Dattatray Bharne on Maharashtra Karjmafi : पीक विमा योनेच्याधोरणातकुठलाहीबदलकरण्यातयेणारनसूनजुने तेच धोरणयंदादेखीलकायमराहणार आहे. अडचणी येऊ नये म्हणून यासंदर्भात काम केलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या फायद्याचं काम होईल, धोरणात कुठले ही बदल केले नाहीत. अशीमाहितीराज्याचेकृषीमंत्री कृषीमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane)  यांनीदिलीआहे. तरराज्यातील 31लाख प्रोत्साहन अनुदान लाभार्थी आहे. त्यातील 17 लाख लोकांपर्यंत कर्जमाफी (Farmers Debt) देत आहोत. प्रोत्साहन अनुदान तिसऱ्या किंवा चौथ्या यादीत येईल. यात 5 लाख लोकांनी केवायसी झालेले आहे. त्यामुळे त्यांना रक्कम द्यायला कुठली ही अडचण येणार नाही अशीदेखीलमाहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) यांनीदिली. राज्यातील 23 लाख शेतकऱ्यांची (Farmers Debt) प्रोत्साहन यादी आहे. त्यामुळे अजिबात काळजी करू नका. रक्कम कमी आली असली तरी वरची रक्कम राष्ट्रकृत बँक देणार असल्याचेहीतेम्हणाले.(Dattatray Bharane On Farmers Debt)

Dattatray Bharne : खताच्या बाबतीत घाबरण्याची गरज नाही

Continues below advertisement

छत्रपती शिवाजी महाराज योजनेतील जे शेतकरी राहिले होते त्यांना रक्कम दिली जाईल. यात पात्र शेतकऱ्यांना त्यांची रक्कम मिळणार आहे. तसेच साखरेच्या भावात वाढ झाली आहे. त्याचा फायदा नक्की शेतकऱ्यांना होणार आहे. मराठवाड्यात कमी पाऊस पडत असूनआतापर्यंत मराठवाडा विभागात 77 टक्के पाऊस पडलाय. तर कोकणात पाऊस जास्त आहे. कोकणात पेरणी 84 टक्के पेक्षा जास्त झाली आहे. तरतिकडे अमरावतीत 92 टक्के पेरणी झालीअसून ठाणे जिल्ह्यात सर्वांत कमी पेरणी झालीआहे. मका, सुर्यफुल पीक पेरणी यंदा जास्त असून 45 लाख 10 हजार हेक्टर पेरणी झाली आहे. 24 हजार हेक्टर सोयाबीन पेरणीबाबत तक्रारी आल्या आहेत. खताचा साठा राज्यात मागणी प्रमाणे उपलब्ध आहे. त्यामुळे खताच्या बाबतीत घाबरण्याची गरज नाही. असेही कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले

Dattatray Bharne : राज्यात सरासरी 84 टक्के पेरण्या; अमरावती मध्ये 92 टक्के तर सगळ्यात कमी ठाणे जिल्ह्यात

Continues below advertisement

आज राज्यात सगळीकडे पाऊस बऱ्यापैकी पडत आहे. विशेषतः धरणांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होते आहे. फक्त मराठवाड्यात पाऊस कमी आहे, पण येणाऱ्या दिवसात तिथे ही पावसाचा अंदाज आहे. कोकणात 111 टक्के, नाशिक 83, पुणे 87, मराठवाडा 77 आणि विदर्भात 73 टक्के पाणीसाठा आहे. तर राज्यात सरासरी 94 टक्के पाऊस झाला आहे. राज्यात सरासरी 84 टक्के पेरण्या झाल्या आहेत. अमरावती मध्ये 92 टक्के तर सगळ्यात कमी ठाणे जिल्ह्यात पेरण्याझाल्याआहेत. मक्याची आणि सूर्यफुलाची पेरणी राज्यात सर्वात जास्त आहे. 45 लाख हेक्टर पेरणी राज्यात पूर्ण झाली असल्याचीमाहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनीदिलीआहे.