Devendra Fadnavis on Eknath Shinde and Ganesh Naik: एकनाथ शिंदे की गणेश नाईक, सर्वात समजूतदार कोण वाटतं? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'माझ्यासारख्या छोट्या नेत्याला...'
Devendra Fadnavis on Eknath Shinde and Ganesh Naik: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री गणेश नाईक यांच्यातील राजकीय संघर्षावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलंय.

Devendra Fadnavis on Eknath Shinde and Ganesh Naik: गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि मंत्री गणेश नाईक (Ganesh Naik) यांच्यातील राजकीय संघर्ष चांगलाच पेटल्याचे पाहायला मिळत आहे. महायुतीतील (Mahayuti) या दोन महत्त्वाच्या नेत्यांमधील वादावर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाष्य केले आहे. एबीपी माझाच्या (ABP Majha) 'माझा इन्फ्रा व्हिजन' (Majha Infra Vision) या विशेष कार्यक्रमात त्यांनी या वादावर मिश्किल टिप्पणी केली आहे.
Devendra Fadnavis on Eknath Shinde and Ganesh Naik: शिंदे-नाईक वादावर फडणवीसांचे वक्तव्य
तु्म्हाला समजावताना सगळ्यात जास्त समजूतदार कोण वाटतं? गणेश नाईक की एकनाथ शिंदे असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला असता ते म्हणाले की, "दोघेही समजूतदार आहेत, दोघेही मोठे नेते आहेत. अनेक वेळी जे काही मोठे नेते असतात, त्यांच्यात समन्वय घडवावा लागतो. माझ्यासारख्या छोट्या नेत्याला या दोन मोठ्या नेत्यांमध्ये समन्वय घडवावा लागेल," अशी मिश्कील प्रतिक्रिया त्यांनी दिलीय.
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांचा विरोधी पक्षातील नेत्यांवर निशाणा
दरम्यान, उद्धव ठाकरे, संजय राऊत, रोहित पवार, हर्षवर्धन सपकाळ, राहुल गांधी आणि सुधीर मुनगंटीवार यापैकी सर्वात तीव्र विरोधक तुम्हाला कोण वाटतो, याबाबत विचारले असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "सुधीर मुनगंटीवार हे माझे विरोधक नाहीत, ते माझे मित्र आहेत, ते माझे सहकारी आहेत. बाकीचे जे तुम्ही नाव घेतली, यापैकी कोणीही मला तीव्र वाटत नाही. याचे कारण हे फक्त मीडिया आणि पेपर टायगर आहेत. मीडिया आणि पेपरच्या बाहेर यांना विरोध करता येत नाही, नुसते स्टेटमेंट देऊन विरोध करता येत नाही. नुसता नरेटिव्ह तयार करून विरोध करता येत नाही. विरोध कसा केला पाहिजे, तो जनतेत कसा गेला पाहिजे, याकरिता आवश्यक असेल तर माझा ओरिजिनल डीएनए हा हा विरोधी पक्षाचा आहे. मी यांची शिकवणी घ्यायला तयार आहे. विरोधी पक्षांनी कसे वागले पाहिजे, हे निश्चितपणे मी या लोकांना शिकवू शकतो," असे म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
इतर महत्त्वाच्या बातम्या
Before You Go
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha





















