Akola News : अकोला महापालिकेच्या (Akola Municipal Corporation) महापौरपदी भाजपच्या शारदा खेडकर (Akola Municipal Corporation Mayor) यांची निवडीनंतर सभागृहात राडा झाल्याचीमाहितीसमोरआलीआहे. एमआयएम आणि काँग्रेसच्या नगरसेवकांमध्ये सभागृहातच राडा केलाय. एमआयएम आणि काँग्रेसच्या नगरसेवकांमध्ये एकमेकांसोबत शाब्दिक चकमकझालीआहे. दरम्यान अकोला महापालिका सभागृहात काँग्रेसच्या नगरसेवकांनी धमक्या दिल्याचा आरोप करण्यातआलाआहे. परिणामी काँग्रेसच्या नगरसेवकांनी एमआयएमच्या नगरसेवकांवर सभागृहातच बांगड्या फेकल्या आहेत.Akola Municipal Corporation Mayor)
Congress vs MIM conflict : MIM चे 3 नगरसेवक ऐनवेळी तटस्थ राहिल्यानंतर वाद
अकोला महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या शारदा खेडकर (BJP Sharda Khedkar) यांची निवड झालीआहे. भाजपचे शारदा खेडकर यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार सुरेखा काळे यांचा 45 विरुद्ध 32 मतांनी पराभव केलाय. दरम्यान, एमआयएम आणि काँग्रेस नगरसेवक एकमेकांसोबत भिडले आहे. MIM चे 3 नगरसेवक ऐनवेळी तटस्थ राहिल्यानंतर काँग्रेसच्या नगरसेवकांनी एमआयएमच्या नगरसेवकांसोबत वाद घातलाय.
दरम्यान, भाजपच्या महापौरला 38 नगरसेवकांसह शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 3 अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा 1, शिंदेंच्या शिवसेनेचा 1, आणि 2 अपक्ष नगरसेवकाचा पाठिंबा. काँग्रेसच्या आघाडीत गेलेले भाजपचे बंडखोर अपक्ष नगरसेवक आशिष पवित्रकार यांनी ऐनवेळी भाजपला पाठिंबा दिला होता. दुसरीकडं एमआयएमचे 3 नगरसेवक ऐवेळी तटस्थ राहिले. महापालिकेत चमत्काराचा काँग्रेसने केलेला दावा फोल ठरलाय. बहुमत मिळालेलं नसतानाही भाजपने मित्र पक्षांच्या साथीने महापालिकेवरील सत्ता राखली आहे. तर भाजपाच्या कूटनीतीचा अकोला महापालिकेत मोठा विजय झाल्याचेबोललंजातआहे.
Akola Mayor: अकोला महापालिकेत भाजपाने राखली सत्ता, शारदा खेडकर यांची निवड
दरम्यान, अकोला महापालिकेत भाजपाने सत्ता राखली आहे. अकोला महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या शारदा खेडकर यांची निवड झालीआहे. शारदा खेडकर प्रभाग क्रमांक 15 च्या नगरसेविका आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार सुरेखा काळे यांचा त्यांनी 45 विरुद्ध 32 मतांनी पराभव केलाय. भाजपच्या शारदा खेडकर यांना भाजपच्या 38 नगरसेवकांसह शरद पवारांचे राष्ट्रवादीचे तीन अजित पवारांचे राष्ट्रवादीचा एक शिंदेंच्या शिवसेनेचा एक आणि दोन अपक्ष नगरसेवकाचा पाठिंबा मिळालाय. काँग्रेसच्या आघाडीत गेलेले भाजपचे बंडखोर अपक्ष नगरसेवक आशिष पवित्रकार यांनी ऐनवेळी भाजपला पाठिंबा दिला. तर एमआयएमचे तीन नगरसेवक ऐनवेळी तटस्थ राहिलेत. महापालिकेत चमत्काराचा काँग्रेसने केलेला दावा फोल ठरलाय. बहुमत मिळालेलं नसतानाही भाजपने मित्र पक्षांच्या साथीने महापालिकेवरील सत्ता राखलीआहे. भाजपाच्या कूटनीतीचा अकोला महापालिकेत मोठा विजय झालाआहे.
अकोला महापालिकेतील पक्षीय बलाबल (Akola Municipal Corporation 2026)
एकूण जागा : 80
बहुमताचा आकडा : 41
भाजप : 38
काँग्रेस : 21
उबाठा : 06
शिंदे सेना : 01
अजित राष्ट्रवादी : 01
शरद राष्ट्रवादी : 03
वंचित : 05
एमआयएम : 03
अपक्ष : 02
इतर महत्वाच्या बातम्या
