Chandrapur Municipal Corporation चंद्रपूर : चंद्रपूर महानगर पालिकेचा अंतर्गत वाद दिवसागणिक चांगलाच वाढअसल्याचेचित्रआहे. असे असताना आज (3 फेब्रुवारी) काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar) यांच बोलकं आणि लक्ष वेधून घेणार एकव्हाट्सअप स्टेटस चर्चेतआलंआहे. 'जंग मे जाने वाले घोडे, बारातो मे नही नाचा करते...' अशाआशयाचेहेस्टेटसअसूनस्टेटसमुळेअनेक चर्चांना ऊतआलाआहे. दरम्यान, चंद्रपूर महानगर पालिकेच्या (Chandrapur Municipal Corporation) वादावर आज दिल्लीत तोडगा निघणार की ही जंग आणखी वाढणार याकडे साऱ्याचे लक्ष लागलेआहे.

Continues below advertisement

Chandrapur Congress : विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यातीवादावरदिल्लीतमंथन

चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेसमध्ये विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) आणि प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar) यांच्यात सुरू असलेला वाद आणि सत्ता स्थापनेबद्दल असलेला पेच यावर आज (3 फेब्रुवारी) दिल्लीत चर्चा होणारआहे. काँग्रेस नेते के सी वेणुगोपाल यांच्या प्रमुख उपस्थितीत दुपारी 12 नंतर दिल्लीत बैठक होणारआहे. या बैठकीत महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार, खासदार प्रतिभा धानोरकर, सुनील केदार आणि राज्याचे सहप्रभारी कुणाल चौधरी उपस्थित राहणार असल्याचीमाहितीआहे. काँग्रेस नेत्यांमधील गटबाजी आणि त्यांचा सत्ता स्थापनेवर होणारा परिणाम यावर चर्चा होणारअसल्याचीमाहितीआहे. याशिवाय काँग्रेस सोबत येण्यासाठी शिवसेना उबाठाकडून महापौर पदाची घालण्यात आलेली अट ही देखील चर्चेच्या केंद्रस्थानी असणार आहे.

Continues below advertisement

Vijay Wadettiwar : आयुक्त सत्ताधाऱ्यांचे हस्तक म्हणून वागतयात, मुद्दामवेळवायाघालवून भाजपला मदत

चंद्रपूर महापालिकेतील काँग्रेस नगरसेवकांच्या गट नोंदणीच्या प्रकरणात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल झाले आहे. काल (2 फेब्रुवारी) वडेट्टीवार गटातील काँग्रेसच्या 18 आणि बसपाचा 1 अशा 19 नगरसेवकांनी त्यांचा गट नोंदवण्याचा अर्ज विभागीय आयुक्तांकडे सादर केला होता. मात्र काल काही डॉक्युमेंट्सची पूर्तता न झाल्यामुळे गट नोंदणी होऊ शकली नव्हती. आज सकाळी वडेट्टीवार यांनी विभागीय आयुक्तांवर गंभीर आरोप करत आयुक्त सत्ताधाऱ्यांचे हस्तक म्हणून वागत आहेत. जाणून-बुजून वेळ वाया घालवून भाजपला मदत करत आहेत, असा गंभीर आरोप केला होता. त्यानंतर वडेट्टीवार आता विभागीय आयुक्त कार्यालयात पोहोचले आहे.

चंद्रपूर : एकूण नगरसेवक 66 (Chandrapur Election 2026 Result)

सध्याचे संख्याबळ

भाजप – 23

काँग्रेस – 27

काँग्रेस समर्थित जनविकास सेना – 3

शिवसेना (उद्धव ठाकरे गट) – 6

वंचित - 2

बसपा - 1

शिवसेना (शिंदे गट) – 1

अपक्ष – 2

एमआयएम – 1