Nana Patole: कोरोना लसीमुळे कर्करोग अन् हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढले; आमदार नाना पटोलेंचा खळबळजनक दावा
Nana Patole: कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर लोकांमध्ये कर्करोग आणि हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे, असा खळबळजनक आणि गंभीर आरोप काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केला आहे.

Nana Patole गोंदिया: कोरोना प्रतिबंधक लस (Corona Vaccine) घेतल्यानंतर लोकांमध्ये कर्करोग (कॅन्सर) आणि हृदयविकाराच्या झटक्याचे (हार्ट अटॅक) प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे, असा खळबळजनक आणि गंभीर आरोप काँग्रेसचे नेते तथा आमदार नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे. गोंदिया (Gondia) जिल्ह्यातील आमगाव येथे आयोजित एका जाहीर कार्यक्रमात कार्यकर्त्यांना आणि नागरिकांना संबोधित करताना त्यांनी हे वक्तव्य केले. आपल्या भाषणात नाना पटोले म्हणाले की, देशात कोरोना महामारीच्या काळात मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहीम राबवण्यात आली. मात्र, या लशीचे अत्यंत घातक परिणाम आता समोर येऊ लागले आहेत. कोरोना लस घेतलेल्या नागरिकांमध्ये अचानक हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू होण्याचे तसेच कर्करोगासारखे गंभीर आजार जडण्याचे प्रमाण वेगाने वाढले असल्याचा दावा त्यांनी केला. केंद्र सरकारच्या (Central Government) तत्कालीन धोरणांवर आणि आरोग्य व्यवस्थेवर निशाणा साधत त्यांनी या गंभीर मुद्द्याकडे लक्ष वेधले. (Nana Patole Criticized on Central Government)
भंडाऱ्यातील भाजप-शिवसेनेतील वादाचा फायदा उठवत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मुकुंद साखरकर यांनी शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांची जाहीर पाठराखण तर केलीच, शिवाय त्यांना थेट काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची खुली ऑफर देऊन राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. एकीकडे सत्ताधारी शिंदे गटाकडून ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चा सुरू असताना, भंडाऱ्यात मात्र काँग्रेसनं सत्ताधारी आमदारालाचं गळाला लावण्याचा 'मास्टरस्ट्रोक' खेळल्याचं दिसत आहे. दहीहंडीच्या कार्यक्रमात विरोधी पक्षाचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष मुकुंद साखरकर यांनी शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांची तुफान फटकेबाजी करत विकास कामांसाठी पाठराखण केली.
विकास कामं करताना महायुतीचेचं मित्रपक्ष किंवा कार्यकर्ते जर आमदारांची कोंडी करत असतील, तर त्यांनी बिनधास्त काँग्रेसमध्ये यावं. त्यांचं पक्षात स्वागतचं होईल, असं खळबळजनक विधान काँग्रेसचे भंडारा जिल्हाध्यक्ष मुकुंद साखरकर यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना केलं. खासदार संजय राऊत यांनी भोंडेकर यांच्या मेडिकल कॉलेजला विरोध केला असताना, साखरकर यांनी मात्र राऊतांच्या भूमिकेवर बोलणे टाळत आमदारांनी भंडाऱ्यासाठी आणलेल्या निधीचे समर्थन केलं. आता काँग्रेसनं दिलेल्या या थेट ऑफरवर आमदार नरेंद्र भोंडेकर काय प्रत्युत्तर देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Before You Go
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस





















