Devendra Fadnavis On Raj Thackeray And Uddhav Thackeray: राज ठाकरे (Raj Thackeray) हे फक्त पराभूत होणार नाहीत,तर इतिहासात सर्वात मोठ्या पराभवाचे धनी म्हणून ओळखले जातील, मी आज भविष्यवाणी करतो. निकाल आल्यानंतर तुम्ही पाहा, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्याबाबत भविष्यवाणी केली. तसेच जन्मामुळे मालमत्ता मिळू शकते. पण विचारांचा वारसा मिळत नाही. यांना विचारांचा वारसा मिळालेला नाहीय, अशी टीकाही देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे (Devendra Fadnavis) यांच्यावर केली.
राज ठाकरे इतिहासात सर्वात मोठ्या पराभवाचे धनी म्हणून ओळखले जातील- देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis On Raj Thackeray)
मी याआधीही स्पष्ट केलं आहे की, आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत. त्याला काहीच अर्थ उरलेला नाहीय. जर 2009 मध्ये शिवसेना आणि मनसे एकत्र आले असते तर आजची राजकीय परिस्थिती वेगळी पाहायला मिळली असती. त्या काळातच त्यांना मत मिळाली असती. आता त्यांच्याकडे मतचं राहिलेली नाहीय. जिथपर्यंत राज ठाकरेंचा प्रश्न आहे, मी अत्यंत स्पष्ट शब्दात सांगतो, या निवडणुकीनंतर राज ठाकरेंचा सर्वात मोठा पराभव होणार आहे. या युतीत राज ठाकरेंना काहीही फायदा होणार नाही. राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना फायदा होईल, मात्र उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना फायदा होणार नाही. राज ठाकरे हे फक्त पराभूत होणार नाहीत, तर इतिहासात सर्वात मोठ्या पराभवाचे धनी म्हणून ओळखले जातील, ही मी भविष्यवाणी करतो, तुम्ही निकालानंतर पाहा, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. (BMC Election 2026)
देवेंद्र फडणवीस हिंदू आहेत की नाहीत?,उद्धव ठाकरेंचा सवाल (Uddhav Thackeray On Devendra Fadnavis)
आम्ही सातत्याने सांगतोय मुंबईचा (BMC Election 2026) महापौर हा मराठीच होईल. भाजप काय म्हणतेय की मुंबईचा महापौर हा हिंदू होईल. म्हणजे याचा अर्थ भाजप मराठी माणसाला हिंदू समजत नाही का?, मग देवेंद्र फडणवीस हिंदू आहेत की नाहीत?, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मराठी माणसांवर गोळ्या घालणारा माणून मोरारजी देसाई हा हिंदू होता की नव्हता, असा सवाल ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.