एक्स्प्लोर

Manoj Jarange Patil Mumbai : मनोज जरांगे मुंबईला निघताच समर्थक अन् नागरिकांची गर्दी; चोरट्याने मोबाईल, पैशांवर मारला डल्ला; आंदोलकांनी रंगेहाथ पकडून चोपलं

Manoj Jarange Patil Mumbai : सतर्क आंदोलकांनी चोरट्याला जागेवरच रंगेहाथ पकडले आणि चांगलाच चोप दिला.

जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे आंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने रवाना होत असताना, त्या ठिकाणी जमलेल्या अफाट गर्दीचा फायदा घेत एका चोरट्याने नागरिकांचे मोबाईल (Manoj Jarange Patil Mumbai) आणि पैसे चोरण्याचा प्रयत्न केला. मनोज जरांगे यांना (Manoj Jarange Patil Mumbai) निरोप देण्यासाठी आणि त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी अनेक समर्थक व नागरिक एकत्र आले होते. याच गर्दीचा गैरफायदा घेत चोरट्याने हातसाफ केला; मात्र, हा प्रकार उपस्थित आंदोलक आणि नागरिकांच्या तात्काळ लक्षात आला. सतर्क आंदोलकांनी चोरट्याला जागेवरच रंगेहाथ पकडले आणि चांगलाच चोप दिला. यानंतर संतप्त नागरिकांनी या चोरट्याला पुढील कायदेशीर कारवाईसाठी पोलिसांच्या स्वाधीन केले.(Manoj Jarange Patil Mumbai)

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आंतरवाली सराटी येथून मुंबईमध्ये येऊन आंदोलन करण्याच्या आपल्या निर्धारावर ठाम राहत मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. अंतरवाली सराटीमधून निघताना त्यांच्यासोबत त्यांचे मोजके समर्थक, दोन गाड्या आणि दोन रुग्णवाहिका (ॲम्ब्युलन्स) होत्या. निघण्यापूर्वी डॉक्टरांनी त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना उपचार घेण्याची विनंती केली होती, परंतु त्यांनी उपचार घेण्यास स्पष्ट नकार दिला आणि ते डिफेंडर गाडीतून मुंबईच्या दिशेने निघाले. ते निघण्याच्या वेळी अंतरवालीमध्ये समर्थकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.  मनोज जरांगे मुंबईला निघत असताना चोरट्यानी डल्ला मारल्याचं दिसून आलं. गर्दीचा फायदा घेत मोबाईल आणि पैसे चोरले, पण आंदोलक आणि नागरिकांनी चोराला पकडलं, चोराला चोप देऊन या पोलिसांच्या स्वाधीन केलं, या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.(Manoj Jarange Patil Mumbai)

मनोज जरांगे पाटील यांच्या या प्रवासाचे चार मुख्य टप्पे असणार आहेत. त्यांचा पहिला मुक्काम पाटोदा येथे, दुसरा श्रीगोंदा येथे, तिसरा पुण्यातील हडपसर येथे आणि त्यानंतर १९ तारखेला ते मुंबईत पोहोचणार होते. मात्र, त्यांनी मुंबई पोलिसांकडे केलेल्या तिसऱ्या अर्जात १८ तारखेची परवानगी मागितली असून, आझाद मैदानावर ५० सहकाऱ्यांसह उपोषण करण्यासाठी ही परवानगी मागण्यात आली आहे. यापूर्वी त्यांनी केलेल्या दोन अर्जांना पोलिसांनी परवानगी नाकारली होती, तर तिसऱ्या अर्जावर अजूनही पोलिसांकडून काहीही उत्तर देण्यात आलेले नाही.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांकडून या आंदोलनाला परवानगी मिळण्याची शक्यता अत्यंत धूसर आहे. सध्या मुंबईत गणेशोत्सव मोठ्या धामधुमीत साजरा केला जात असून, राज्यभरातून व देशभरातून प्रचंड गर्दी मुंबईत येते. या काळात सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, नियमांची पायमल्ली आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, तसेच पोलिसांवर अतिरिक्त ताण पडू नये, यासाठी गणेशोत्सवाच्या काळात केवळ जरांगे पाटीलच नव्हे तर इतर कोणत्याही आंदोलनाला परवानगी न देण्याचे धोरण पोलिसांनी स्वीकारले आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत गणेशोत्सवानंतरच अशा आंदोलनांच्या परवानगीचा विचार केला जाईल, अशी माहिती सूत्रांकडून दिली जात आहे.

उपोषणाची जागा सोडली, गाडीत बसताच जरांगे रडले 

अंतरवाली सराटीमधील उपोषणाची जागा मनोज जरांगेंनी सोडली, गाडीत बसताच माध्यमांसी बोलताना त्यांना अश्रू अनावर झाले. 
न्यायदेवतेवर आपण विश्वास ठेवायचा आणि तीच परवानगी समजायची, माझं सगळ्यांना आवाहन आहे की शांत राहा. तुमच्या लेकरांसाठी मी लढेन. सरकारने मला चौकोनी घेरलं आहे. तुम्ही माझ्यासोबत राहा. मी जिवंत असो की नसो तुम्ही समाज मोठा करा. पक्षाला जीव लावू नका, समाजाला जीव लावा. मी मुंबईला जातोय. तुम्ही आशीर्वाद द्यायला या, मला मारायचं तर मारू द्या. मी आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही, पायात आणि पोटात आग होते, अशी भावना देखील यावेळी मनोज जरांगेंनी म्हटलं आहे.

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

16 ऑक्टोबरपासून सर्वत्र पाणीकपात; अलनिनोच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून पाण्याचे सूक्ष्म नियोजन, गिरीश महाजनांनी दिली माहिती
16 ऑक्टोबरपासून सर्वत्र पाणीकपात; अलनिनोच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून पाण्याचे सूक्ष्म नियोजन, गिरीश महाजनांनी दिली माहिती
SDCCB Election : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत चुरस; 21 जागांसाठी 236 अर्ज..चार मंत्री, दोन खासदार, दोन आमदारांसह अनेक दिग्गज नेते मैदानात..
सातारा जिल्हा बँकेत शिवेंद्रराजेंच्या नेतृत्वाखाली भाजपची तयारी; जयकुमार गोरे बाजूला? चर्चांना उधाण
अहिल्यानगर DCC बँक निवडणुकीत ट्विस्ट; तिसऱ्या अपत्यावरुन गदारोळ होताच अखेर सभापती राम शिंदेंची माघार
अहिल्यानगर DCC बँक निवडणुकीत ट्विस्ट; तिसऱ्या अपत्यावरुन गदारोळ होताच अखेर सभापती राम शिंदेंची माघार
पुणे मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शहाजी बापूंची कोलांटउडी; म्हणाले, मंगेश चिवटेंना समर्थन, मनापासून प्रचार करणार
पुणे मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शहाजी बापूंची कोलांटउडी; म्हणाले, मंगेश चिवटेंना समर्थन, मनापासून प्रचार करणार
Advertisement

व्हिडीओ

CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
Sharad Koli Arrested : ठाकरेंच्या शिनसेनेचे उपनेते शरद कोळींना पोलिसांनी घेतलं ताब्यात | ABP Majha
Pune MPSC Protest : एमपीएससीचे आंदोलन, राजकारण्यांचा आखाडा? | Special Report ABP Majha
Raj Thackeray & India Alliance : 'इंडिया'ला मनसेचं इंजिन? | Special Report ABP Majha
Raj Thackeray Garjan Morcha Speech : SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, राज ठाकरे कडाडले
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SDCCB Election : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत चुरस; 21 जागांसाठी 236 अर्ज..चार मंत्री, दोन खासदार, दोन आमदारांसह अनेक दिग्गज नेते मैदानात..
सातारा जिल्हा बँकेत शिवेंद्रराजेंच्या नेतृत्वाखाली भाजपची तयारी; जयकुमार गोरे बाजूला? चर्चांना उधाण
16 ऑक्टोबरपासून सर्वत्र पाणीकपात; अलनिनोच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून पाण्याचे सूक्ष्म नियोजन, गिरीश महाजनांनी दिली माहिती
16 ऑक्टोबरपासून सर्वत्र पाणीकपात; अलनिनोच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून पाण्याचे सूक्ष्म नियोजन, गिरीश महाजनांनी दिली माहिती
जालन्यातल्या गल्हाटी धरणात पाण्याचा थेंब दिसेना;  जमिनीच्या भेगा इंच-इंच खोल; ना प्यायला पाणी ना जनावराला; शेतकरी तळमळला
जालन्यातल्या गल्हाटी धरणात पाण्याचा थेंब दिसेना;  जमिनीच्या भेगा इंच-इंच खोल; ना प्यायला पाणी ना जनावराला; शेतकरी तळमळला
महायुतीत पुणे शिक्षक आणि पदवीधरमध्ये बंडाची ठिणगी? इकडं एकनाथ शिंदे दिल्लीत गेले असतानाच तिकडं उमेदवारी नाकारताच शरद लाड यांचाही मोठा निर्णय, मंगेश चिवटेंनी सुद्धा शड्डू ठोकला
महायुतीत पुणे शिक्षक आणि पदवीधरमध्ये बंडाची ठिणगी? इकडं एकनाथ शिंदे दिल्लीत गेले असतानाच तिकडं उमेदवारी नाकारताच शरद लाड यांचाही मोठा निर्णय, मंगेश चिवटेंनी सुद्धा शड्डू ठोकला
अहिल्यानगर DCC बँक निवडणुकीत ट्विस्ट; तिसऱ्या अपत्यावरुन गदारोळ होताच अखेर सभापती राम शिंदेंची माघार
अहिल्यानगर DCC बँक निवडणुकीत ट्विस्ट; तिसऱ्या अपत्यावरुन गदारोळ होताच अखेर सभापती राम शिंदेंची माघार
Gokul Election: वार्षिक उलाढाल 4 हजार कोटींवर अन् आमदारकी नको, पण गोकुळचे संचालक करा म्हणणाऱ्या गोकुळ दूध संघाची निवडणूक नेमकी होते तरी कशी?
वार्षिक उलाढाल 4 हजार कोटींवर अन् आमदारकी नको, पण गोकुळचे संचालक करा म्हणणाऱ्या गोकुळ दूध संघाची निवडणूक नेमकी होते तरी कशी?
'वृत्तपत्रातील बातमीवर बोलताय..' सुप्रीम कोर्टाचा ज्ञानेश कुमारांविरोधात तत्काळ कारवाईस नकार, अंतरिम आदेश सुद्धा नाही, निवडणूक आयोगाला नोटीस
'वृत्तपत्रातील बातमीवर बोलताय..' सुप्रीम कोर्टाचा ज्ञानेश कुमारांविरोधात तत्काळ कारवाईस नकार, अंतरिम आदेश सुद्धा नाही, निवडणूक आयोगाला नोटीस
Chhatrapati Sambhajinagar Drought: पाण्याची वाट पाहता पाहता पीक करपलं; शेततळी कोरडी, विहिरींनी तळ गाठला, संभाजीनगरच्या गावागावांमध्ये दुष्काळाचा दाह सोसवेना
पाण्याची वाट पाहता पाहता पीक करपलं; शेततळी कोरडी, विहिरींनी तळ गाठला, संभाजीनगरच्या गावागावांमध्ये दुष्काळाचा दाह सोसवेना
Embed widget