एक्स्प्लोर

Congress: सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला मोठा झटका, ज्ञानेश कुमारांना थेट नोटीस पाठवली; विजय वडेट्टीवारांसह हर्षवर्धन सपकाळांकडून प्रश्नांची सरबत्ती, म्हणाले..

SIR प्रक्रियेतच गंभीर अनियमितता झाल्या असतील, तर बिहारसह देशातील इतर भागांमध्ये या प्रक्रियेदरम्यान नेमके काय घडले, याची उच्चस्तरीय चौकशी का होऊ नये?' असे सवाल हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारला आहे.

Congress Harshwardhan sapkal: 'माझा प्रश्न अगदी स्पष्ट आहे. ज्या बदलांची चर्चा केली जात आहे, त्या बदलांबाबत आम्हाला कोणतीही असहमती नाही. मात्र, त्यामुळे हा प्रश्न आणखी गंभीर बनतो की SIR ची संपूर्ण प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने राबवण्यात आली होती का? जर SIR प्रक्रियेतच गंभीर अनियमितता झाल्या असतील, तर बिहारसह देशातील इतर भागांमध्ये या प्रक्रियेदरम्यान नेमके काय घडले, याची निष्पक्ष आणि उच्चस्तरीय चौकशी का होऊ नये?' असे सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan sapkal) यांनी विचारला आहे. (Supreme Court on Gyanesh Kumar marathi news)

Congress Harshwardhan : कोणत्याही नागरिकाला त्याच्या मताधिकारापासून वंचित ठेवणे हा लोकशाहीसाठी अत्यंत गंभीर विषय

महाराष्ट्रासह ज्या-ज्या राज्यांमध्ये SIR प्रक्रिया राबवण्यात आली, त्या संपूर्ण प्रक्रियेचा पारदर्शकपणे आढावा घेऊन चौकशी करण्यात यावी. कोणत्याही नागरिकाला त्याच्या मताधिकारापासून वंचित ठेवणे हा लोकशाहीसाठी अत्यंत गंभीर विषय आहे. त्यामुळे चौकशीत जर जाणूनबुजून नागरिकांना त्यांच्या घटनात्मक मताधिकारापासून वंचित ठेवण्यात आल्याचे सिद्ध झाले, तर त्यासाठी जबाबदार असलेल्या अधिकारी किंवा व्यक्तींवर कायद्यानुसार कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी. अशी मागणीही हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan sapkal) यांनी केली आहे. आमची अंतिम मागणी स्पष्ट आहे, या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र, निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी करण्यात यावी आणि दोषी आढळणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कोणताही विलंब न करता कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी. असेही ते म्हणाले.

Vijay Wadettiwar: SIR प्रक्रियेबाबत निर्णय एकतर्फी घेतले गेले का? सर्व सदस्यांची संमती होती का?

सर्वोच्च न्यायालयाने आज निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे, हा अत्यंत गंभीर विषय आहे. SIR प्रक्रियेबाबत निर्णय एकतर्फी घेतले गेले का? निवडणूक आयोगाच्या सर्व सदस्यांची संमती होती का? निर्णय बहुमताने झाले की केवळ मुख्य निवडणूक आयुक्तांच्या पातळीवर झाले? याची संपूर्ण माहिती सर्वोच्च न्यायालयाने मागवली आहे. माझा सरळ सवाल आहे, या देशातील नागरिकांच्या मताधिकारावर निर्णय घेण्याचा अधिकार कुणी दिला? असा सवाल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी विचारला आहे.18 वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकाला मतदार म्हणून आपला अधिकार बजावता आला पाहिजे. एखाद्या नागरिकाचे नाव मतदार यादीतून वगळले जात असेल, तर त्यामागची प्रक्रिया पारदर्शक आणि कायदेशीर असलीच पाहिजे, असेही ते म्हणाले आहे.

Vijay Wadettiwar: हा विषय केवळ राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा राहिलेला नाही, तर तो...

SIRच्या नावाखाली जर कुठल्याही पात्र मतदाराला त्याच्या मताधिकारापासून वंचित ठेवण्यात आले असेल, तर त्याची जबाबदारी निश्चित झाली पाहिजे. यासाठी स्वतंत्र, निष्पक्ष आणि वेळबद्ध चौकशी झाली पाहिजे. गेल्या काही काळापासून निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेबाबत विरोधकांकडून सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आता सर्वोच्च न्यायालयानेही संबंधित निर्णयप्रक्रियेबाबत निवडणूक आयोगाकडून उत्तर मागितले आहे. त्यामुळे हा विषय केवळ राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा राहिलेला नाही. तो देशाच्या लोकशाही व्यवस्थेशी आणि नागरिकांच्या मताधिकाराशी संबंधित गंभीर घटनात्मक प्रश्न बनला आहे. असेही काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले.

Vijay Wadettiwar: SIR प्रक्रियेची संपूर्ण आणि निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे

आमची मागणी स्पष्ट आहे, SIR प्रक्रियेची संपूर्ण आणि निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे, मतदारांची नावे वगळण्यामागची कारणे सार्वजनिक झाली पाहिजेत आणि जर कोणत्याही अधिकाऱ्याने कायद्याचे उल्लंघन केल्याचे चौकशीत सिद्ध झाले, तर त्याच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई झाली पाहिजे. अशी मागणीही काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. जर या संपूर्ण प्रक्रियेत नागरिकांच्या मताधिकाराशी खेळ झाल्याचे सिद्ध झाले, तर त्याची नैतिक आणि घटनात्मक जबाबदारी स्वीकारून संबंधितांनी आपल्या पदावर राहण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे, अशी भूमिका आम्ही ठामपणे मांडू. असेही विजय वडेट्टीवार म्हणाले. लोकशाहीमध्ये मतदार हा सर्वात मोठा आहे. मतदाराचा अधिकार कोणालाही मनमानी पद्धतीने हिरावून घेता येणार नाही. आता या सरकारने स्वतःहून बाहेर जावं, नाहीतर लोक यांना लाथा मारतील. काँग्रेसची भूमिका आता आमचं आंदोलन तीव्र होणार असेही ते म्हणाले.

'एबीपी माझा'मध्ये कार्यरत. मी मराठी आणि नेटवर्क १८ लोकमत मध्ये कामाचा अनुभव 
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gokul Chairman Election 2026 Mahayuti: गोकुळच्या अध्यक्षपदासाठी महायुतीने मोहरा निवडला, राजेश पाटलांनी उमेदवारी अर्ज भरला, निकाल किती वाजता लागणार?
गोकुळच्या अध्यक्षपदासाठी महायुतीने मोहरा निवडला, राजेश पाटलांनी उमेदवारी अर्ज भरला, निकाल किती वाजता लागणार?
Gokul Chairman Election Mahayuti: गोकुळच्या अध्यक्षपदाची वाटणी होणार, महायुतीचा संभाव्य फॉर्म्युला समोर; कोणत्या पक्षाचा पहिला अध्यक्ष होणार?
गोकुळच्या अध्यक्षपदाची वाटणी होणार, महायुतीचा संभाव्य फॉर्म्युला समोर; कोणत्या पक्षाचा पहिला अध्यक्ष होणार?
Satej Patil Gokul Chairman Election 2026: सरकारने गुलदस्त्यात ठेवलेली 4 नावं सतेज पाटलांनी कशी शोधून काढली? GR साईटवर अपलोड नसतानाही सिक्रेट माहिती लीक
सरकारने गुलदस्त्यात ठेवलेली 4 नावं सतेज पाटलांनी कशी शोधून काढली? GR साईटवर अपलोड नसतानाही सिक्रेट माहिती लीक
Gokul Chairman Election 2026: राज्याचं लक्ष लागलेल्या गोकुळच्या अध्यक्षपदासाठी पहिलं नाव समोर; कोण आहेत अजित नरके?
राज्याचं लक्ष लागलेल्या गोकुळच्या अध्यक्षपदासाठी पहिलं नाव समोर; कोण आहेत अजित नरके?
Advertisement

व्हिडीओ

Gokul Chairman Election 2026: गोकुळमध्ये शासननियुक्त 4 संचालक पोहोचले तेव्हा...काय घडलं?, VIDEO
Vivekanand Patil Gokul Morcha Speech : कोरमचं कौतुक सांगू नका, गोकुळ मोर्चातील धमाल भाषण
Varsha Usgaonkar Majha Katta: कॉलेजचे किस्से ते सिनेमातील प्रवास,वर्षा उसगांवकरांसोबत दिलखुलास गप्पा
Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी
NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
UP Car Accident: दिवाळीसाठी निघाले, एक चूक आणि सगळे जिवंत जळाले; कार अपघातामध्ये 6 मित्रांचा मृत्यू, संपूर्ण गाव सुन्न!
दिवाळीसाठी निघाले, एक चूक आणि सगळे जिवंत जळाले; कार अपघातामध्ये 6 मित्रांचा मृत्यू, संपूर्ण गाव सुन्न!
Ajit Pawar family Visit Memorial: दिवाळी पाडव्याला सुनेत्रा वहिनी मुलं-सुनांसोबत अजितदादांच्या स्मृतीस्थळावर पोहोचल्या; कायनात दारा, ऋतुजा पवारांनी वाहिली श्रद्धांजली, दादांच्या बहिणीला अश्रू अनावर
सुनेत्रा वहिनी मुलं-सुनांसोबत अजितदादांच्या स्मृतीस्थळावर पोहोचल्या; कायनात दारा, ऋतुजा पवारांनी वाहिली श्रद्धांजली, दादांच्या बहिणीला अश्रू अनावर
Gokul Chairman Election Mahayuti: गोकुळच्या अध्यक्षपदाची वाटणी होणार, महायुतीचा संभाव्य फॉर्म्युला समोर; कोणत्या पक्षाचा पहिला अध्यक्ष होणार?
गोकुळच्या अध्यक्षपदाची वाटणी होणार, महायुतीचा संभाव्य फॉर्म्युला समोर; कोणत्या पक्षाचा पहिला अध्यक्ष होणार?
Gokul Chairman Election 2026: गोकुळ दूध संघावरील शासननियुक्त 4 संचालकांची नावं समोर; सरकारने कुणाकुणाची निवड केली?, पाहा यादी!
गोकुळ दूध संघावरील शासननियुक्त 4 संचालकांची नावं समोर; सरकारने कुणाकुणाची निवड केली?, पाहा यादी!
Gokul Chairman Election 2026 Mahayuti: गोकुळच्या अध्यक्षपदासाठी महायुतीने मोहरा निवडला, राजेश पाटलांनी उमेदवारी अर्ज भरला, निकाल किती वाजता लागणार?
गोकुळच्या अध्यक्षपदासाठी महायुतीने मोहरा निवडला, राजेश पाटलांनी उमेदवारी अर्ज भरला, निकाल किती वाजता लागणार?
Modi Zelenskyy Phone Call : रशिया-युक्रेन युद्धामध्ये शांततेचा तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू; पंतप्रधान मोदींचा झेलेंस्कींना फोन
रशिया-युक्रेन युद्धामध्ये शांततेचा तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू; पंतप्रधान मोदींचा झेलेंस्कींना फोन
मोठी बातमी : अजित पवारांच्या घातपातप्रकरणी सुनील तटकरेंची चौकशी करा, तो राक्षसी माणूस, अंतुलेंनाही त्यांनीच संपवलं : रामदास कदम
अजित पवारांच्या घातपातप्रकरणी सुनील तटकरेंची चौकशी करा, तो राक्षसी माणूस, अंतुलेंनाही त्यांनीच संपवलं : रामदास कदम
Satej Patil : मातंग समाजाचे मिणचेकर पडले, मराठ्यांचे युवराज पाटील पडले, पण मुश्रीफांना फक्त त्यांचा मुलगा पडल्याचं दुःख, मग खरे जातीयवादी कोण? सतेज पाटलांचा सवाल
Satej Patil : मातंग समाजाचे मिणचेकर पडले, मराठ्यांचे युवराज पाटील पडले, पण मुश्रीफांना फक्त त्यांचा मुलगा पडल्याचं दुःख, मग खरे जातीयवादी कोण? सतेज पाटलांचा सवाल
Embed widget