Yashomati Thakur on Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना सरकारने केवळ मतांसाठी चटक लावली, काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांची घणाघाती टीका
Yashomati Thakur on Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना सरकारने चटक लावलीय, अशी घणाघाती टीका काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी सरकारवर केली आहे.

Yashomati Thakur on Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजना ही महिलांना सक्षम करण्यासाठी नाही, तर त्यांना लाडक्या बहिणींचे मत पाहिजे होती म्हणून त्यांनी लाडकी बहीण योजना दिली. आता ते समाज कल्याण, आदिवासी विभागाचा पैसा वळती करत आहे. आदिवासी विभाग व समाज कल्याणचा पैसा तुम्ही दुसऱ्या कोणत्याही योजनेसाठी वळवू शकत नाही, तशा सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन आहे. मात्र, सरकार कोर्ट, संविधान हे बाजूला सारून गोंधळ घालत आहे. लाडक्या बहिणींना सरकारने चटक लावलीय, अशी घणाघाती टीका काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर (Congress leader Yashomati Thakur) यांनी सरकारवर केली आहे.
राज्यात 50 लाख लाडक्या बहिणींना सरकारने अपात्र ठरविल्यानंतर यशोमती ठाकूर म्हणाल्या की, सरकारला महिलांना सक्षम करण्याचं काम करायचं नाही. आज पन्नास लाख महिला अपात्र केल्या. येणाऱ्या काळात आणखी महिला ते अपात्र करणार आहेत. असेही यशोमती ठाकूर म्हणाल्या.
निकषामध्ये सरकारने कोणतेही बदल केलेले नाही- आशिष जयस्वाल
दरम्यान याच मुद्यांवर बोलताना राज्याचे अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल (Ashish Jaiswal) म्हणाले की, महाराष्ट्रात आपण जेवढ्या योजना कार्यरत केल्या, त्यात काही बोगस लाभार्थी सातत्याने घुसण्याचा प्रयत्न करतात, जेव्हा आपण योजना जाहीर केली तेव्हा त्यात काही निकष जाहीर केले होते. तरी देखील विरोधक योजने विरोधात वारंवार कितीही अपप्रचार करत असले तरी योजनेसंदर्भातील कुठल्याही निकषामध्ये सरकारने कोणतेही बदल केले नाही.
....तर त्याच्यावर निश्चितच कारवाई होईल
शिवाय, कुठल्याही लाभार्थ्यांपासून वसुली झालेले नाही. आपण आव्हान केलेलं आहे की, लाभार्थ्यांनी आपलं नाव मागे घ्यावं, माझी विनंती आहे की स्वतःहून त्यांनी आपलं नाव कमी करून टाकावं, पण दुसऱ्यांचा हक्क कोणी हिरावून घेत असेल तर त्याच्यावर निश्चितच कारवाई होईल आणि याबाबत सरकारच्या वतीने कार्यपद्धतीमध्ये, योजनांमध्ये लाभ घेण्यासाठी निर्णय घेण्यात येईल. अशी माहिती ही अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी दिली.
11 महिन्यांनी अजित पवारांकडून चूक मान्य
लाडकी बहीण योजनेवरून अजित पवारांनी नुकतीच दिलेली कबुली सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनली आहे. अनेक सरकारी कर्मचारी आणि अपात्र लाभार्थ्यांनी या योजनेतील कोट्यवधी रुपये लाटल्याचं उघड झाल्यानंतर आता अर्थमंत्री अजितदादांनी चूक कबुल केली. 1 जुलै 2024 या दिवशी शिंदे सरकारनं वाजतगाजत या योजनेची औपचारिक घोषणा केली होती. तर 1 जून 2025 ला म्हणजेच बरोबर 11 महिन्यांनी अजितदादांनी चूक मान्य केली. या काळात चुकीच्या आणि बोगस लाभार्थ्यांवर जनतेच्या कराचे जे कोट्यवधी रुपये उधळले गेले, त्याला जबाबदार कोण? त्याची भरपाई कुणाकडून करणार? असा प्रश्न त्यामुळं निर्माण झाला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या



















