Devendra Fadnavis: महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांचं एकूण जीवन पाहिलं तर समर्पित जीवन ते जगलेले आहेत. ⁠देशाच्या प्रगतीकडे त्यांचं काम आहे. ⁠वन रॅक वन पेन्शन (One Rank One Pension), सैनिकांच्या पेन्शनचा प्रश्न त्यांनी मार्गी लावला. ⁠मात्र काही छोट्या मनाचे लोकं एक प्रकारे विवाद उभा करतात. ⁠आता काहींच्या काळात कोणाला काय काय देण्यात आलं, त्या वादात मी पडत नाही. नाहीतर दिवस पुरणार नाही, अशाशब्दातराज्याचेमुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीविरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तदिलंआहे.

महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना केंद्र सरकारकडून पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. याच मुद्यावरुन राजकीय वातावरण तापलं असून यावर विरोधकांनी सडकून टीका केली आहे. अशातच आता मुख्यमंत्र्यानीप्रतिक्रियादेतपलटवारकेलाआहे.राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule), काँग्रेसप्रदेशाध्यक्षहर्षवर्धनसपकाळ, ठाकरेगटाचेखासदारसंजयराऊतांनी माजी राज्यपाल कोश्यारी यांच्या पद्मभूषण पुरस्कारावरून टीका केली होतीयावरआतामुख्यमंत्र्यानीहीप्रत्युत्तरदिलंआहे.

Devendra Fadnavis : मुंबईचे अग्निशमन दल जगभरात प्रसिद्ध आहे

देशासह राज्यभरात आज प्रजासत्ताक दिनाचा (Republic Day 2026) अतिशय आनंदाचा क्षण आहे. ⁠मुंबई महानगरपालिकेत ऐतिहासिक दिनआहे. अग्निशमन वाहन ट्रेन, टेबल वाहन सामील झालं आहे. ⁠इंग्लंडमध्ये बनवण्यात आलेले हे वाहन मुंबईत 1944 मध्ये सहभागी झालं. ⁠गोदीला लागलेल्या आगीत या वाहनांची भूमिका महत्वाची होती. ⁠हे वाहन पालिकेकडे न वापरात होतं. ⁠हे वाहन पुर्नजतन करण्याचा निर्णय पालिकेने घेतला. ⁠गौतम सिंघानिया जे विन्टेज कारसाठी प्रसिद्ध आहेत, त्यांनी यात पुढाकार घेत 1937 चं वाहन उपयोगात आणलं. ⁠1937 साली हे वाहन कदाचित त्या सालचं अभूतपूर्व आविष्कार आहे. ⁠आज हे वाहन नव्या स्वरूपात समोर आलं आहे. मुंबईचे अग्निशमन दल हे जगभरात प्रसिद्ध आहे. ⁠या दलाला इतिहास आणि संवर्धन हेही महत्वाचं आहे. ⁠जे काही अन्य गोष्टी आपल्याकडे असतील, त्याचंही पुर्नजतन करून त्याचं म्युझियममध्ये बनवण्याचा आपण प्रयत्न करू, असेहीमुख्यमंत्रीयावेळीम्हणाले.

Sanjay Raut : महाराष्ट्राचा अपमान करणऱ्यांचा भाजपा सन्मान करते! छान!

महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा फुले यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे राज्यात मोठा असंतोष निर्माण झाला होता. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या बालविवाहावर अवमानकारक टिप्पणी केली होती, ज्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी देखील करण्यात आली होती. त्यांच्या विरोधात राज्यात मोठ्या प्रमाणात टीका देखील करण्यात आली होती. अशातच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. याच महाशयांनी छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा फुले दाम्पत्याचा अपमान केला होता. महाराष्ट्राचा अपमान करणऱ्यांचा भाजपा सन्मान करते! छान! असं ट्वीट करत संजय राऊतांनी भाजपवर टीका केली आहे. 

 दुसरीकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी कोश्यारींना पद्मभूषण देण्यात आल्यानंतर हल्लाबोल केला आहे. सपकाळ यांनी संविधानाची पायमल्ली करणाऱ्या व्यक्तीला पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला. संविधान पदाचा त्यांनी अपमान केला आहे. शिव शाहू फुलेंचा अपमान करणाऱ्याला हा पुरस्कार देण्यात आला असून कोश्यारी हा विकृत माणूस असल्याचा हल्लाबोल सुद्धा हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.

इतर महत्वाच्या बातम्या