एक्स्प्लोर

Devendra Fadnavis on Vasantdada Sugar Institute: शरद पवार अध्यक्ष असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीचे आदेश दिले?; देवेंद्र फडणवीस म्हणाले...

Devendra Fadnavis on Vasantdada Sugar Institute: राज्य सरकारने शरद पवार अध्यक्ष असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीचे आदेश दिल्याची माहिती समोर आली आहे.

Devendra Fadnavis on Vasantdada Sugar Institute: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) अध्यक्ष असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला (Vasantdada Sugar Institute) राज्य सरकारकडून दिले जाणारे अनुदान ठरलेल्या उद्देशासाठीच वापरले जाते का, याची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील मंत्री समितीने दिले आहेत. या अनुषंगाने राज्याच्या साखर आयुक्तांना दोन महिन्यांच्या आत चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शरद पवार अध्यक्ष असलेल्या या संस्थेच्या नियामक मंडळावर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील आणि जयप्रकाश दांडेगावकर यांचा समावेश आहे. त्यामुळे या चौकशी आदेशानंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, या घडामोडीवर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, काही लोक जाणीवपूर्वक आमच्यावर अन्याय होत आहे. आम्हाला मारलं जात आहे, अशा प्रकारचा माहोल तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. काही लोक विनाकारण आम्ही शहीद होत आहोत, असे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या सगळ्यांना मी सांगू इच्छितो की, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची कुठलीही चौकशी राज्य सरकारने सुरू केलेली नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. 

Devendra Fadnavis on Vasantdada Sugar Institute: चौकशी करण्याचा प्रश्नच नाही : देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की,  ज्यावेळेस गाळप हंगामाची बैठक झाली होती, त्या बैठकीत वेगवेगळे पैसे जे आपण कापून घेतो, त्याचा विनियोग नेमका काय होतो? यासंदर्भातील माहिती घेतली पाहिजे, असं सर्वसमक्ष ठरलं होतं. त्यात आपण वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकरता वर्षानुवर्ष एक रुपया कापून घेतो. त्यामुळे जसे इतरांनी त्या पैशाचे काय केले? याची माहिती मागितली. तेवढीच माहिती साखर आयुक्तांनी वसंतदादा इन्स्टिट्यूटकडे मागितलेली आहे. त्या बैठकीत वसंतदादा इन्स्टिट्यूटचे पदाधिकारी देखील होते. साखर कारखानदार देखील होते. सगळ्यांच्या समक्ष जे ठरलं तेवढीच माहिती मागविण्यात आलेली आहे. त्यामुळे विनाकारण वसंतदादा इन्स्टिट्यूटची चौकशी चालू केली. आमच्याकडे तक्रार आली आणि गंभीर असेल तर आम्ही चौकशी करू देखील. पण अशी कुठली तक्रार देखील आलेली नाही. त्यामुळे चौकशी करण्याचा प्रश्नच नाही, असे देखील म्हटले आहे.  

Devendra Fadnavis on Bacchu Kadu: रात्री उशिरा बच्चू कडूंचा मेसेज आला 

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू  यांनी ‘महाएल्गार ट्रॅक्टर मोर्चा’ काढला आहे.  राज्यभरातील हजारो शेतकऱ्यांचा या मोर्चाला पाठिंबा मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी सरकारने बैठक बोलावली होती. मात्र, या बैठकीला बच्चू कडू यांच्यासह शिष्टमंडळ गेले नसल्याने ती बैठक रद्द करण्यात आली. याबाबत विचारले असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, रात्री उशिरा एक वाजता बच्चू कडू यांनी मला मेसेज पाठवला की, आम्ही बैठकीला येणार असे म्हटले होते. पण, आमचे सगळे शेतकरी नागपूरला जमा होत आहेत. आम्ही तिथे नसलो तर त्यातून वेगळा संभ्रम निर्माण होईल. त्यामुळे आम्ही आमचे मागणीपत्र तुम्हाला पाठवत आहोत. तुम्ही त्याच्यावर निर्णय करावा. आम्ही काही बैठकीला येणार नाही. त्यामुळे आम्ही ती बैठक रद्द केली आहे. त्यांच्या मागण्यांपैकी ज्या गोष्टीवर सकारात्मक निर्णय करता येतील, ज्यावर तातडीने निर्णय करता येतील, ते आम्ही करू, असे त्यांनी सांगितले. 

आणखी वाचा 

Pune Jain Boarding: आम्ही आमच्या बाजूने व्यवहार रद्द करण्यासाठी तयार; गोखले बिल्डरकडून वकिलांमार्फत कोर्टात माहिती, जैन बोर्डिंग जागेसंदर्भातील सुनावणीदरम्यान नेमकं काय घडलं?

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2025 | शनिवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2025 | शनिवार 
Elon Musk Pay Package: एलाॅन मस्कना टेस्लानं दिलेला पगार किती ट्रिलीयन डाॅलर? तेवढ्यात स्वित्झर्लंड, सिंगापूर, इस्त्रायलसारखं किती देश खरेदी होतील??
एलाॅन मस्कना टेस्लानं दिलेला पगार किती ट्रिलीयन डाॅलर? तेवढ्यात स्वित्झर्लंड, सिंगापूर, इस्त्रायलसारखं किती देश खरेदी होतील??
Samantha Ruth Prabhu: समंथाला अखेर 'तो' मिळाला! म्हणाली, 'गेल्या दीड वर्षात मी माझ्या करिअरमध्ये काही धाडसी पावलं उचलली, ही फक्त सुरुवात आहे'
समंथाला अखेर 'तो' मिळाला! म्हणाली, 'गेल्या दीड वर्षात मी माझ्या करिअरमध्ये काही धाडसी पावलं उचलली, ही फक्त सुरुवात आहे'
लोकलच्या मोटरमनला लॉबीतच अडवले; प्रवाशांना वेठीस धरणाऱ्या रेल्वे कर्मचारी संघटनांची सीसीटीव्हीतून पोल खोल
लोकलच्या मोटरमनला लॉबीतच अडवले; प्रवाशांना वेठीस धरणाऱ्या रेल्वे कर्मचारी संघटनांची सीसीटीव्हीतून पोल खोल
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra LIVE Superfast News : 8 NOV 2025 : सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : ABP Majha
Maratha Quota Row: ‘एकाची नाही, सर्वांचीच Narco Test करा’, जरांगेंच्या समर्थकांची पोलिसांकडे मागणी
Sharad Pawar  : पार्थ पवार प्रकरणात फडणवीसांनी  चौकशी करून वास्तव समोर आणावं
Pune Land Scam: पार्थ पवार जमीन प्रकरणातील शीतल तेजवानीने देश सोडला
Mahapalikecha Mahasangram Sangli : 2 वर्ष रखडलेली निवडणूक,सांगलीकर त्रस्त;पालिकेचं समीकरण बदलणार?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2025 | शनिवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2025 | शनिवार 
Elon Musk Pay Package: एलाॅन मस्कना टेस्लानं दिलेला पगार किती ट्रिलीयन डाॅलर? तेवढ्यात स्वित्झर्लंड, सिंगापूर, इस्त्रायलसारखं किती देश खरेदी होतील??
एलाॅन मस्कना टेस्लानं दिलेला पगार किती ट्रिलीयन डाॅलर? तेवढ्यात स्वित्झर्लंड, सिंगापूर, इस्त्रायलसारखं किती देश खरेदी होतील??
Samantha Ruth Prabhu: समंथाला अखेर 'तो' मिळाला! म्हणाली, 'गेल्या दीड वर्षात मी माझ्या करिअरमध्ये काही धाडसी पावलं उचलली, ही फक्त सुरुवात आहे'
समंथाला अखेर 'तो' मिळाला! म्हणाली, 'गेल्या दीड वर्षात मी माझ्या करिअरमध्ये काही धाडसी पावलं उचलली, ही फक्त सुरुवात आहे'
लोकलच्या मोटरमनला लॉबीतच अडवले; प्रवाशांना वेठीस धरणाऱ्या रेल्वे कर्मचारी संघटनांची सीसीटीव्हीतून पोल खोल
लोकलच्या मोटरमनला लॉबीतच अडवले; प्रवाशांना वेठीस धरणाऱ्या रेल्वे कर्मचारी संघटनांची सीसीटीव्हीतून पोल खोल
SIP Calculator : 10000 रुपयांच्या दरमहा गुंतवणुकीनं 20 वर्षात किती रुपयांचा फंड तयार होईल? जाणून घ्या समीकरण
10000 रुपयांच्या दरमहा गुंतवणुकीनं 20 वर्षात किती रुपयांचा फंड तयार होईल? जाणून घ्या समीकरण
Parth Pawar: पुण्यातील जमीन व्यवहार रद्द करण्यासाठी कायदा काय सांगतो? 21 नाही 42 कोटी भरावे लागणार
पुण्यातील जमीन व्यवहार रद्द करण्यासाठी कायदा काय सांगतो? 21 नाही 42 कोटी भरावे लागणार
मोठी बातमी! मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचं समन्स; मुंडेंसोबत वाद सुरू असतानाच चौकशीसाठी मुंबईत बोलावलं, प्रकरण काय?
मोठी बातमी! मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचं समन्स; मुंडेंसोबत वाद सुरू असतानाच चौकशीसाठी मुंबईत बोलावलं, प्रकरण काय?
हैदराबाद ते अमेरिकेत राज्यपाल! जोहरान ममदानींची जगभर चर्चा, पण गझला हाश्मींनी सुद्धा व्हर्जिनियाच्या लेफ्टनंट गव्हर्नर होत इतिहास रचला!
हैदराबाद ते अमेरिकेत राज्यपाल! जोहरान ममदानींची जगभर चर्चा, पण गझला हाश्मींनी सुद्धा व्हर्जिनियाच्या लेफ्टनंट गव्हर्नर होत इतिहास रचला!
Embed widget