Parvesh Verma slapped a young man: आम आदमी पार्टीने 'एक्स'वर एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये दिल्ली सरकारचे मंत्री प्रवेश वर्मा एका तरुणाला कानशिलात मारताना दिसत आहेत. 'आप'चा आरोप आहे की, काही लोक त्यांना रस्ते बांधणीतील भ्रष्टाचाराबद्दल प्रश्न विचारत होते. त्याचवेळी, त्यांनी तिथे उभ्या असलेल्या एका तरुणाला कानशिलात मारली. मात्र, त्यानंतर त्यांच्या अंगरक्षकांनी त्या तरुणाला तिथून हटवले.
केजरीवाल म्हणाले, मी तिथं जाणार
दरम्यान, माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी व्हिडिओ पोस्ट करत घटनास्थळी भेट देणार असल्याचे म्हटलं आहे. केजरीवाल म्हणाले की, "मी उद्या तिथे जाईन." हा व्हिडिओ पुन्हा पोस्ट करत, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंत्री प्रवेश वर्मा यांना अटक करण्याची मागणी केली. त्यांनी 'एक्स'वरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, ते उद्या घटनास्थळी भेट देतील.
आशुतोष रांकांसह सीजेपीचे अनेक कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात
दरम्यान, आसाममध्ये सीजेपीची नियोजित स्वयंसेवक सभा सुरू होण्यापूर्वीच थांबवण्यात आली. गुवाहाटी पोलिसांनी सीजेपीचे सह-संयोजक आशुतोष रांका यांच्यासह पक्षाचे अनेक नेते आणि स्वयंसेवकांना ताब्यात घेतले. या अटकेनंतर, सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी आसाम पोलिसांवर टीका केली. त्यांनी आरोप केला की, पोलिसांनी आशुतोष रांका आणि त्यांच्या टीमला एका अज्ञात ठिकाणी नेले. अभिजित दीपके यांनी 'एक्स'वर पोस्ट केले की, सीजेपीचे नेते एका छोट्या स्वयंसेवक सभेला जात असताना त्यांना ताब्यात घेण्यात आले.
इतर महत्वाच्या बातम्या
