Congress Bhai Jagtap Crime: दिल्ली पोलिसांचे (Delhi Police) DCP सुमित झा (DCP Sumit Jha) यांच्या नावाने AI-जनरेटेड बनावट व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्याप्रकरणी काँग्रेस (Congress)नेते भाई जगताप (Bhai Jagtap) यांच्याविरोधात महाराष्ट्र सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. महाराष्ट्र सायबरच्या नोडल सायबर पोलीस ठाण्यात FIR क्रमांक 0063/2026 नोंद करण्यात आला असून, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 353(2) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप सोशल मीडियासह संयोजक निखिल भामरे यांच्या तक्रारीवर ही कारवाई करण्यात आली आहे. (Delhi Police Fake Video Case)

Continues below advertisement

FIR नुसार, @Bhaijagtap1 या X हँडलवरून दिल्ली पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा असल्याचा भास निर्माण करणारा AI-जनरेटेड व्हिडिओ प्रसारित करण्यात आला. तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, पडताळणीत हा व्हिडिओ बनावट असल्याचे समोर आले असून, समाजात संभ्रम निर्माण करणे आणि जनतेची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने तो प्रसारित केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महाराष्ट्र सायबर पोलिसांकडून सुरू आहे

Navnath Ban on Bhai Jagtap: काँग्रेस नेते भाई जगताप यांनी जनतेची दिशाभूल केल्याबद्दल तात्काळ माफी मागावी

Continues below advertisement

PIB Fact Check आणि दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, दिल्ली पोलिसांचे DCP सुमित झा यांच्या राजीनाम्याचा दावा करणारा व्हिडिओ हा AI-जनरेटेड आणि पूर्णपणे बनावट आहे. अधिकृत यंत्रणांनी याबाबत जनतेला सावधही केले आहे. असं असताना काँग्रेसचे नेते भाई जगताप यांनी हा बनावट व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करून जनतेची दिशाभूल केली आहे. त्यांनी तात्काळ तो व्हिडिओ हटवून महाराष्ट्रातील जनतेची जाहीर माफी मागावी. अशीमागणीभाजपनेते आणि पक्षाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनीकेलीआहे. जाणूनबुजून खोटी माहिती पसरवून समाजात संभ्रम निर्माण करणे हा अत्यंत गंभीर प्रकार आहे. याप्रकरणात कायदेशीर तरतुदींनुसार त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येईल. लोकशाहीमध्ये मतभेद असू शकतात, पण फेक AI व्हिडिओच्या आधारे जनतेची फसवणूक कधीही खपवून घेतली जाणार नाही. असेहीतेम्हणाले.

इतर महत्वाच्या बातम्या