मुंबई: मुंबईमध्ये सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये घडलेले अनेक प्रसंग चांगलेच चर्चेत येत आहेत, अशातच तुम्हाला इकडे येण्याचा स्कोप आहे, त्याचा विचार वेगळ्या पद्धतीने करता येईल, अशी ऑफर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadavis) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना विधान परिषदेतच दिल्याने चर्चेला आणखी एक विषय मिळाला. फडणवीस (Devendra Fadavis) यांनी ही ऑफर दिली तेव्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावरील भाव पाहण्यासारखे झाले होते, तर नजीकच्या भविष्यात आणखी काही धक्कादायक घडणार की काय, अशी चर्चा नेत्यांमध्ये रंगली, तर फडणवीसांच्या (Devendra Fadavis) वक्तव्यानंतर नेत्यांच्या भुवया देखील उंचावल्या, दरम्यान फडणवीसांच्या या वक्तव्याला धरून आमदार आदित्य ठाकरे यांनी देखील फडणवीसांसमोर केलेलं बोललेलं एक वाक्य आणि त्या क्षणाचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.
नेमकं काय घडलं?
अधिवेशनामध्ये ऑफरचा किस्सा झाल्यानंतर संध्याकाळच्या वेळी देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांची एका ठिकाणी ओझरती समोरासमोर भेट झाली, त्यावेळी आदित्य ठाकरे फडणवीसांना मिश्कीलपणे म्हणाले, तुम्ही ऑफर दिलीत म्हणून स्वागताला उभा राहिलो आहे, या वक्तव्यानंतर दोन्ही नेते आणि उपस्थितांमध्ये हशा पिकला, त्यानंतर दोन्ही नेत्यांनी हस्तांदोलन केलं आणि एकमेकांचा निरोप घेऊन पुढे ते आपापल्या कामासाठी पुढे निघून गेले, मात्र या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर चर्चेत आलं आहे.
ठाकरे अन् फडणवीसांची आधी भेट नंतर ऑफर
आधी सभागृहाच्या परिसरात उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची भेट झाली आणि नंतर सभागृहात फडणवीसांनी केलेल्या एका जाहीर वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू झाली. देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना थेट सभागृहात ऑफर दिली आहे. आम्हाला विरोधी पक्षात जाण्याचा स्कोप 2029 पर्यंत नाही, मात्र तुम्हाला मात्र इकडे येण्याचा स्कोप असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्याचे आता तर्कवितर्क लढवले जात आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या आमदारकीचा शेवटचा दिवस होता. त्यांच्या निरोप समारंभाच्या निमित्ताने बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना जाहीर ऑफर दिली. त्या आधी या दोन्ही नेत्यांची सभागृहाबाहेरही भेट झाली होती.
उद्धव ठाकरेंना सत्तेत येण्याचा स्कोप
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उद्धवजी आता 2029 पर्यंत काही करायचं नाही. आम्हाला तिकडे यायचा स्कोप उरला नाही. मात्र तुम्हाला इकडे यायचा स्कोप आहे. त्यावर वेगळ्या पद्धतीने विचार करता येईल. आपण वेगळ्या पद्धतीने बोलू.