Nana Patole on BJP : राज्यात पुन्हा ऑपरेशन टायगर 4 होणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. शिवसेना शिंदे गटाचे आमदार मुरजी पटेल यांनी नुकचं ठाकरेंचे 14 आमदार फुटण्याचं वक्तव्य केलं होत. त्यांच्या या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. यावर काँग्रेस आमदार नाना पटोले (Nana Patole) प्रतिक्रिया दिली आहे. ज्यांनी राम मंदिराच्या दानावर डाका टाकला, ते आमदार खासदारांना काय सोडणार, ज्या लोकांनी देवाला सोडलं नाही, रामाच्या मंदिराला सोडलं नाही त्यांच्याविषयी काय बोलायचं? असा टोला पटोलेंनी लगावला. भाजपा आणि शिवसेनेचे मानसिकताच तिच असल्याचा घणाघात नाना पटोलेंनी केला आहे.
मराठा आणि धनगर आंदोलन सरकार निर्मित, सरकारकडून आंदोलनाच्या आडून महाराष्ट्र विकण्याचं पाप
मराठ्यांच्या आणि धनगरांचे आंदोलनाबाबत बोलताना नाना पटोले म्हणाले की हे आंदोलन सरकार निर्मित आहे. ज्या ज्या वेळेस ही अशी आंदोलने होतात त्या त्या वेळेस सरकार मोठमोठ्या उद्योजकांना महाराष्ट्र विकायचं पाप करते. भाजपाने निवडणुकीपूर्वी आम्ही सत्तेत आल्यास सगळ्यांना आरक्षण देऊ ही भूमिका घेतली होती. राज्यात आणि केंद्रात तुमची सरकार आहे त्यामुळे तुम्ही आरक्षण का देऊ शकत नाही असा सवाल त्यांनी केला. आरक्षणाबाबत महाराष्ट्र सरकार संभ्रम निर्माण करून ठेवला आहे असा आरोप नाना पटोले यांनी केला.
महायुतीचे सरकार स्वार्थासाठी एकत्रित
प्रफुल्ल पटेल म्हणतात की धानाला बोनस देऊ, .मात्र परिणय फुके म्हणतात की आम्ही आता कर्जमाफी दिली आहे बोनस देणार नाही, अशी महायुतीची नेत्यांच्या भूमिकामध्ये तफावत दिसून येत आहे. यावर बोलताना काँग्रेस नेते आमदार नाना पटोले म्हणाले की महायुतीचे नेते ही स्वार्थासाठी एकत्रित आले आहेत. यांना महाराष्ट्रातील शेतकरी कसा घोरपडून जाईल. महाराष्ट्र कसं विकता येईल. सामाजिक व्यवस्था कशी संपुष्टातील याविषयी महायुती सरकार काम करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी लगावला.
कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर लोकांमध्ये कर्करोग आणि हृदयविकाराच्या झटक्याचं प्रमाण वाढलं
कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर लोकांमध्ये कर्करोग (कॅन्सर) आणि हृदयविकाराच्या झटक्याचे (हार्ट अटॅक) प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे, असा खळबळजनक आणि गंभीर आरोप काँग्रेसचे नेते तथा आमदार नाना पटोले यांनी केला आहे. गोंदिया जिल्ह्यातील आमगाव येथे आयोजित एका जाहीर कार्यक्रमात कार्यकर्त्यांना आणि नागरिकांना संबोधित करताना त्यांनी हे वक्तव्य केले. आपल्या भाषणात नाना पटोले म्हणाले की, देशात कोरोना महामारीच्या काळात मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहीम राबवण्यात आली, मात्र या लशीचे अत्यंत घातक परिणाम आता समोर येऊ लागले आहेत. कोरोना लस घेतलेल्या नागरिकांमध्ये अचानक हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू होण्याचे तसेच कर्करोगासारखे गंभीर आजार जडण्याचे प्रमाण वेगाने वाढले असल्याचा दावा त्यांनी केला. केंद्र सरकारच्या तत्कालीन धोरणांवर आणि आरोग्य व्यवस्थेवर निशाणा साधत त्यांनी या गंभीर मुद्द्याकडे लक्ष वेधले.
