Rahul Gandhi Mallikarjun Kharge on Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिरातील देणगी चोरीच्या प्रकरणावरून सध्या राज्यासह देशाचं राजकारण कमालीचं तापलं आहे. अशातचविरोधकांकडूनहाचमुद्दावरूनसरकारवरसडकूनटीकाकेलीआहे. त्यातकाँग्रेसपक्षानेआघाडीघेतसरकाराववेळोवेळीजोरदारहल्लाबोल (Ayodhya Ram Mandir Donation Theft) केलाआहे. अशातचआताकाँग्रेसचेसर्वेसर्वा राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि काँग्रेसअध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनापत्रलिहूनयाप्रकाणाच्या चौकशीचीमागणीकेलीआहे. त्यामुळेयापात्रालापंतप्रधाननरेंद्रमोदीनेमकंकायउत्तरदेतातहेपाहणेमहत्वाचेठरणारआहे. (Rahul Gandhi Mallikarjun Kharge latters to PM Modi)
खर्गे-राहुल गांधींचे पंतप्रधानांना पत्र, चौकशीची मागणसहपत्रातनेमकंकाय?
पत्रात नमूद केल्यानुसार, ट्रस्टमध्ये हजारो कोटी रुपयांचा अपहार झाल्याचे उघड झाले असून, श्रद्धेने देणगी देणाऱ्या लाखो भाविकांमध्ये यामुळे तीव्र नाराजी असल्याचे विरोधी नेत्यांनी म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार संसदेत ट्रस्टच्या स्थापनेची घोषणा करण्यात आली होती, मात्र त्याचे सर्व सदस्य केंद्र सरकारने एकतर्फी नियुक्त केल्याचा आरोप या पत्रात करण्यात आला आहे. ट्रस्टचे सदस्य आरएसएस, विश्व हिंदू परिषद आणि संलग्न संघटनांशी जोडलेले असल्याचे तसेच वादग्रस्त माजी महासचिव सरकारचे निकटवर्तीय असल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.
Mallikarjun Kharge Writes to PM Modi: सरकारचे मौन हे गुन्ह्यासमान, ट्रस्टचे हिशोब जनतेसमोर मांडावेत
या प्रकरणी सरकारचे मौन हे गुन्ह्यासमान असून, उत्तरदायित्व निश्चित करणे व नुकसानभरपाई देणे ही सरकारची जबाबदारी असल्याचे खर्गे आणि राहुल गांधी यांनी स्पष्ट केले. रोख रक्कम, सोने-चांदीसह सर्व अर्पणांच्या व्यवहारांची सखोल व स्वतंत्र चौकशी करून त्याचे निष्कर्ष व ट्रस्टचे हिशोब जनतेसमोर मांडावेत, तसेच दोषी आढळणाऱ्या व्यक्तींवर पद वा प्रभाव न पाहता कारवाई करावी, अशी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे.
देशातील जनता यावर लक्ष ठेवून आहे
सरकार आणि ट्रस्टची विश्वासार्हता ही या प्रकरणात किती पारदर्शकपणे व त्वरेने कारवाई होते, यावर अवलंबून असल्याचे सांगत, “देशातील जनता यावर लक्ष ठेवून आहे,” असा इशारा या पत्राच्या शेवटी देण्यात आला आहे. हे पत्र 18 जुलै 2026 रोजी लिहिण्यात आले असून त्यावर दोन्ही नेत्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
