात ते देव, देश आणि धर्माकरिता लढत आहात, असे त्यांनी म्हटले. 

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, भारताच्या इतिहासात पहिले राजे होते की, ज्यांनी ओळखले आपला पुढचा शत्रू हा समुद्राच्या मार्गाने येणार आहे. त्यामुळे जलदुर्ग बांधून पश्चिम किनाऱ्याला संरक्षित करण्याचे काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केले. पहिल्यांदा पोर्तुगीजांचा पराभव केल्यानंतर जोपर्यंत छत्रपतींचं शासन होतं, तोपर्यंत समुद्री मार्गे येण्याची हिंमत कुठल्याच देशाच्या आक्रमकांनी केली नाही. 

Devendra Fadnavis on Ajit Pawar: अजितदादांचं शिवनेरीवर प्रचंड प्रेम होतं

छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ले जागतिक वारसा स्थळ म्हणून नॉमिनेट केले आणि जगातील 27 देशांनी एकमताने मतदान करून त्याला मान्यता दिली. मला या गोष्टीचा अभिमान आहे की, अजितदादांचं शिवनेरीवर प्रचंड प्रेम होतं, मागच्या काळात आम्ही घोषणा केली होती की, महाराष्ट्रातील शिवरायांचे सर्व किल्ले आम्ही अतिक्रमणमुक्त करू. मला सांगताना आनंद वाटतोय की अजित दादांच्या इच्छेनुसार पुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले आता अतिक्रमणमुक्त झाले आहेत. एकाही किल्ल्यावर आता अतिक्रमण नाही, असे त्यांनी म्हटले. तसेच 2030 ला 400 वी शिवजयंती आपण भव्य दिव्य स्वरूपात साजरी करु, असे देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले.

आणखी वाचा

Sunetra Pawar Shivneri Fort Speech: जिथे दादा उभे होते, तिथे उभे राहताना...., सुनेत्रा पवार फडणवीस-शिंदेंसमोर भावूक; शिवनेरीच्या साक्षीने रयतेला पहिला शब्द VIDEO

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prajakt Tanpure :  प्राजक्त तनपुरेंची राहुरीच्या पोटनिवडणुकीवर पहिली प्रतिक्रिया, कार्यकर्त्यांचा उल्लेख अन् मुख्यमंत्र्यांचं कौतुक,राजकीय वर्तुळात चर्चा सुरु
प्राजक्त तनपुरेंकडून पोटनिवडणूक जाहीर होताच कार्यकर्त्यांचा उल्लेख आणि मुख्यमंत्र्यांचं कौतुक, राजकीय वर्तुळात चर्चा सुरु
Baramati : बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता धूसर? निवडणूक जाहीर होताच नवी अपडेट, नेमकं काय घडलं?
बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता धूसर? निवडणूक जाहीर होताच नवी अपडेट
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
मोठी बातमी! प.बंगालसह 5 राज्यातील विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर; दोन टप्प्यात मतदान, 4 मे रोजी निकाल
मोठी बातमी! प.बंगालसह 5 राज्यातील विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर; दोन टप्प्यात मतदान, 4 मे रोजी निकाल
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Baramati Rahuri Election : बारामती, राहुरीची पोटनिवडणूक 23 एप्रिलला, निवडणूक आयोगाची माहिती
North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
Kishori Pednekar on Ritu Tawde : मुंबईच्या महापौर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का? पेडणेकर आक्रमक
kharg Island Special Report : इराणच्या मुकूटमणीवर अमेरिकेचा शक्तिशाली बॉम्बहल्ला
Election Comission PC : 5 राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार? निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
West Bengal: निवडणूक जाहीर होताच पहिला ओपिनियन पोल आला; पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता? भाजप-तृणमूलमध्येच जोरदार टक्कर
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता? तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार लढत, पहिला ओपिनियन पोल समोर
PAK vs BAN: रोमांचक लढतीत बांगलादेशचा पाकिस्तान विजय, सलमान आगाचं शतक वाया, पाकनं मालिका गमावली 
पाकिस्तानवर मोठी नामुष्की, बांगलादेशचा तिसऱ्या वनडे सामन्यात विजय, मालिका 2-1 नं जिंकली
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीत सत्ताबदल, साहित्य संवर्धन पॅनेलचा विजय; परिवर्तन उत्कर्ष आघाडीचा पराभव
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीत सत्ताबदल, साहित्य संवर्धन पॅनेलचा विजय
Adinath Maharaj : तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री गंभीर जखमी, स्वत:वर वार केल्याची माहिती, घटनेमुळं खळबळ
तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री गंभीर जखमी, स्वत:वर वार केल्याची माहिती, घटनेमुळं खळबळ
अधिकाऱ्यांनी जप्त केलेले गॅस सिलेंडर लोकांनी पळवले; गॅस टंचाईने वाद, घटनास्थळी पोलिसांना बोलावलं
अधिकाऱ्यांनी जप्त केलेले गॅस सिलेंडर लोकांनी पळवले; गॅस टंचाईने वाद, घटनास्थळी पोलिसांना बोलावलं
महापौर रितू तावडेंच्या कारवरील लाल-निळे दिवे हटले; विरोधकांच्या टीकेनंतर अधिकाऱ्यांना जाग
महापौर रितू तावडेंच्या कारवरील लाल-निळे दिवे हटले; विरोधकांच्या टीकेनंतर अधिकाऱ्यांना जाग
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
SA vs NZ :  दक्षिण आफ्रिकेनं टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीतील पराभवाचा वचपा काढला, न्यूझीलंडवर 7 विकेटनं दणदणीत विजय
दक्षिण आफ्रिकेनं टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीतील पराभवाचा वचपा काढला, न्यूझीलंडवर 7 विकेटनं दणदणीत विजय
Embed widget