Dada Bhuse: राज्यातील शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच 'टीईटी' पेपरफुटी (TET Paper Leak) प्रकरणावरून राजकीय आणि सामाजिक वातावरण कमालीचे तापले आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शासकीय विश्रामगृहात (Malegaon Government Rest House) राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे  (Dada Bhuse) यांच्या उपस्थितीत एक महत्त्वाची बैठक पार पडली. 

Continues below advertisement

या बैठकीत 'वंचित बहुजन आघाडी' (Vanchit Bahujan Aghadi) आणि 'सम्यक' विद्यार्थ्यांनी थेट मंत्री दादा भुसे यांच्या समोरच त्यांच्या राजीनाम्याची (Resignation) मागणी केल्याचे पाहायला मिळाला. विद्यार्थ्यांच्या या आक्रमक मागणीवर प्रत्युत्तर देताना मंत्री दादा भुसे यांनी, "ज्यावेळेस राजीनामाचा द्यायचा असेल त्यावेळेस कोणाला सांगायची गरज नाही, मी स्वतःहून राजीनामा देईल," असे मोठे वक्तव्य केले. 

Dada Bhuse: भर बैठकीत मंत्र्यांसमोरच राजीनाम्याची मागणी

मालेगाव शासकीय विश्रामगृहात मंत्री दादा भुसे आणि वंचित सम्यक विद्यार्थ्यांची ही बैठक झाली. या बैठकीत विद्यार्थ्यांनी टीईटी पेपरफुटीविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. "राज्यात पेपर फुटी झाल्यानंतर आजपर्यंत कोणत्याही मंत्र्याने नैतिक जबाबदारीस्वीकारून राजीनामा दिलेला नाही. जर तुम्ही या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला, तर हा संपूर्ण राज्यामध्ये एक ऐतिहासिक निर्णय ठरेल," अशी मागणी वंचित आघाडी व सम्यक विद्यार्थ्यांनी लावून धरली. यावेळी विद्यार्थ्यांनी जुन्या प्रकरणांचा हवाला देत, "माजी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांच्या कार्यकाळातही असाच घोटाळा झाला होता," अशी आठवण करून दिली.

Continues below advertisement

Dada Bhuse: 8 दिवसांचा अल्टिमेटम; राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

विद्यार्थी प्रतिनिधींनी मंत्री दादा भुसे यांना केवळ निवेदन दिले नाही, तर थेट इशाराही दिला आहे. "आमच्या मागण्यांवर पुढील 8 दिवसांत सकारात्मक निर्णय होऊन मागण्या मान्य न झाल्यास, संपूर्ण महाराष्ट्रात व्यापक स्वरूपाचे राज्यव्यापी आंदोलन उभारले जाईल," असा अल्टिमेटम विद्यार्थ्यांनी प्रशासनाला दिला आहे.

Dada Bhuse: दोन दिवसांपूर्वी निवासस्थानाबाहेर झाले होते धरणे आंदोलन

टीईटी पेपरफुटी प्रकरणावरून मालेगावात गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांचा रोष पाहायला मिळत आहे. या बैठकीच्या दोन दिवसांपूर्वीच वंचित बहुजन आघाडी आणि सम्यक विद्यार्थी आघाडीच्या कार्यकर्त्यांनी थेट मंत्री दादा भुसे यांच्या मालेगावातील निवासस्थानासमोर जोरदार धरणे आंदोलन केले होते. त्यावेळीही आंदोलकांनी मंत्र्यांच्या राजीनाम्याची घोषणाबाजी केली होती. त्यानंतर आज शासकीय विश्रामगृहात मंत्री आणि विद्यार्थी आमनेसामने आल्याचे पाहायला मिळाले. 

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

TET पेपर फुटीप्रकरणी आरोपींना 8 दिवसांची पोलीस कोठडी, न्यायालयात काय झालं? आरोपीचे वकील अन् पोलिसांचा तपास

 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI