एक्स्प्लोर

Devendra Fadnavis मोठी बातमी: काँग्रेस अन् MIM सोबत युती खपवून घेणार नाही; नेत्यांवर कारवाई करणार, देवेंद्र फडणवीस संतापले, काय काय म्हणाले?

BJP Alliance MIM And Congress: अकोट नगरपरिषदेत भाजपने एमआयएमसोबत तर अंबरनाथ नगरपरिषदेत भाजपने काँग्रेससोबत युती केल्याने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

BJP Alliance MIM And Congress: अकोट नगरपरिषदेत भाजपने चक्क एमआयएमला (BJP MIM Alliance Akot Nagarparishad) सत्तेसाठी सोबत घेतल्याने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. बहुमतासाठी भाजपने अकोट विकास मंच स्थापन केला. या अकोट विकास मंचमध्ये भाजपनंतर सर्वाधिक जागा जिंकणारा एमआयएम, शिंदेंची शिवसेना, ठाकरेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी, बच्चू कडूंची प्रहार जनशक्ती सहभागी झालीय. या नव्या आघाडीची नोंदणी अकोला जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. तर सत्तेसाठी अंबरनाथ नगरपरिषदेत भाजप आणि काँग्रेसची (BJP Congress Alliance Ambernath Nagarparishad) युती झाली. शिंदेंच्या शिवसेनेला दूर ठेवण्यासाठी अंबरनाथ नगरपरिषदेत भाजप आणि काँग्रेस अशी हातमिळवणी झाली. एकीकडे काँग्रेसमुक्त भारत करण्याच्या आरोळ्या भाजपचे वरिष्ठ नेते देशपातळीवर ठोकत असतात, तर दुसरीकडे नगरपरिषदेत सत्तेसाठी काहीही करण्याची भाजप नेत्यांची तयारी असल्याचं दिसतंय. भाजपच्या याच भूमिकेवरुन आता विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत त्यांना घेरण्यास सुरुवात केली आहे. याच दरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्थानिक पातळींवर झालेल्या एमआयएम आणि काँग्रेससोबतच्या आघाडीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अकोटमध्ये भाजप आणि एमआयएम युती केली. तर अंबरनाथमध्ये भाजप आणि काँग्रेसची युती झाल्याने देवेंद्र फडणवीसांनी स्थानिक नेत्यांवर प्रचंड नाराज झाले. तसेच एबीपी नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीमध्ये काँग्रेस आणि एमआयएमसोबत कोणत्याही प्रकारची युती खपवून घेतली जाणार नाही. काँग्रेस आणि एमआयएमसोबत युती होऊच शकत नाही.  स्थानिक पातळीवर जरी हे झालं असेल तर चुकीचचं आहे. ज्याने कोणी ही युती केली असेल त्यांच्यावर कारवाई होईल, असं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केले आहे. (Devendra Fadnavis On BJP Alliance MIM And Congress)

अकोट नगरपरिषदेत नेमकं काय घडलं? (Akot Nagarparishad BJP)

अकोट नगरपरिषदेत भाजपने चक्क एमआयएमला सत्तेसाठी सोबत घेतलं. बहुमतासाठी भाजपने अकोट विकास मंच स्थापन केला. भाजपचे नगरसेवक रवी ठाकूर या नव्या आघाडीचे गटनेते असणार आहेत. या आघाडीतील सर्वच पक्षाच्या नगरसेवकांना आता भाजपचा 'व्हिप' पाळावा लागणार आहे.  13 जानेवारीला होत असलेल्या उपनगराध्यक्ष आणि स्विकृत सदस्यांच्या निवडीत ही आघाडी एकत्रितपणे मतदान करतील. अकोटमध्ये भाजपच्या माया धुळे या नगराध्यक्षपदी विजयी झाल्या, मात्र 35 सदस्यांच्या नगरपालिकेत भाजपला बहुमत नव्हतं. भाजपला सर्वाधिक म्हणजे 11 जागा मिळाल्या तर एमआयएमला दुसऱ्या क्रमांकाचा म्हणजे 5 जागा मिळाल्या. त्यामुळे बहुमताची जुळवाजुळव करण्यासाठी भाजपने चक्क एमआयएमशी हातमिळवणी केली. 

अंबरनाथ नगरपरिषदेत काय घडलं? (Ambernath Nagarparishad BJP)

सत्तेसाठी अंबरनाथ नगरपरिषदेत भाजप आणि काँग्रेसची युती झाली. शिंदेंच्या शिवसेनेला दूर ठेवण्यासाठी अंबरनाथ नगरपरिषदेत भाजप आणि काँग्रेस अशी हातमिळवणी झाली. एकीकडे काँग्रेसमुक्त भारत करण्याच्या आरोळ्या भाजपचे वरिष्ठ नेते देशपातळीवर ठोकत असतात, तर दुसरीकडे नगरपरिषदेत सत्तेसाठी काहीही करण्याची भाजप नेत्यांची तयारी असल्याचं दिसतंय. काँग्रेसला सोबत घेऊन भाजपचा नगराध्यक्ष विराजमान होणार आहे. भाजपच्या तेजश्री करंजुले नगराध्यक्षपदी विजयी झाल्या. अंबरनाथमध्ये भाजपकडे नगरपरिषदेत बहुमत मात्र नव्हतं. भाजपचे 16, काँग्रेसचे 12, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 4 अशा 32 नगरसेवकांची मोट बांधत भाजपने मित्रपक्ष शिंदेंच्या शिवसेनेला दूर सारलं. दरम्यान शिंदे गटाने ही तर अभद्र युती असल्याची टीका केली आहे. भाजपाने काँग्रेसची हात मिळवणी करत शिवसेनेचा घात केल्याचं शिवसेना शिंदे गटाचे आमदार बालाजी किणीकर यांनी म्हटलंय. 

संबंधित बातमी:

BJP MIM Alliance :महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात धक्कादायक बातमी, भाजपने ओवेसींच्या एमआयएमशी युती केली, अकोट महानगरपालिकेत चक्रावणाऱ्या घडामोडी

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More

महत्त्वाच्या बातम्या

नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
Shiv Sena Symbol Case : राहुल नार्वेकरांचे सगळेच निर्णय चुकले, सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बलांचा धडाधड युक्तिवाद; आजच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
राहुल नार्वेकरांचे सगळेच निर्णय चुकले, सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बलांचा धडाधड युक्तिवाद; आजच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
Maharashtra Government Cabinet Decision: पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय
पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Embed widget