Devendra Fadnavis On Baramati By Election 2026: राज्याचे लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी (Baramati By Election 2026) उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) रिंगणात आहेत. त्यामुळे बारामतीची पोटनिवडणुक बिनविरोध व्हावी, अशी हालचाल सुरु आहे. मात्र काँग्रेसने माघार न घेण्याची ठाम भूमिका घेतल्यामुळे आता बारामतीत निवडणूक होणे जवळपास निश्चित आहे. याचदरम्यान, महाराष्ट्राच्या राजकारणातील अचंबित करणारी घटना आज घडली आहे. (Sunetra Pawar Baramati By Election 2026)

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (harshwardhan sapkal) यांना फोन केला. यावेळी सुनेत्रा पवार यांच्या बिनविरोध निवडीसाठी काँग्रेसने बारामतीतून उमेदवार मागे घ्यावा, अशी विनंती देवेंद्र फडणवीसांनी केली, अशी विश्वासनीय सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांच्या या फोननंतर काँग्रेस आणि हर्षवर्धन सपकाळ बारामती पोटनिवडणुकीतील उमेदवार मागे घेणार का?, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (Devendra Fadnavis On Baramati By Election 2026)

राज्याच्या राजकारणात सर्वात अचंबित करणारी घटना- (Devendra Fadnavis On Baramati By Election 2026)

राज्याच्या राजकारणात सर्वात अचंबित करणारी घटना घडली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चक्क प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना फोन केला आहे. फडणवीसांनी हर्षवर्धन सपकाळ यांना फोन करुन, बारामती पोटनिवडणुकीबाबत चर्चा केली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या बारामतीची पोटनिवडणूक लढवत आहेत, त्यांच्याविरुद्ध काँग्रेसने उमेदवार दिला आहे. मात्र सुनेत्रा पवार यांच्या बिनविरोध निवडीसाठी काँग्रेसने बारामतीतून उमेदवार मागे घ्यावा, अशी विनंती देवेंद्र फडणवीस यांनी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यातील प्रमुख असलेल्या भाजपच्या नेत्याने काँग्रेसच्या प्रमुख नेत्याला फोन करण्याची ही राज्याच्या राजकारणातील पहिलीच वेळ असण्याची शक्यता आहे.

शरद पवारांचीही काँग्रेससोबत चर्चा- (Sharad Pawar Baramati Byelection 2026)

दरम्यान, दुसरीकडे राष्ट्रवादी पवार गटाचे नेते शरद पवार यांनीही दिल्लीतील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा केली आहे.  बारामती पोटनिवडणुकीतील उमेदवारी मागे घेण्याबाबत शरद पवारांनी दिल्लीतील काँग्रेस नेत्यांसोबत चर्चा केली. काँग्रेस माघार घेण्यासंदर्भात विचार करत असल्याचं काँग्रेसच्या नेत्यांकडून शरद पवारांना सांगितल्याची सूत्रांची माहिती आहे.  शरद पवारांच्या फोन नंतर काँग्रेस नेमकी भूमिका काय घेणार? याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

देवेंद्र फडणवीसांचा सुनेत्रा पवारांना शब्द- (Devendra Fadnavis On Sunetra Pawar)

दरम्यान, सुनेत्रा पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी कालच देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यावेळी देवेंद्र  फडणवीसांनी संपूर्ण ताकदीने पाठीशी असल्याचा शब्द सुनेत्रा पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना दिला होता. त्यानंतर आज देवेंद्र फडणवीसांनी थेट काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना फोन फिरवून, उमेदवार मागे घेण्याची विनंती केली. 

बारामती विधानसभेसाठी 23 एप्रिलला मतदान- (Baramati By Election 2026)

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी 2026 रोजी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुक होत आहे.  बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी येत्या 23 एप्रिल रोजी मतदान होईल. त्यानंतर 4 मे रोजी बारामतीच्या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर केला जाईल.

संबंधित बातमी:

Sharad Pawar On Baramati By Election 2026: काँग्रेसला मी सांगू शकत नाही, पण एक सल्ला देईन...; शरद पवारांचं बारामतीच्या पोटनिवडणुकीबाबत मोठं विधान