मुंबई : काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी पडली असून बीड दौऱ्यातील त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये, आमदार धनंजय मुंडे बोलता असताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार शांत बसलेल्या दिसत आहेत. त्यावरुन, काँग्रेसने सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना गुंगी गुडिया म्हणत हिनवले, काँग्रेसने हा व्हिडिओ शेअर करत, सुनेत्रा पवार, अजून किती दिवस "गुंगी गुडिया" बनून राहतील? असा सवालही केला. आता, काँग्रेसच्या या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसकडून पलटवार केला जात आहे. तर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही काँग्रेसला जोरदार प्रत्युत्तर दिलंय.  

Continues below advertisement

काँग्रेस लोकांपासून दूर गेली आहे, त्यामुळे असे विधान येत आहे. मी काँग्रेस पक्षाला इंदिरा गांधींचा फोटो देणार आहे. विरोधकांनी अशीच त्यांच्यावर टीका केली होती आणि त्याच खणकर पंतप्रधान झाल्याचा इतिहास आहे. काँग्रेस चांगल्या लोकांच्या हाती नाही, पराभव पचविता येत नाही अशी ही लोक आहेत, अशा शब्दात सुनेत्रा पवार यांच्याबद्दल महाराष्ट्र काँग्रेसने केलेल्या टीकेला राष्ट्रवादीने प्रत्युत्तर दिले आहे. सुनेत्रा वहिनी पवार या प्रत्येक आठवड्यात मुंबई पुण्यात पत्रकारांसोबत संवाद साधतात, बीडमदील ती पत्रकार परिषद होण्याआधी त्यांनी अनेक उत्तर दिली होती. मात्र, काँग्रेसने संभ्रम निर्माण केला आहे, त्यामुळे यांचं हास्य झाले, अशा शब्दात सूरज चव्हाण यांनी पलटवार केला.  

अंजली दमानियांचे असेच सहकार्य मिळो

सुनेत्रा पवार यांच्यावरील टीकेनंतर अंजली दमानिया बोलल्या मला चांगले वाटले, महिला म्हणून त्यांना आदर आहे, त्यांचो सहकार्य असेच मिळो ही अपेक्षा. एक महिला उपमुख्यमंत्री म्हणून त्यांना आदर असावा, पण जो बदल झाला तो चांगला, असे म्हणत अंजली दमानिया यांनी केलेल्या ट्विटवरही सूरज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली. 

Continues below advertisement

लाडक्या बहि‍णींनी काँग्रेसला आधीच उत्तर दिलंय - शिंदे

काँग्रेसने सुनेत्रा पवार यांच्याबद्दल गुंगी गुडिया म्हणत केलेल्या टीकेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उत्तर दिलय. काँग्रेसला हे शब्द वापरताना थोडी तरी मनाची नाही, तर जनाची वाटली पाहिजे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनींबद्दल असे बोलत आहेत, यांना लाडक्या बहिणींनी 2026 मध्येच उत्तर दिले आहे, अशा शब्दात एकनाथ शिंदेंनी काँग्रेसवर पलटवार केला. तसेच, पद्मश्री डॉ.डी.वाय पाटील यांचे निधन अतिशय दुःखद घटना आहे, त्यांचे योगदान मोठे आहे. अजात शत्रू म्हणून ते होते. त्यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. मी त्यांना श्रद्धांजली अर्पित करतो, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं.

अंजली दमानियांकडून काँग्रेसचा निषेध

गुंगी गुडिया? काय ही भाषा? एका पक्षाला ही भाषा शोभते का? पृथ्वीराज चव्हाण यांना ही भाषा योग्य वाटते का? असे प्रश्न करत अंजली दमानिया यांनी काँग्रेसच्या टीकेवरुन पलटवार केला. मी राष्ट्रवादी पक्षाविरुद्ध टोकाचं लढले, पण सुनेत्रा पवारांसाठी वापरलेले हे शब्द अतिशय चुकीचे आहेत. मी याचा तीव्र शब्दात निषेध करते, असेही दमानिया यांनी म्हटले. 

राष्ट्रवादीच्या महिला नेत्यांचा पलटवार

काँग्रेस पक्षाने सुनेत्रा पवारांचा उल्लेख 'गुंगी गुडिया' असा करणे ही काँग्रेसची बौद्धिक दिवाळखोरी आहे. अजित दादांच्या पावलावर पाऊल ठेवत सुनेत्रा पवारांनी सकाळी 7 वाजता कामाला सुरुवात केली ते रात्री 10 वाजेपर्यंत त्या लोकांचे प्रश्न सोडवत होत्या, त्यांच्या ह्या कामाने त्यांचे नेतृत्व सिध्द करून दाखवले आहे. सुनेत्रा पवारांच्या केलेल्या अपमानाबद्दल काँग्रेसने तत्काळ माफी मागावी अन्यथा त्यांच्याच भाषेत त्यांना उत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सक्षम आहे, असा शब्दातही राष्ट्रवादीच्या महिला नेत्यांनी पलटवार केला आहे.