Vidyanand Bapat Marathi News: पुण्यातील विद्यानंद बापट (Vidyanand Bapat) यांची सध्या महाराष्ट्रभर चर्चा सुरु आहे. विद्याधर बापट नारायण पेठेतील रहिवासी आणि पर्यावरणप्रेमी नागरिक आहेत. गणेशोत्सवातील डीजेच्या मोठ्या आवाजाला विरोध केल्यामुळे विद्यानंद बापट सध्या चर्चेत आले आहेत. याचदरम्यान, आज विद्यानंद बापट (Vidyanand Bapat) यांना मारहाण झाली आहे. मारहाण करणाऱ्या संतोष चव्हाणला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे, तर या घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis)  प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईमध्ये माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, शेवटी प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. त्या पध्दतीनं मत मांडत असताना हल्ला करणं योग्य नाही. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे, असंही पुढे फडणवीसांनी म्हटलं आहे. (Vidyanand Bapat)

Continues below advertisement

फडणवीसांनी म्हटलं की, "अशा प्रकारे मारहाण करणं योग्य नाही, शेवटी प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. त्या पध्दतीनं मत मांडत असताना हल्ला करणं योग्य नाही. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे, मला असं वाटतं की, एकमेकांना समजून, एकमेकांच्या भावना समजून या पुण्यासारख्या ठिकाणी मला असे वाद योग्य वाटतं नाहीत. मी पहिले देखील सांगितलं की गणेश उत्सव पारंपारिक पध्दतीकडे नेला पाहिजे, आपल्या गणेशोत्सव पारंपारिक पद्धतीकडे नेला पाहिजे त्या दृष्टीने काय करता येईल त्या सर्व गोष्टी केल्या पाहिजेत कदाचित पहिल्या वर्षी शंभर टक्के होणार नाही पण शंभर टक्के जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असंही पुढे फडणवीसांनी म्हटलं आहे. (Vidyanand Bapat Beating)

Vidyanand Bapat Beating : सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांना गुरुवारी मारहाण 

पुण्यातील गणेशोत्सवातील मिरवणुकांमध्ये डीजे आणि ढोल पथकांच्या माध्यमातून होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाविरोधात आवाज उठवणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांना गुरुवारी मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. विद्यानंद बापट यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे धार्मिक संघटना, डीजेप्रेमी आणि ढोलवादक पथकातील अनेकजण नाराज झाले होते. विद्यानंद बापट यांनी यापूर्वी पुणे महानगरपालिकेच्या सभेत डीजेला विरोध केला होता. तेव्हाही गणेश मंडळांचे प्रतिनिधी आणि राजकीय व्यक्तींनी बापट यांना विरोध केला होता. तेव्हादेखील बापट यांना पालिकेच्या सुरक्षारक्षकांनी बंदोबस्तात बाहेर काढले होते. मात्र, आता विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला झाला आहे. त्यांना मारहाण करण्यात आली आहे.

Continues below advertisement

Vidyanand Bapat Beating : हल्ला झाल्यानंतर विद्यानंद बापट काय म्हणाले?

तुम्ही मला विचारत होतात तेव्हा एक वेडा आला आणि त्याने हल्ला केला. मी सशस्त्र नव्हतो, पोलीस नव्हते बघून हल्ला केला. पोलिसांकडे रिव्हॉल्व्हर नाही. मी म्हणतोय ना, घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात्...चिप प्रसिद्धीसाठी हल्ला केला. सवंग प्रसिद्धीसाठी त्याने माझ्यावर हल्ला केला. या सगळ्याचे व्हिडीओ फुटेज आहे, ते पोलिसांनी बघून कारवाई करावी. त्याला पोलीस चौकीत घेऊन तुडवून काढा. म्हणजे मुद्द्याचे उत्तर गुद्द्याने द्यायचे नसते, हे त्याला कळेल. त्याला सरळ सांगून कळणार नाही. त्याच्याशी काय युक्तिवाद करणार का, झोंबीसोबत युक्तिवाद होतो का उत्सव सार्वजनिकरित्या साजरा करताना ध्वनीप्रदूषण होणार नाही आणि रहदारीस अडथळा होणार नाही,याची खबरदारी घ्यावी, हे माझे म्हणणे आहे. बाकी तुम्ही उत्सव साजरे करु शकता. त्याबाबत मी आक्षेपच घेतलेला नाही. सवंग प्रसिद्धीसाठी माझ्यावर हल्ला करण्यात आला.