मुंबई : राज्यातील महायुतीच्या फडणवीस सरकारचं पहिलंच अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षातील नेत्यांनी बैठक घेऊन पुढील अधिवेशनाच्या अनुषंगाने चर्चा केली. महाविकास आघाडीतील नेत्यांच्या बैठकीला शिवसेना ठाकरे गटाचे नेते व आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हेही उपस्थित होते. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच, राज्यातील महिला अत्याचारांच्या व गुन्हेगारीच्या घटनांवरुन गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) देखील लक्ष्य केलं. केंद्रीयमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची काही समाजकंटकांकडून छेड काढण्यात आल्याने राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. याप्रकरणी, पोलिसांनी एकाला ताब्यातही घेतलं आहे. त्याच अनुषंगाने आदित्य ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी, राज्यात गेल्या 10 वर्षांपासून फडणवीस हेच गृहमंत्री आहेत, अेस आदित्य यांनी म्हटले. 

जळगावमधील मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावात संत मुक्ताई यात्रेमध्ये केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह काही मुलींची टवाळखोरांनी छेडछाड केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. त्यावरुन, राजकीय प्रतिक्रिया उमटत असून रक्षा खडसे ह्या केंद्रीय मंत्री आहेत, त्यापेक्षा त्या महिला आहेत हे महत्वाचं. खासदार सुप्रिया सुळेंना आर्वाच्च भाषेत बोलणाऱ्यांना याआधीच्या सरकारमध्ये मंत्री केलं. राज्यात गेल्या 10 वर्षांपासून देवेंद्र फडणवीस हेच गृहमंत्री आहेत, त्यात मधली अडीच वर्षे सोडली तर असे म्हणत आदित्य ठाकरेंनी नाव घेत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. तसेच, पोलिसांचे हात बांधले आहेत, कोणी आपल्यात येत आहे का त्यासाठी गुन्हेगारांना सूट दिली आहे, त्याचे हे परिणाम असल्याचंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं. 

खुन्याच्या आकाच्या मांडीला मांडी लावून बसतात

भाजपच्याच सरपंचाला न्याय मिळत नाही, त्याचा खून होतं आहे. खुन्याच्या आकाच्या मांडीला मांडी लावून हे बसत आहेत, असे म्हणत आदित्य ठाकरेंनी सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणावरुनही फडणवीस सरकारला लक्ष्य केलं. तसेच, मंत्री धनंजय मुंडे अद्यापही सरकारमध्ये असल्याने तीव्र शब्दात भावना व्यक्त केल्या आहेत.   

आदित्य ठाकरेंचे सत्ताधाऱ्यांना प्रश्न

आम्ही विरोधी पक्ष म्हणून मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे, आमच्यात जागेवरून वाद नाही, हे जनतेचे प्रश्न आहेत. कारवाई सत्तेत नसलेल्यांवर होते तशी सत्तेत असलेल्यांवर का होतं नाही? ईव्हीएमवर तुम्ही निवडून आलात, वचनपूर्ती करणार का? लाडक्या बहिणीचे पैसे वाढवणार की नाही, असे अनेक सवाल आदित्य ठाकरे यांनी विचारले आहेत. शक्ती कायदा राष्ट्रपतींनी परत पाठवला, सत्ताधारी पक्षाला माज आला आहे. पदं येत जात असतात,  उद्या त्याचाही विरोधी पक्षावरुन वाद होईल, पालकमंत्री पदावरून, मालकमंत्री कोण होणार, बंगल्यावरुन वाद सुरू आहेत, असे म्हणत महायुतीमधील अंतर्गत वादावरही आदित्य यांनी भाष्य करत टीका केली. 

जय शाह अन् अनुराग ठाकूर आफ्रिदींसोबत का मॅच बघतात?

सामनाचे मुखपत्र असलेल्या 'रोखठोक' सदरासंदर्भातील प्रश्नावरही आदित्य ठाकरेंनी भूमिका मांडली. काही गोष्टी आतून कळतात ते म्हटलं असेल, आम्ही कोणाला भेटायला हुडी घालून गलो नाही, असे म्हणत नाव न घेता मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा साधला.  तर, संजय राऊत मनसेच्या पुस्तक प्रदर्शनाला गेल्यावरुन होत असलेल्या टीकेवरही त्यांनी भाष्य केलं. भाजपकडून एक उत्तर अपेक्षित आहे, जय शहा व अनुराग ठाकूर दुबईत शोएब अख्तर, शाहीद आफ्रीदींसोबत मॅच बघतात, त्याचे फोटो बाहेर आले आहेत. या दोघांनी भारताविरोधात मोदींविरोधात वक्तव्य केली आहेत. बांग्लादेशात हिंदूंवर अत्याचार होत असताना त्या देशाला भारतात खेळायला बोलवलं जातं, असे म्हणत भाजप नेत्यांच्या भूमिकेवरच प्रश्न उपस्थित केले. MMRAD चा विषय महत्वाचा आहे, पिलरचे गर्डर लावलले नाहीत. मात्र रंगरंगोटी केली आहेत. यात ७४ कोटी काढले, सिस्ट्राने हे पत्र लिहिलेलं नाही हे फ्रान्सकडून आलेलं आहे. या मैत्रीत खडा फिक्सर टाकत आहेत. आम्ही सर्व प्रश्न घेतले आहेत, हे आमचे प्रश्न नाहीत तर सर्वसामान्याचे आहेत. मुख्यमंत्री सुसंवाद विरोधकांसोबत साधायचा असल्याचे म्हणतात. मात्र, उघड भ्रष्टाचार होत आहेत, त्याची नावे जाहीर करा, असे चॅलेंजच आदित्य ठाकरेंनी दिले आहे. 

हेही वाचा

हीच खरी श्रद्धांजली... वडिलांच्या पार्थिवाला मुखाग्नी देऊन लेकाने दिला दहावीच्या इंग्रजीचा पेपर