BJP Alliance MIM And Congress: अकोट नगरपरिषदेत भाजपने चक्क एमआयएमला (BJP MIM Alliance Akot Nagarparishad) सत्तेसाठी सोबत घेतल्याने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. बहुमतासाठी भाजपने अकोट विकास मंच स्थापन केला. या अकोट विकास मंचमध्ये भाजपनंतर सर्वाधिक जागा जिंकणारा एमआयएम, शिंदेंची शिवसेना, ठाकरेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी, बच्चू कडूंची प्रहार जनशक्ती सहभागी झालीय. या नव्या आघाडीची नोंदणी अकोला जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. तर सत्तेसाठी अंबरनाथ नगरपरिषदेत भाजप आणि काँग्रेसची (BJP Congress Alliance Ambernath Nagarparishad) युती झाली. शिंदेंच्या शिवसेनेला दूर ठेवण्यासाठी अंबरनाथ नगरपरिषदेत भाजप आणि काँग्रेस अशी हातमिळवणी झाली. एकीकडे काँग्रेसमुक्त भारत करण्याच्या आरोळ्या भाजपचे वरिष्ठ नेते देशपातळीवर ठोकत असतात, तर दुसरीकडे नगरपरिषदेत सत्तेसाठी काहीही करण्याची भाजप नेत्यांची तयारी असल्याचं दिसतंय. भाजपच्या याच भूमिकेवरुन आता विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत त्यांना घेरण्यास सुरुवात केली आहे. याच दरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्थानिक पातळींवर झालेल्या एमआयएम आणि काँग्रेससोबतच्या आघाडीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अकोटमध्ये भाजप आणि एमआयएम युती केली. तर अंबरनाथमध्ये भाजप आणि काँग्रेसची युती झाल्याने देवेंद्र फडणवीसांनी स्थानिक नेत्यांवर प्रचंड नाराज झाले. तसेच एबीपी नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीमध्ये काँग्रेस आणि एमआयएमसोबत कोणत्याही प्रकारची युती खपवून घेतली जाणार नाही. काँग्रेस आणि एमआयएमसोबत युती होऊच शकत नाही. स्थानिक पातळीवर जरी हे झालं असेल तर चुकीचचं आहे. ज्याने कोणी ही युती केली असेल त्यांच्यावर कारवाई होईल, असं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केले आहे. (Devendra Fadnavis On BJP Alliance MIM And Congress)
अकोट नगरपरिषदेत नेमकं काय घडलं? (Akot Nagarparishad BJP)
अकोट नगरपरिषदेत भाजपने चक्क एमआयएमला सत्तेसाठी सोबत घेतलं. बहुमतासाठी भाजपने अकोट विकास मंच स्थापन केला. भाजपचे नगरसेवक रवी ठाकूर या नव्या आघाडीचे गटनेते असणार आहेत. या आघाडीतील सर्वच पक्षाच्या नगरसेवकांना आता भाजपचा 'व्हिप' पाळावा लागणार आहे. 13 जानेवारीला होत असलेल्या उपनगराध्यक्ष आणि स्विकृत सदस्यांच्या निवडीत ही आघाडी एकत्रितपणे मतदान करतील. अकोटमध्ये भाजपच्या माया धुळे या नगराध्यक्षपदी विजयी झाल्या, मात्र 35 सदस्यांच्या नगरपालिकेत भाजपला बहुमत नव्हतं. भाजपला सर्वाधिक म्हणजे 11 जागा मिळाल्या तर एमआयएमला दुसऱ्या क्रमांकाचा म्हणजे 5 जागा मिळाल्या. त्यामुळे बहुमताची जुळवाजुळव करण्यासाठी भाजपने चक्क एमआयएमशी हातमिळवणी केली.
अंबरनाथ नगरपरिषदेत काय घडलं? (Ambernath Nagarparishad BJP)
सत्तेसाठी अंबरनाथ नगरपरिषदेत भाजप आणि काँग्रेसची युती झाली. शिंदेंच्या शिवसेनेला दूर ठेवण्यासाठी अंबरनाथ नगरपरिषदेत भाजप आणि काँग्रेस अशी हातमिळवणी झाली. एकीकडे काँग्रेसमुक्त भारत करण्याच्या आरोळ्या भाजपचे वरिष्ठ नेते देशपातळीवर ठोकत असतात, तर दुसरीकडे नगरपरिषदेत सत्तेसाठी काहीही करण्याची भाजप नेत्यांची तयारी असल्याचं दिसतंय. काँग्रेसला सोबत घेऊन भाजपचा नगराध्यक्ष विराजमान होणार आहे. भाजपच्या तेजश्री करंजुले नगराध्यक्षपदी विजयी झाल्या. अंबरनाथमध्ये भाजपकडे नगरपरिषदेत बहुमत मात्र नव्हतं. भाजपचे 16, काँग्रेसचे 12, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 4 अशा 32 नगरसेवकांची मोट बांधत भाजपने मित्रपक्ष शिंदेंच्या शिवसेनेला दूर सारलं. दरम्यान शिंदे गटाने ही तर अभद्र युती असल्याची टीका केली आहे. भाजपाने काँग्रेसची हात मिळवणी करत शिवसेनेचा घात केल्याचं शिवसेना शिंदे गटाचे आमदार बालाजी किणीकर यांनी म्हटलंय.
