Devendra Fadnavis On Ladki Bahin Yojana Ajit Pawar Name: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'ला (Ladki Bahin Yojana) दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांचे (Ajit Pawar) नाव द्या, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी (NCP Amol Mitkari) यांनी केली आहे. अजितदादांच्या दुरदृष्टीतून आलेल्या या योजनेला 'अजितदादांची लाडकी बहिण योजना' असं नाव देत त्यांच्या स्मृती सरकारने वेगळ्या पद्धतीने जपाव्यात, असं अमोल मिटकरी म्हणाले होते. अमोल मिटकरींच्या या मागणीनंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महत्वाचं विधान केलं आहे. (Devendra Fadnavis On Amol Mitkari)

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? (Devendra Fadnavis On Amol Mitkari)

लाडकी बहीण योजनेला अजित पवारांचे नाव द्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे. यावर देवेंद्र फडणवीसांना माध्यमांनी प्रश्न विचारताच त्यांनी महत्वाची माहिती दिली. लाडकी बहीण योजनेबाबत अनेक मागण्या आहेत. याबाबत आम्ही बसून निर्णय घेऊ, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. दरम्यान, लाडकी बहीण योजनेसारख्या योजनांमुळे (Ladki Bahin Yojana) राज्यांची महसुली तूट वाढत आहे, महाराष्ट्र हे महसुली तुटीमध्ये गेलं असल्याचं निरीक्षण यंदाच्या आर्थिक पाहणी अहवालात मांडण्यात आलं. त्यामुळे आगामी काळात राज्य सरकार कशा पद्धतीने परिस्थिती हाताळणार, तसेच कोणता महत्वाचा निर्णय घेणार, याकडे सर्व लाडक्या बहीणींचं लक्ष लागलं आहे. 

लाडकी बहीण योजनेमुळे आर्थिक ताण- (Maharashtra Ladki Bahin Yojana)

दरम्यान, जून 2024 ला जेव्हा योजना सुरु झाली, तेव्हापासूनच ती वादात आणि राजकारणात अडकून आहे. कधी नावं कपात केल्यामुळे, कधी ई-केवायसीमुळे, तर कधी इतर विभागाचे निधी योजनेसाठी वळवल्यामुळे. कारणं काहीही असो..वाद कितीही असो.. योजना बंद केली जाणार नाही असं महायुती सरकारनं स्पष्ट केलंय. लाडक्या बहिणींना महिन्या पैसे मिळत राहणार असं सत्तेत बसलेला प्रत्येक नेता आजही सांगतोय. खरंतर, लाडकी बहीण योजनेमुळे आर्थिक ताण वाढल्याचं अजित दादांच्या अर्थखात्यानं पत्रक काढून सांगितलं होतं. पण, तरीही योजनेवर कोणतंही संकट येणार नाही याची काळजी मात्र अजितदादांनी घेतली होती. अशातच आता या योजनेला अजित पवार यांचे नाव देण्याची मागणी आमदार अमोल मिटकरींनी केली आहे.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, Video:

संबंधित बातमी:

Sharad Pawar On Sunetra Pawar: अमोल मिटकरी म्हणाले, लाडकी बहीण योजनेला अजितदादांचं नाव द्या; शरद पवारांनी एका वाक्यात विषय संपवला!

Devendra Fadnavis On Finance Department: अजितदादांच्या अर्थ विभागाची सूत्रे स्वतःकडे घेताच देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय; खरेदी प्रस्तावांना मान्यता देण्यास बंदी, कोणकोणते निर्णय घेतले?