Dattatray Bharane: सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे (NCP Ajit Pawar Faction) माजी आमदार भाजपमध्ये (BJP) प्रवेशाच्या तयारीत असल्याच्या हालचालीनंतर आज कृषीमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) यांनी टेंभुर्णी येथे एक बैठक घेत पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी माध्यमांशी बोलताना इंदापूरमधून दत्तात्रय भरणे जरी अजितदादांना (Ajit Pawar) सोडून गेले तरी त्यांना काही फरक पडणार नाही, अशा शब्दात पक्ष सोडू इच्छिणाऱ्या नेत्यांना त्यांनी अप्रत्यक्ष इशारा दिलाय. 

Continues below advertisement

मात्र भरणे जर सोडून जात असतील तर त्यांची समजूत काढणे गरजेचे आहे आणि यासाठीच जे नाराज नेते पक्ष सोडायच्या तयारीत आहेत. त्यांची आपण भेट घेऊन समजूत घालणार, अशी भूमिका आज दत्तात्रय भरणे यांनी मांडली. अजून पक्षाच्या कोणत्याही नेत्यांनी पक्ष सोडण्याबाबत जाहीर वक्तव्य केलेले नाही . जे नाराज आहेत त्याची कारणे ही छोटीशी किंवा गैरसमजातून पुढे आलेली असतील. मात्र आपण त्यांची भेट घेऊन नाराजी दूर करू, असा विश्वास भरणे यांनी व्यक्त केला. 

Dattatray Bharane: केवळ संवादासाठी आलोय, डॅमेज कंट्रोलसाठी नाही

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मोहोळचे माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार यशवंत माने, सांगोल्याचे माजी आमदार दीपक साळुंखे व माढ्याचे माजी आमदार बबन शिंदे यांचे गट भाजपमध्ये पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. संदर्भात या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेटही घेतली होती. त्यानंतर डॅमेज कंट्रोलसाठी आलेल्या कृषिमंत्र्यांनी आपण केवळ संवादासाठी आलो आहोत. डॅमेज कंट्रोलसाठी नाही, असा खुलासा केला. मात्र महाराजांची भेट घेऊन समजूत घालणार असे सांगताना हा सर्व प्रकार केवळ डॅमेज कंट्रोलसाठी आणि पुढील गळती रोखण्यासाठी असल्याचे उघड झाले. 

Continues below advertisement

Dattatray Bharane: अजित पवारांचे सोलापूर जिल्ह्यावर खूप प्रेम

यावेळी बोलताना दत्तात्रय भरणे यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात देखील अनेक इच्छुकांची रांग लागली असून योग्य वेळी त्यांना प्रवेश देऊ असे सांगितले. अजित पवारांचे सोलापूर जिल्ह्यावर खूप प्रेम असून जिल्ह्यातील नेतेही दादांवर प्रेम करतात. त्यामुळे कोणीही सोडून जाणार नाही, असा विश्वास देखील दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केलाय. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Municipal-Nagarpalika Election 2025: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी महायुतीमध्ये धुसफूस; ठाणे, नवी मुंबईपासून सातारा, सांगली, रायगडपर्यंत...कोणत्या जिल्ह्यात काय परिस्थिती?, A टू Z माहिती

निवडणुकीच्या तोंडावर रायगडमध्ये मंत्री गोगावलेंची खेळी, राष्ट्रवादीला धक्का, तटकरेंचे निकटवर्तीय शिवसेनेत दाखल