एक्स्प्लोर

Amit Shah and Devendra Fadnavis: अमित शाह- देवेंद्र फडणवीसांची बंद दाराआड चर्चा, दोन महत्त्वाच्या गोष्टींबाबत चर्चा, दिल्लीत काय घडलं?

Amit Shah and Devendra Fadnavis: काल दिल्लीत एक महत्त्वाची बैठक पार पडली होती. अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली.

Amit Shah and Devendra Fadnavis: नर्मदा प्रकल्पाबाबत दिल्लीत मंगळवारी केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली चार राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक पार पडली. ही बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अमित शाह (Amit Shah) यांची स्वतंत्र बैठक झाली. बंद दाराआड झालेल्या या चर्चेत उभय नेत्यांमध्ये महाराष्ट्र आणि राष्ट्रीय राजकारणातील समीकरणांविषयी चर्चा झाल्याची माहिती आहे. (Maharashtra Politic news)

सूत्रांच्या माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळी 7 ते रात्री 10 दरम्या अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची स्वतंत्र भेट झाली. या भेटीत फडणवीस आणि अमित शाह यांनी राज्यातील भविष्यातील रणनीतीवर चर्चा केल्याची माहिती आहे. या दोन्ही नेत्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार, राष्ट्रीय भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातील चेहऱ्यांचा समावेश याबाबत सविस्तर बोलणी केली. सूत्रांच्या माहितीनुसार, अमित शाह आणि फडणवीस यांच्यातील बैठकीनंतर राज्यातील मंत्रिमंडळात सध्या कोणताही बदल केला जाणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. त्याशिवाय अमित शाह यांनी काल गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचीही स्वतंत्र भेट घेतली.

नर्मदा प्रकल्पाच्या कालच्या दिल्लीतील बैठकीला अमित शाह, देवेंद्र फडणवीस, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, मध्य प्रदेशचे मुख्य सचिव अनुराग जैन, अतिरिक्त मुख्य सचिव नीरज मंडलोई आणि इतर वरिष्ठ सरकारी अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत नर्मदा नदी प्रकल्पातील पाण्याचे वाटप, बाधित लोकांचे पुनर्वसन आणि जमिनीचा मोबदला यांसारख्या दशकांपासून प्रलंबित असलेल्या वादांवर महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक सहमती झाल्याचे समजते.

Sharad Pawar NCP: शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीसोबत सत्तेत सामील होण्याची चर्चा, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
 
भाजपचे राष्ट्रीय नेते विनोद तावडे आणि शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्या मुंबईतील गुप्त भेटीनंतर शरद पवार गट महायुतीसोबत सत्तेत सामील होणार, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना या सर्व चर्चा फेटाळून लावल्या. "महाराष्ट्रातून NDA मध्ये कुठला नवीन पक्ष येणार नाही. आता जे पक्ष आहेत तेच पक्ष NDA मध्ये राहतील. कुठलाही नवीन पक्ष आता एनडीएमध्ये येण्याची आमची चर्चा नाही", असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. "आम्ही शरद पवारांच्या सोबतच्या कुणालाही फोडण्याचा प्रयत्न करत नाही. जे त्यांच्यासोबत आहेत, शरद पवार यांच्या पक्षात जे आमदार आणि खासदार आहेत, त्यापैकी कुणालाही फोडण्याचा आमचा प्रयत्न नाही", असेही फडणवीसांनी सांगितले.

आणखी वाचा

Vinod Tawde and Jayant Patil: शरद पवार गट महायुतीसोबत सत्तेत सामील होणार?; जयंत पाटील आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा, बैठकीत काय घडलं?

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला गोकुळ कामगार संघटनेचा जाहीर पाठिंबा; 'गेट मीटिंग' घेत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला गोकुळ कामगार संघटनेचा जाहीर पाठिंबा; 'गेट मीटिंग' घेत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
नवनीता राणा, नवनाथ हे चिल्लर विषय; रामरक्षा आंदोलनावर टीका, अंबादास दानवे भाजप प्रवक्त्यांवर संतापले
नवनीता राणा, नवनाथ हे चिल्लर विषय; रामरक्षा आंदोलनावर टीका, अंबादास दानवे भाजप प्रवक्त्यांवर संतापले
'तर मग तिसऱ्या भाषेची काय गरज? नववीच्या विद्यार्थ्यांवर तिसऱ्या भाषेचं ओझं टाकू नका, पाचवी किंवा सहावीपासून सुरुवात करा..' सुप्रीम कोर्टाची थेट फटकार
'तर मग तिसऱ्या भाषेची काय गरज? नववीच्या विद्यार्थ्यांवर तिसऱ्या भाषेचं ओझं टाकू नका, पाचवी किंवा सहावीपासून सुरुवात करा..' सुप्रीम कोर्टाची थेट फटकार
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
Maharashtra Dam Water Storage: राज्यभरात पावसाची प्रतीक्षा कायम! धरणसाठा खालावला, खडकवासला ते जायकवाडी कुठे किती पाणीसाठा शिल्लक? वाचा सविस्तर
राज्यभरात पावसाची प्रतीक्षा कायम! धरणसाठा खालावला, खडकवासला ते जायकवाडी कुठे किती पाणीसाठा शिल्लक? वाचा सविस्तर
तू ऊसात चल... सुनेचा विनयभंग करणाऱ्याला जाब विचारला; 70 वर्षीय सासऱ्यालाच संपवलं, परप्रांतीय मजुराला अटक
तू ऊसात चल... सुनेचा विनयभंग करणाऱ्याला जाब विचारला; 70 वर्षीय सासऱ्यालाच संपवलं, परप्रांतीय मजुराला अटक
Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला गोकुळ कामगार संघटनेचा जाहीर पाठिंबा; 'गेट मीटिंग' घेत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला गोकुळ कामगार संघटनेचा जाहीर पाठिंबा; 'गेट मीटिंग' घेत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
'तर मग तिसऱ्या भाषेची काय गरज? नववीच्या विद्यार्थ्यांवर तिसऱ्या भाषेचं ओझं टाकू नका, पाचवी किंवा सहावीपासून सुरुवात करा..' सुप्रीम कोर्टाची थेट फटकार
'तर मग तिसऱ्या भाषेची काय गरज? नववीच्या विद्यार्थ्यांवर तिसऱ्या भाषेचं ओझं टाकू नका, पाचवी किंवा सहावीपासून सुरुवात करा..' सुप्रीम कोर्टाची थेट फटकार
100 ISRO Scientists Quit Their Jobs: अवघ्या 10 महिन्यात इस्रोच्या तब्बल 100 शास्त्रज्ञांचा नोकरीला रामराम! महत्वाकांक्षी गगनयान आणि इतर मोहिमांमध्ये सहभागी असलेल्या शास्त्रज्ञांचा सुद्धा समावेश
अवघ्या 10 महिन्यात इस्रोच्या तब्बल 100 शास्त्रज्ञांचा नोकरीला रामराम! महत्वाकांक्षी गगनयान आणि इतर मोहिमांमध्ये सहभागी असलेल्या शास्त्रज्ञांचा सुद्धा समावेश
कंपनीवर आरोप करत तरुणाची तापी नदीत उडी, दोन दिवसांनी सापडला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिस स्टेशनबाहेर ठिय्या
कंपनीवर आरोप करत तरुणाची तापी नदीत उडी, दोन दिवसांनी सापडला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिस स्टेशनबाहेर ठिय्या
Koel Mallick: तृणमूलच्या आणखी एका राज्यसभा खासदाराचा राजीनामा; चार महिन्यांपूर्वीच नियुक्ती, भाजप नेत्याची सुद्धा घेतली भेट
तृणमूलच्या आणखी एका राज्यसभा खासदाराचा राजीनामा; चार महिन्यांपूर्वीच नियुक्ती, भाजप नेत्याची सुद्धा घेतली भेट
Embed widget