Uddhav Thackeray & Raj Thackeray: शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची आज काँग्रेसच्या (Congress Meeting) नेत्यांनी मातोश्रीवर (Matoshree) भेट घेतली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थानच्या निवडणूनकांसह विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदाबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आहे. दरम्यान विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर काँग्रेस दावा सांगणार असून सतेज पाटील (Satej Patil) यांच्या नावाची वर्णी लागण्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांची काँग्रेस नेत्यांसोबत मनसेच्या (MNS) युती संदर्भात देखील चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. परिणामी, मनसे आणि शिवसेना युती संदर्भात राज्यातील काँग्रेसकडून दिल्लीतल्या पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाची प्रतीक्षा असल्याचे बोललं जात आहे.
पक्षश्रेष्ठीं मनसे संदर्भातील भूमिका स्पष्ट करतील
दरम्यान, मनसे आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र येत असेल तर काँग्रेस पक्ष सोबत राहणार का? याबाबत पक्षश्रेष्ठीं सोबत राज्यातील काँग्रेसचे नेते चर्चा करणार आणि त्यानंतर स्थानिक स्वराज्य निवडणुका संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे बोललं जात आहे. महाविकास आघाडीमध्ये ठाकरेंची शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस पक्ष एकत्र आहे. मात्र उद्धव ठाकरे हे आगामी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या सोबत युती करणार असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे यासंबंधी काँग्रेस नेते दिल्लीतील पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा करतील आणि त्यानंतरच राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने मनसे संदर्भातील भूमिका स्पष्ट करतील असे देखील बोलले जात आहे.
विरोधी पक्षनेते पदासाठी कॉंग्रेसने दावा, सतेज पाटलांच्या नावाची चर्चा
मिळालेल्या माहितीनुसार, अंबादास दानवे यांचे विरोधी पक्षनेते पदाचा कार्यकाळ 29 ऑगस्टला पूर्ण झाला. त्यानंतर विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेस आग्रही आहे. सध्या विधान परिषदेत विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेसचे आठ आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे सहा आमदार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत विधानस परिषद विरोधी पक्षनेते पदासाठी कॉंग्रेसने दावा केला असल्याची सूत्रांची माहिती आहे. या सगळ्या संदर्भात उद्धव ठाकरे यांच्यासोबत काँग्रेस नेते चर्चा करत असल्याचीही माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
आणखी वाचा