बारामती : बारामती पोटनिवडणुकीच्या अनुषांगाने राज्याच्या राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. अशातच महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस राहुरी आणि बारामती पोटनिवडणुकीत (Rahuri and Baramati bypoll election) उमेदवार देण्याच्या तयारीत आहेत, काँग्रेसच्या या भूमिकेमुळे ठाकरेंच्या शिवसेनेची कोंडी होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी म्हणून काँग्रेसच्या भूमिकेला पाठिंबा द्यायचा कि बारामती (Rahuri and Baramati bypoll election) पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विनंतीचा मान ठेवत सुनेत्रा पवार यांना पाठिंबा द्यायचा? असा सवाल त्यांच्यासमोर उपस्थित झाला आहे. ठाकरेंची शिवसेना या सगळ्यांमध्ये काय निर्णय घेणार? हे पाहणं महत्वाचं असणार आहे. (Rahuri and Baramati bypoll election)
राहुरी आणि बारामती पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेस उमेदवार देण्यासंबंधी आधी काँग्रेसमधील राज्यातील नेत्यांनी फारशी चर्चा महाविकास आघाडीतील इतर दोन पक्षांशी न करता काँग्रेसने भूमिका जाहीर करून मग पक्षाशी चर्चा करताना दिसत आहेत. त्यामध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरे यांना फोन करून बारामती पोटनिवडणुकीसाठी पाठिंबा देण्याची विनंती केली अशी माहिती आहे. या सगळ्यांमध्ये काँग्रेस पक्ष सोबत न जाता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने बारामती पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे ठाकरेंची शिवसेना नेमकी काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (Rahuri and Baramati bypoll election)
Baramati bypoll election: सुनेत्रा पवारांचा उद्धव ठाकरेंना फोन
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (sunetra pawar) यांनी शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेंना (uddhav thackeray) फोन केल्याची माहिती समोर आली आहे. फोन करून सुनेत्रा पवारांनी (sunetra pawar) उद्धव ठाकरेंना बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत पाठिंबा देण्याची विनंती केली असल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेसच्या नेत्यांनाही पाठिंब्यासाठी सुनेत्रा पवार विनंती करणार असल्याची माहिती समोर आली आहे.तर बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रयत्न सुरू झाले आहे. सुनेत्रा पवार सोमवारी (6 एप्रिलला) आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते, मंत्री उपस्थित राहणार आहेत. (uddhav thackeray)
Baramati bypoll election: राष्ट्रवादीकडून बारामती पोटनिवडणूक ही बिनविरोध करण्यासाठी हालचाली
बारामती पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष आपला उमेदवार देणार असल्याच्या चर्चा आहेत, निवडणुकीसाठी काँग्रेसने काही इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती देखील घेतल्याची माहिती काल समोर आली होती. काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीतील इतर मित्र पक्षांशी देखील उमेदवारी बाबत चर्चा करत आहे, अशातच राष्ट्रवादी काँग्रेस कडून बारामती पोटनिवडणूक ही बिनविरोध करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. यासाठीच शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सुनेत्रा पवार यांनी फोन केल्याची माहिती समोर आली आहे. या निवडणुकीमध्ये आपल्याला पाठिंबा द्यावा अशी विनंती सुनेत्रा पवारांनी उद्धव ठाकरेंना केल्याची माहिती आहे.(uddhav thackeray)
दरम्यान काँग्रेस पक्ष राहुरी आणि बारामती विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी आग्रही आहे, या दोन्ही मतदारसंघांमध्ये उमेदवार देण्याच्या हालचाली ही काँग्रेसने सुरू केल्या आहेत, अशातच काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी देखील सुनेत्रा पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते त्यांना विनंती करणार आहेत, आणि आपल्या पक्षाला पाठिंबा द्यावा अशी मागणी करणार आहेत पण काँग्रेस पक्ष या संदर्भात काय भूमिका घेते हेही महत्त्वाचं ठरणार आहे, दरम्यान सुनेत्रा पवारांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत्यांनी विनंती केल्यानंतर उद्धव ठाकरेंची भूमिका काय असणार आहे हेही पाहणं महत्त्वाचं असणार आहे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून ही पोट निवडणूक बिनविरोध हवी त्यासाठी प्रयत्न करत आहेत.
Baramati bypoll election: 23 एप्रिलला मतदान, मतमोजणी 'या' दिवशी
महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी या विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. राहुरी आणि बारामतीसाठी 23 एप्रिलला मतदान होईल तर मतमोजणी 4 मे रोजी होणार आहे. भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानं अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झालेली आहे. तर, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं 28 जानेवारीला झालेल्या विमान अपघातात निधन झालं. यामुळं बारामती विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त आहे. या दोन्ही जागांची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे.
Baramati bypoll election: बारामती आणि राहुरीचा पोटनिवडणूक कार्यक्रम
निवडणुकीची अधिसूचना जारी : 30 मार्च 2026उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत : 6 एप्रिल 2026अर्जांची छाननी : 7 एप्रिल 2026अर्ज मागे घेण्याची मुदत : 9 एप्रिल 2026मतदानाची तारीख : 23 एप्रिल 2026मतमोजणी : 4 मे 2026निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची तारीख : 6 मे 2026
