एक्स्प्लोर

गुवाहटीला गेलेल्या शिंदेंच्या आमदारासोबत नाना पटोलेंची हातमिळवणी; सांगितलं राज'कारण'

राजकारणातील दोन वेगवेगळ्या पक्षाचे नेते, जे राज्यातील राजकारणात एकमेकांच्या विरोधात आहेत.

भंडारा : राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतं हे अनेकदा पाहायला मिळालं आहे. राज्याच्या राजकारण अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र आल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, आणि सहकार क्षेत्रातील निवडणुकीत हे अनेकदा दिसून येतं. सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीत काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते आणि भाजप आमदार एकत्र आल्याचं पाहायला मिळालं होतं. आता, शिवसेनेतील (Shivsena) बंडानंतर गद्दार म्हणून टीका करणाऱ्या एकनाथ शिंदेंच्या आमदारासोबत काँग्रेस नेते व आमदार नाना पटोले (Nana patole) यांनी हातमिळवणी केल्याचं समोर आलं आहे. भंडाऱ्यातील (Bhandara) या युतीमुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही अशाच आघाडी व युती पाहायला मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.    

राजकारणातील दोन वेगवेगळ्या पक्षाचे नेते, जे राज्यातील राजकारणात एकमेकांच्या विरोधात आहेत. त्या पक्षांच्या नेत्यांनी आज भंडारा जिल्ह्यात दूध संघाच्या निवडणुकीसाठी एकत्र हातमिळवणी केली. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिंदेंच्या शिवसेनेचे पूर्व विदर्भ समन्वयक आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी दूध संघाच्या निवडणुकीत हातमिळवणी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. भंडारा जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात आज घडलेली ही राजकीय घडामोड सर्वत्र चर्चेत असून दोन दिग्गज नेते एकत्र आल्याने दूध संघाच्या निवडणुकीत याचा परिणाम बघायला मिळणार आहे. 

शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी ही युती

सहकारमध्ये कुठल्याही पक्षाच्या चिन्हावर निवडणूक होत नाही. नरेंद्र भोंडेकर शिवसेनेचे असले तरी या जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही दोघेही मिळून काम करत आहे. या निवडणुकीला राजकीय वळण न देता जिल्ह्याच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी ही निवडणूक असल्याचे नाना पटोले यांनी म्हटलं. तसेच, ही निवडणूक पार पडल्यानंतर बँकेच्या निवडणुकीसाठी आम्ही पुन्हा एकत्र बसू. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आमचे स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकारी हे सांगतील त्यानुसार होईल, असेही नाना पटोले यांनी स्पष्ट केले. 

जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्र

जे स्वतःला सहकार महर्षी समजतात अशा भंडारा जिल्ह्यातील सहकार महर्षींनी जिल्ह्याला चौपाट केलं आहे. जिल्हा दूध संघाला ज्यांनं डबघाईस आणलं त्याच्याविरोधात ही लढाई आहे. सर्वसामान्य माणूस, दूध उत्पादक शेतकरी यांना उभे करण्यासाठी ही सहकारातील युती आहे, असे नरेंद्र भोंडेकर यांनी म्हटलं. तसेच, जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही सर्व एकत्र आलोय, असेही ते म्हणाले. 

हेही वाचा

MHT CET परीक्षेचा निकाल जाहीर; 22 विद्यार्थ्यांना 100 पर्सेंटाईल; इथे पाहाता येईल गुणपत्रिका

 

महत्त्वाच्या बातम्या

एकीकडे ऑपरेशन टायगरची चर्चा, दुसरीकडे शिंदेंच्या आमदाराला थेट काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर, भंडाऱ्यात राजकीय भूकंप? 
एकीकडे ऑपरेशन टायगरची चर्चा, दुसरीकडे शिंदेंच्या आमदाराला थेट काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर, भंडाऱ्यात राजकीय भूकंप? 
ज्यांनी देवाला सोडलं नाही, दानपेटीवर डाका टाकला, ते आमदार खासदारांना काय सोडणार, नाना पटोलेंचा भाजपवर घणाघात
ज्यांनी देवाला सोडलं नाही, दानपेटीवर डाका टाकला, ते आमदार खासदारांना काय सोडणार, नाना पटोलेंचा भाजपवर घणाघात
UP Hira Thakur : हिरा ठाकूर यांचा अखेर काँग्रेसमध्ये प्रवेश, निवडणुकीआधीच भाजपला मोठा धक्का
हिरा ठाकूर यांचा अखेर काँग्रेसमध्ये प्रवेश, निवडणुकीआधीच भाजपला मोठा धक्का
कुणबीच्या 58 लाख नोंदी ग्रामपंचायतीमध्ये प्रसिद्ध होणार, 36 जिल्ह्यात शिबीर; मनोज जरांगेंच्या आंदोनलाबाबत मंत्री विखे पाटलांनी दिली माहिती
कुणबीच्या 58 लाख नोंदी ग्रामपंचायतीमध्ये प्रसिद्ध होणार, 36 जिल्ह्यात शिबीर; मनोज जरांगेंच्या आंदोनलाबाबत मंत्री विखे पाटलांनी दिली माहिती

व्हिडीओ

Maharashtra Drought : पावसाअभावी दशा, आता कृत्रिम पावसाची आशा?
Pune MPSC Students Protest : एमपीएससीवर रोष विद्यार्थ्यांचा आक्रोश! | Special Report ABP Majha
Manoj Jarange Andolan : लढाई आरक्षणाची चर्चा जरांगेंच्या भाषेची | Special Report ABP Majha
Pune DJ Morcha : पुण्यात डीजेविरोधात मोर्चा, विद्यानंद बापटांच्या दांडीची चर्चा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Uposhan : जरांगेंची आरपारची लढाई, मिशन आरक्षण Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
UP Hira Thakur : हिरा ठाकूर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश, निवडणुकीआधीच भाजपला मोठा धक्का
हिरा ठाकूर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश, निवडणुकीआधीच भाजपला मोठा धक्का
Jalgaon Dahihandi Row : 51 हजारांचे बक्षीस दाखवून दिले फक्त 5 हजार रुपये! जळगावात गोविंदांचे भररस्त्यात आंदोलन
51 हजारांचे बक्षीस दाखवून दिले फक्त 5 हजार रुपये! जळगावात गोविंदांचे भररस्त्यात आंदोलन
Non Veg In Durga Puja : आमच्या लोकांनी काय खायचं हे बाहेरुन आलेल्या धर्मगुरूने शिकवू नये, भाजप प्रदेशाध्यक्षांचा बागेश्वर बाबांना टोला
आमच्या लोकांनी काय खायचं हे बाहेरुन आलेल्या धर्मगुरूने शिकवू नये, भाजप प्रदेशाध्यक्षांचा बागेश्वर बाबांना टोला
MPSC Paper Leak : एक जरी पुरावा दिला तरी क्षणभरही पदावर राहणार नाही; विद्यार्थ्यांच्या आक्रोश मोर्चानंतर MPSC अध्यक्ष भीमनवार यांची भूमिका
एक जरी पुरावा दिला तरी क्षणभरही पदावर राहणार नाही; विद्यार्थ्यांच्या आक्रोश मोर्चानंतर MPSC अध्यक्ष भीमनवार यांची भूमिका
कुणबीच्या 58 लाख नोंदी ग्रामपंचायतीमध्ये प्रसिद्ध होणार, 36 जिल्ह्यात शिबीर; मनोज जरांगेंच्या आंदोनलाबाबत मंत्री विखे पाटलांनी दिली माहिती
कुणबीच्या 58 लाख नोंदी ग्रामपंचायतीमध्ये प्रसिद्ध होणार, 36 जिल्ह्यात शिबीर; मनोज जरांगेंच्या आंदोनलाबाबत मंत्री विखे पाटलांनी दिली माहिती
जागतिक फिजिओथेरपी दिन; ‘वर्क फ्रॉम होम’ अंगलट येतय का? पाठदुखीच्या समस्या वाढल्याचं समोर
जागतिक फिजिओथेरपी दिन; ‘वर्क फ्रॉम होम’ अंगलट येतय का? पाठदुखीच्या समस्या वाढल्याचं समोर
Pakistan Cricket Crisis : 'भारताविरुद्धचा 'तो' विजयच आमचा काळ ठरला!' पाकिस्तान क्रिकेटच्या उद्ध्वस्तावर मोहम्मद युसूफला अश्रू अनावर
'भारताविरुद्धचा 'तो' विजयच आमचा काळ ठरला!' पाकिस्तान क्रिकेटच्या उद्ध्वस्तावर मोहम्मद युसूफला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 सप्टेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 सप्टेंबर 2026 | सोमवार
Embed widget